AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताशी पंगा घेणे मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांना पडलं भारी? आली खुर्ची गमवण्याची वेळ

maldive president : 28 जानेवारी रोजी मालदीवच्या संसदेत एकच गोंधळ झाला. कारण सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी आणि विरोधी पक्षाने कामकाजात व्यत्यय आणला, ज्यामुळे अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांच्या नवीन मंत्रिमंडळाच्या मंजुरीवर मतदानादरम्यान खासदारांमध्ये हाणामारी झाली.

भारताशी पंगा घेणे मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांना पडलं भारी? आली खुर्ची गमवण्याची वेळ
| Updated on: Jan 29, 2024 | 3:56 PM
Share

India-maldive raw : मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्या अडचणी वाढल्या आहेत. भारतासोबत पंगा घेणाऱ्या मोहम्मद मुइज्जू यांना त्यांचे पद गमवावे लागू शकते. मालदीवचा मुख्य विरोधी पक्ष एमडीपी आणि त्याच्या मित्र पक्षांनी संसदेत राष्ट्राध्यक्षांविरुद्ध महाभियोग प्रस्ताव आणण्यास सहमती दर्शविली आहे. मालदीवमधून येत असलेल्या वृत्तानुसार, मालदीव एमडीपी संसदीय गटाने अध्यक्ष मुइज्जू यांच्याविरुद्ध महाभियोग सादर करण्यास सहमती दर्शविली आहे. संसदेत एमडीपीचे बहुमत आहे, त्यामुळे अध्यक्ष मुइज्जू यांना त्यांचे पद वाचवणे फार कठीण दिसतेय.

राष्ट्रध्यक्षांविरुद्ध महाभियोग आणण्याची तयारी

एमडीपीने डेमोक्रॅट्सच्या भागीदारीत महाभियोग प्रस्तावासाठी पुरेशा स्वाक्षऱ्या गोळा केल्या आहेत. एमडीपी खासदाराने सोमवारी दुपारी सांगितले की. मालदीवचा मुख्य विरोधी पक्ष भारत समर्थक आहे आणि त्याला संसदेत बहुमत आहे, त्यामुळे MDP ला राष्ट्रध्यक्षांविरुद्ध महाभियोग आणणे खूप सोपे मानले जात आहे. मुइज्जू यांची खुर्ची आता धोक्यात आली आहे. मालदीवच्या राजकारणात ही नवीन घडामोड आली आहे. मालदीवच्या संसदेत चीन समर्थक अध्यक्ष मुइज्जू यांच्या मंत्रिमंडळातील चार सदस्यांना मंजुरी देण्यावरून मतभेदांवरून सरकार समर्थक खासदार आणि विरोधी खासदारांमध्ये संघर्ष सुरू झाल्यानंतर आला आहे.

दोन खासदारांमध्ये हाणामारी

प्रमुख विरोधी पक्ष MDP ने मंत्रिमंडळावर मतदान करण्यापूर्वी राष्ट्रपतींच्या मंत्रिमंडळाच्या चार सदस्यांना संसदीय मान्यता रोखण्याचा निर्णय घेतला. यानंतर सरकार समर्थक खासदारांनी संसदेच्या कामकाजात व्यत्यय आणत निषेध करण्यास सुरुवात केली. खासदार अब्दुल्ला शहीम आणि खासदार अहमद इसा यांच्यात वाद झाला. हाणामारीत दोन्ही खासदार चेंबरजवळ पडले, त्यामुळे शाहीम यांच्या डोक्यालाही दुखापत झाली. अल्पसंख्याक नेते मुसा सिराज यांनी वाद थांबवण्याचा प्रयत्न केला होता.

मुइज्जू यांचे जाणे निश्चित का मानले जात आहे?

मालदीवच्या संसदेत 87 जागा आहेत, त्यापैकी प्रमुख भारत समर्थक विरोधी पक्ष एमडीपीकडे 43 जागा आहेत, तर त्यांचा सहयोगी डेमोक्रॅटिक पक्षाकडे 13 जागा आहेत. या दोघांची युती झाली असून त्यांच्याकडे एकूण 56 जागा आहेत. याशिवाय, मालदीवमध्ये राष्ट्राध्यक्षांविरुद्ध महाभियोग आणण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे आणि महाभियोग आणण्यासाठी संसदेत केवळ 56 मतांची आवश्यकता आहे, जी या दोन्ही पक्षांकडे आहे. संसदेत अद्याप महाभियोग प्रस्ताव मांडण्यात आलेला नसला तरी त्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. अशा स्थितीत संसदेत महाभियोग प्रस्ताव मांडला गेला तर मोहम्मद मुइज्जू यांचे अध्यक्षपद गमवावे लागेल.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.