Israel Palestine War : इस्राईलमधून भारतासाठी सर्वात मोठी दिलासादायक बातमी

Israel hamas War : इस्रायल आणि हमास या दशतवादी संघटनेमध्ये सध्या युद्ध सुरु आहे. जगातील सर्व लोकांचं लक्ष याकडे लागले आहे. अनेक पर्यटक इस्राईलमध्ये अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. यामध्ये भारतीय पर्यटकांची संख्या ही अधिक आहे.

Israel Palestine War : इस्राईलमधून भारतासाठी सर्वात मोठी दिलासादायक बातमी
Follow us
| Updated on: Oct 09, 2023 | 5:38 PM
Israel Palestine War : इस्रायली लष्कर आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. ज्यामध्ये आतापर्यंत हजारो लोकं मारली गेली आहेत. त्यातच भारतासाठी एक दिलासादायक बातमी आली आहे. इस्रायलमध्ये उपस्थित असलेले सर्व 18000 हून अधिक भारतीय सुरक्षित आहेत. ते सर्व भारतीय दूतावासाच्या संपर्कात आहेत.

इस्रायलमध्ये भारतीय आयटी व्यावसायिकांची संख्या मोठी आहे. यासोबतच मोठ्या संख्येने विद्यार्थी तेथे शिक्षणासाठी जातात. भारतीय वंशाचे 85 हजार ज्यूही इस्रायलमध्ये राहतात. 1950-60 च्या दशकात भारतातून मोठ्या संख्येने ज्यू इस्रायलमध्ये गेले होते.

भारतीय पर्यटकांचा दूतावासाशी संपर्क

इस्रायलमध्ये राहणारे सर्व भारतीय सुरक्षित असल्याची माहिती सरकारी सूत्रांकडून मिळाली आहे. पाच भारतीय पर्यटकांनी सुरक्षित परतण्यासाठी भारतीय दूतावासाशी संपर्क साधला आहे. इस्रायलमधील भारतीय दूतावासाने भारतीय लोकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. इस्रायलमध्ये भारतीय विद्यार्थ्यांची संख्या 900 च्या आसपास आहे.

हमास आणि इस्लामिक जिहादच्या 500 ठिकाणांवर हल्ले

इस्रायली लष्कराने शनिवारी आणि सोमवारी सकाळी गाझा पट्टीमध्ये 500 हून अधिक हमास आणि इस्लामिक जिहाद ठिकाणांवर हल्ला केला. इस्रायली लष्कराचे प्रवक्ते रिअर अॅडमिरल डॅनियल हगरी यांनी सांगितले की, गाझा सीमेवर सहा ठिकाणी चकमक सुरू आहे. रविवारी रात्री 70 दहशतवाद्यांनी बेरीमध्ये घुसखोरी केली. त्यापैकी बहुतेक सैनिकांशी लढताना मरण पावले.

गाझामध्ये जमिनीवर चकमक सुरू असल्याचे इस्रायली लष्कराने म्हटले आहे. हमासची लष्करी क्षमता नष्ट करण्यासाठी इस्रायली गाझामध्ये घुसले आहेत. गाझामधील हमासची राजवट संपुष्टात आणण्याच्या लढाईत एक लाख इस्रायली सैनिक सहभागी होणार आहेत.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.