AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इस्रायलकडून एअर स्ट्राईक, गाझा सीमा पूर्णपणे ताब्यात घेत इतक्या दहशतवाद्यांचा केला खात्मा

Israel attack on Hamas : इस्रायलने आता हमास विरुद्धचे हल्ले आणखी वाढवले आहेत. हमासकडून नागरिकांना वेठीक धरुन हल्ले रोखण्याचा इशारा देण्यात आला आहे. हमासने ज्या भागातून इस्रायलमध्ये प्रवेश केला ती सीमा इस्रायलच्या सैनिकांनी आता पूर्णपणे ताब्यात घेतली आहे.

इस्रायलकडून एअर स्ट्राईक, गाझा सीमा पूर्णपणे ताब्यात घेत इतक्या दहशतवाद्यांचा केला खात्मा
| Updated on: Oct 10, 2023 | 2:47 PM
Share

Israel vs Hamas War : इस्रायलने गाझामधील हमासच्या 200 हून अधिक स्थानांवर क्षेपणास्त्रांनी मारा केलाय. या भीषण हल्ल्यानंतर हमासचे कंबरडे मोडले आहे. इस्रायलने केलेल्या हल्ल्यात अनेक इमारती, रस्ते, पूल उद्ध्वस्त झाले आहेत. दरम्यान इस्रायल संरक्षण दलाने दावा केला आहे की, आतापर्यंत 1500 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी इस्रायलने गाझा सीमा पूर्णपणे ताब्यात घेतली आणि सुरक्षित केली असल्याचा ही दावा करण्यात आला आहे. ही तीच सीमा आहे जिथे हमासच्या दहशतवाद्यांनी सुमारे 20 ठिकाणांहून घुसखोरी करून रॉकेट डागून नागरिकांवर गोळीबार केला होता.

इस्रायल-हमास युद्धाबाबत अपडेट

    • इस्रायलने गाझा पट्टीतील 200 ठिकाणी हवाई हल्ले केले.  हवाई हल्ले न थांबवल्यास ओलिसांना ठार मारण्याची धमकी हमासने दिलीये.
    • इस्रायलचे पंतप्रधान म्हणाले की, एअर स्ट्राइक ही फक्त सुरुवात आहे, आता आणखी नुकसान सहन करावे लागणार आहे.
    • इस्रायलने गाझामधील सामान्य लोकांना इजिप्त कॉरिडॉरमधून जाण्यास सांगितले परंतु आता तेही बंद करण्यात आले आहे.युनिसेफने
    • मानवतावादी कॉरिडॉरची मागणी केली आहे, जेणेकरून जखमींवर योग्य उपचार करता येतील.
    • आत्तापर्यंत 1500 दहशतवाद्यांचे मृतदेह सापडल्याचे इस्रायलने म्हटले आहे.
    • आतापर्यंत इस्रायलमधील 900 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये संगीत महोत्सवातील 260 मृतदेहही आहेत.
    • इस्रायलच्या हवाई हल्ल्यात 690 जणांचा मृत्यू झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे.
    • गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने सुरक्षित कॉरिडॉरची मागणी केली आहे कारण इस्रायल जोरदार बॉम्बफेक करत आहे.

हमास-इस्रायल युद्ध

शनिवारी, 7 ऑक्टोबर 2023 रोजी पहाटे पॅलेस्टाईनमधील हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर सुमारे 5000 रॉकेट डागले. एवढेच नाही तर दहशतवादी इस्रायलच्या परिसरात घुसले आणि नागरिकांवर गोळीबारही केला. दहशतवाद्यांनी अनेक कुटुंबांना बंधक बनवून आपल्यासोबत नेले. यानंतर इस्रायलने प्रत्युत्तरादाखल युद्धाची घोषणा केली. शनिवारी संध्याकाळपासून जल, जमीन आणि हवा अशा तिन्ही बाजूंनी सातत्याने हल्ले केले जात आहेत.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.