AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ट्रम्पचा सद्दाम हुसैन होणार की गद्दाफी?; राष्ट्रपती असतानाच फरार होण्याचा प्रयत्न?

अमेरिकेच्या संसद परिसरात मावळते राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी केलेल्या हिंसाचार घडवून आणला. (is donald trump will leave america?)

ट्रम्पचा सद्दाम हुसैन होणार की गद्दाफी?; राष्ट्रपती असतानाच फरार होण्याचा प्रयत्न?
| Updated on: Jan 09, 2021 | 12:46 PM
Share

वॉशिंग्टन: अमेरिकेच्या संसद परिसरात मावळते राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी केलेल्या हिंसाचार घडवून आणला. त्यामुळे ट्रम्प यांच्यावर चोहोबाजूने टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतीपदाची सूत्रे नवे राष्ट्रपती जो बायडेन यांच्याकडे सोपवण्यापूर्वीच ट्रम्प फरार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ट्रम्प यांचा सद्दाम हुसैन होणार की गद्दाफी याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. (is donald trump will leave america?)

येत्या 20 जानेवारी रोजी जो बायडेन अमेरिकेचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेणआर आहे. मात्र, त्यापूर्वीच म्हणजे 19 जानेवारी रोजीच ट्रम्प हे अमेरिका सोडून जाण्याच्या तयारीत आहेत. 19 जानेवारी रोजी ट्रम्प हे स्कॉटलंडला जाणार आहेत. त्यासाठी त्यांचं विमानही तयार आहे. त्यामुळे पदावर राहतानाच ट्रम्प देश सोडून जाऊ शकतात, असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. डोनाल्ड ट्रम्प हे निवडणुकीतील पराभव स्वीकारण्यास तयार नाहीत. त्यामुळेच आपल्या नावापुढे माजी राष्ट्रपती हा शब्दच नको म्हणून त्यांनी अमेरिकेतून फरार होण्याचा प्लान केल्याचंही राजकीय विश्लेषकांचं मत आहे.

ट्रम्प यांना तुरुंगवास?

दुसरीकडे ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांना तुरुंगात टाकलं जाण्याचीही शक्यता आहे. एका अहवालानुसार, ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग चालवण्यात यावा असं 200 हून अधिक खासदारांना वाटत आहे. तात्काळ हा महाभियोग चालवून ट्रम्प यांना 20 जानेवारीपदीच पदावरून हटवण्यात यावं असंही या खासदारांना वाटत आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या पुढच्या काळात सद्दाम हुसैन किंवा गद्दाफी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

चिथावणीखोर भाषण भोवणार?

ट्रम्प यांनी चिथावणीखोर भाषणं देऊन त्यांच्या समर्थकांना भडकावलं. त्यामुळे 20 जानेवारी रोजी राष्ट्रपतीपदाचा राजीनामा देताच हिंसा भडकवल्याप्रकरणी त्यांना अटक करण्याची मागणीही होत आहे. या शिवाय ट्रम्प यांच्याविरोधात त्यांच्याच रिपब्लिकन पक्षाचे खासदारही गेले आहेत. त्यामुळे त्यांच्याच पक्षात दोन गट पडले आहेत.

ट्रम्प विरोधात सबळ पुरावे

ट्रम्प यांच्या चिथावणीखोर भाषणानंतरच हिंसा भडकल्याचे अमेरिकेच्या तपास यंत्रणेकडे सबळ पुरावे आहेत. या हिंसेला ट्रम्पच जबाबदार आहेत. त्यांनी गुन्हा केलाय. त्यांच्याविरोधात खटला भरला पाहिजे, असं कॉर्नेल लॉ इन्स्टिट्यूटचे प्राध्यापक डेव्हिड ओहिन यांनी सांगितलं.

कोण आहेत गद्दाफी आणि सद्दाम हुसैन?

कर्नल मुअम्मर गद्दाफी हे लिबीयाचे हुकूमशहा होते. त्यांनी 42 वर्षे लिबीयावर राज्य केलं. लिबीयाचा माथेफिरू सत्ताधारी म्हणून त्यांची ओळख होती. नाटोने केलेल्या हवाई हल्ल्यात गद्दाफी यांचा मृत्यू झाला. त्यामुळे एका हिंसक पर्वाचा अंत झाला होता. तर, मानवतेच्या विरोधात केलेल्या गुन्ह्यात दोषी आढळल्याने इराकचा माजी राष्ट्रपती सद्दाम हुसैन यांना बगदादमध्ये फाशी देण्यात आली होती. गद्दाफी आणि हुसैन या दोघांनीही जगावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. (is donald trump will leave america?)

संबंधित बातम्या:

जेव्हा अमेरिकेच्या अध्यक्षाचं ट्विटही हटवलं जातं..

दोन भारतीय वंशाच्या अधिकाऱ्यांचा व्हाईट हाऊस सिक्‍युरिटी काऊंसिलमध्ये समावेश, बायडन यांची घोषणा

डोनाल्ड ट्रम्पना हटवलं जाऊ शकतं का? कसे? वाचा ‘अमेरिकन यादवीतली’ मोठी बातमी

(is donald trump will leave america?)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.