47 व्या वर्षीही अविवाहित असल्याचा राग, चित्रपट दिग्दर्शकाची आई-वडिलांकडून हत्या

प्रसिद्ध दिग्दर्शक बाबाक खोरमदीन (Babak Khorramdin) यांच्या आई-वडिलांनी आपल्या मुलाचीच हत्या केली (Iranian filmmaker Babak Khorramdin murdered by parents for being unmarried)

47 व्या वर्षीही अविवाहित असल्याचा राग, चित्रपट दिग्दर्शकाची आई-वडिलांकडून हत्या
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: May 20, 2021 | 4:09 PM

तेहरान : चित्रपट हा समाजाचा आरसा असतो. अनेक चित्रपटांमध्ये समाजात, जगात घडलेल्या सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर भाष्य करण्यात आलं असतं. अनेक चित्रपटांमध्ये समाजातील वाईट प्रवृत्तींना चपराक देण्यात आलेली असते. असे सुंदर चित्रपट बनवणारी माणसं, कलाकार, दिग्दर्शक हे देखील तितकेच सुंदर मनाचे असतील. त्यांचं कुटुंबही तितकंच सुसंस्कृत असेल, असं आपल्याला वाटणं साहजिकच आहे. अर्थात ते तसं असतंच. पण आम्ही आज तुम्हाला जी बातमी सांगणार आहोत, ती ऐकून आपल्यालाही आश्चर्य वाटले. त्या घटनेप्रती तुम्ही देखील हळहळ व्यक्त कराल (Iranian filmmaker Babak Khorramdin murdered by parents for being unmarried).

नेमकं प्रकरण काय?

इराणी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक बाबाक खोरमदीन (Babak Khorramdin) यांच्या आई-वडिलांनी आपल्या मुलाचीच हत्या केली आहे. या हत्येमागील कारण अगदीच क्षुल्लक आहे. बाबाक यांचं वय 47 वर्षे होऊनही त्यांनी आतापर्यंत लग्न केलं नव्हतं. त्यावरुनच त्यांचं आई-वडिलांसोबत घरात वाद सुरु होता. अर्थात आई-वडिलांशी कधीतरी वाद होणं, ही सर्वसामान्य गोष्ट आहे. मात्र, बाबाकच्या आई-वडिलांनी हा वाद इतका टोकाला नेला की त्यांची थेट हत्या केली. ते फक्त हत्या करुन थांबले नाहीत तर त्यांनी बाबक यांच्या शरीराचे छोटे-छोटे तुकडे केले आणि ते सुटकेसमध्ये भरुन कचऱ्यात फेकले.

बाबाक खोरमदीन

आरोपी आई-वडिलांना अटक

तेहरान क्रिमिनल कोर्टाचे प्रमुख मोहम्मद शहरियारी यांनी याबाबत माहिती दिली. बाबाक खोरमदीन यांच्या वडिलांनी आपला गुन्हा कबूल केला आहे, असं त्यांनी सांगितलं. “मी आधी मुलाला एनेस्थेशियाचं इंजेक्शन दिलं. त्यानंतर चाकू खोपसून हत्या केली. त्यानंतर त्याच्या शरीराचे तुकडे करुन फेकून दिलं”, असा कबुली जबाब बाबाक यांच्या वडिलाने दिला. या जबाबानंतर पोलिसांनी बाबाक यांच्या आई-वडिलांना अटक केली (Iranian filmmaker Babak Khorramdin murdered by parents for being unmarried).

हत्येचा कोणताही पश्चात्ताप नाही : वडील

“माझा मुलगा अविवाहित होता. तो आम्हाला वारंवार त्रास द्यायचा. आमचं आयुष्य टांगणीला लागलं होतं. आम्ही सुरक्षित आहोत, असं आम्हाला वाटत नव्हतं. तो आम्हाला वारंवार टोमणे द्यायचा. त्याला जे हवं ते तो करायचा. त्यामुळे त्याची आई आणि मी त्याच्यापासून सुटका मिळवण्याचा निर्णय घेतला. आम्हाला आमच्या प्रतिष्ठेला आणखी गमवायचं नव्हतं.”, असं आरोपी पित्याने म्हटलं आहे. तसंच आम्हाला या कृत्याचा काहीच पश्चात्ताप नाही, असंही त्याने म्हटलंय. दरम्यान, पत्रकार गोलनार मोतेवल्ली यांच्या एका ट्विटनुसार, संबंधित आरोपी दाम्पत्याने आधी आपली मुलगी आणि जावायाचीही हत्या केली होती.

बाबाक खोरमदीन कोण आहे?

बाबाक खोरमदीव यांचा जन्म 1974 साली तेहरानमध्ये झाला होता. त्यांनी 2009 साली तेहरान विद्यापीठातून फॅकल्टी ऑफ फायन आर्ट्समधून सिनेना क्षेत्रासाठीची मास्ट डिग्रीचं शिक्षण घेतलं. त्यानंतर ते 2010 मध्ये पुढील शिक्षणासाठी लंडनला गेले. तिथे त्यांनी अनेक चित्रपट बनवले. यामध्ये ‘Colorless Blonde Corrupted’, ‘Tuesday: Mom’, ‘Rosen’ आणि ‘Cut’ यांचा समावेश आहे. तसेच खोरमदीन यांचा ‘The Oath Letter for Yasar’ या चित्रपटाला खूप लोकप्रियता मिळाली होती.

हेही वाचा : ती कामयानी एक्सप्रेसमध्ये चढली, सोबत कुणी नाही बघून तोही चढला, पोलीस असल्याचं बतावलं आणि…….

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.