इस्रायलने 48 तासांत केले 3 लाख सैन्य एकत्र, आता हमासची खैर नाही

israel palestine war : इस्रायलने गेल्या ४८ तासात तीन लाखाहून अधिक सैन्य जमवले आहे. शनिवारी हमासकडून दक्षिण इस्रायलमध्ये हल्ला करण्यात आला. त्यानंतर घुसखोरी करुन नागरिकांना ठार करण्यात आले. यानंतर आता इस्रायलने युद्धाची घोषणा केली असून युद्ध आम्ही संपवणार असे पंतप्रधान नेतन्याहू म्हणाले आहेत.

इस्रायलने 48 तासांत केले 3 लाख सैन्य एकत्र, आता हमासची खैर नाही
Follow us
| Updated on: Oct 10, 2023 | 12:06 PM

Israel – hamas War : इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षामुळे 700 इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर 2300 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. आयडीएफने म्हटले आहे की, इस्त्रायली नागरिकांवरील हा सर्वात मोठा हल्ला आहे. इस्रायल डिफेन्स फोर्सेसचे प्रवक्ते मेजर लिबी वेस यांनी सांगितले की, गेल्या दोन दिवसांत आम्ही जे पाहिले ते इस्रायलच्या इतिहासातील इस्रायली नागरिकांविरुद्धचे सर्वात मोठे हत्याकांड आहे. तर लेफ्टनंट कर्नल जोनाथन कॉन्रिकस यांनी सांगितले की, 2300 हून अधिक लोक जखमी झाले असून 700 हून अधिक लोक मारले गेले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

हमासकडून युद्धाची सुरुवात

या घटनेची सुरुवात 7 ऑक्टोबर रोजी झाली, जेव्हा हमासने दक्षिण इस्रायली शहरावर सुमारे 5,000 रॉकेट डागले. सोमवारी रात्री आयडीएफचे प्रवक्ते लिबी बेस यांनी सांगितले की, हमासला पाठिंबा देणाऱ्यांचाही हमास हल्ल्यातील भूमिकेचा विचार केला जाईल. आम्हाला माहित आहे की ऐतिहासिकदृष्ट्या इराण हा हमासचा सर्वात मजबूत समर्थक आहे. हमासने जे काही केले त्यात इराणचा पूर्णपणे सहभाग आहे, असे आमचे मत आहे. त्याचवेळी, ओलिसांची सुटका करण्याच्या प्रश्नावर, बेस म्हणाले की आम्हाला हे समजले आहे आणि IDF त्यांना नक्कीच परत आणेल. या टप्प्यावर आपण जास्त माहिती देऊ शकत नाही. नागरिक, महिला, लहान मुले आणि वृद्धांनाही ओलीस ठेवण्यात आल्याचे सांगितले.

इस्रायलने 3 लाख सैन्य जमा केले

इस्रायलने गाझा पट्टी ताब्यात घेण्यासाठी गेल्या ४८ तासांत तीन लाख सैन्य जमा केले आहे. रिअर अॅडमिरल रँकच्या अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही खूप कमी वेळात वेगवेगळ्या राखीव दलांचे सैन्य एका ठिकाणी एकत्र केले आहे. 1973 नंतरची ही सर्वात मोठी जमावबंदी आहे. दुसरीकडे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हे युद्ध आम्ही सुरू केले नसून ते आम्ही संपवू, असे सांगितले. इस्रायलवर हल्ला करणाऱ्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील आणि आम्ही प्रत्येकाला संपवल्यानंतरच थांबू, असे पंतप्रधान म्हणाले.

शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य.
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.