सेक्स, हस्तमैथून आणि गर्भपात… पोप फ्रान्सिस बरंच काही बोलले; असं काय बोलले की ज्याची सोशल मीडियावर होतेय चर्चा?

व्हॅटिकन सिटीचे पोप फ्रान्सिस यांची एक मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. एका डॉक्युमेंट्रीत त्यांची मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. त्यात त्यांनी सेक्स, गर्भापात, समलैंगिक समुदाय आणि हस्तमैथून आदी मुद्द्यावर भाष्य केलं आहे.

सेक्स, हस्तमैथून आणि गर्भपात... पोप फ्रान्सिस बरंच काही बोलले; असं काय बोलले की ज्याची सोशल मीडियावर होतेय चर्चा?
Pope Francis Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 06, 2023 | 1:28 PM

वॉशिंग्टन : पोप फ्रान्सिस यांची मुलाखत असलेली एक डॉक्युमेंट्री प्रसिद्ध झाली आहे. ज्या विषयाला लोक नाके मुरडतात त्याच विषयावर पोप फ्रान्सिस यांनी परखड मते व्यक्त केली आहेत. पोप फ्रान्सिस यांनी सेक्सच्या गुणांची प्रशंसा केली आहे. देवाने मानवाला दिलेली ही सर्वोत्तम भेट असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी हस्तमैथूनावरही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सेक्सपेक्षा इतर कोणतीही गोष्ट सेक्सचा रिचनेस कमी करत नाही, असं पोप फ्रान्सिस यांनी म्हटलं आहे. या शिवाय समलैंगिक संबंध आणि समुदाय, तसेच गर्भपात आदी विषयांवरही त्यांनी आपली रोखठोक मते व्यक्त केली आहे.

‘द पोप अन्सवर्स’ या डिझ्ने प्रोडक्शनच्या डॉक्युमेंट्रीत त्यांनी ही मते व्यक्त केली आहेत. गेल्या वर्षी पोप यांनी सुमारे 20 वर्षाच्या 10 तरुणांसोबत चर्चा केली होती. त्या चर्चेवर आधारित ही डॉक्युमेंट्री आहे. या डॉक्युमेंट्रीत पोप यांना कॅथलिक चर्चमध्ये एलजीबीटींचे अधिकार, गर्भपात, पॉर्न इंडस्ट्री, सेक्स, धर्म आणि लैंगिक शोषण यासह इतर विषयांवर प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्यावर पोप यांनी आपली मतेही प्रकट केली आहेत. यावेळी त्यांना सेक्स आणि हस्तमैथूनावर विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी देवाने मानवाला दिलेल्या सर्वात सुंदर गोष्टींपैकी सेक्स ही एक गोष्ट आहे, असं पोप यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

त्यांचं स्वागत करा

हस्तमैथूनावरही त्यांनी भाष्य केलं आहे. हस्तमैथून म्हणजे सेक्शुअरली अभिव्यक्ततेचा रिचनेस आहे. त्यामुळे वास्तविक शारीरिक संबंधाशिवायची कोणतीही वेगळी गोष्ट तुम्हाला आणि सेक्सच्या रिचनेसला कमी करते, असं त्यांनी सांगितलं. नॉन बायनरी पर्सन कशाला म्हणतात हे माहीत आहे काय? असं त्यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी आपल्या आधीच्याच मतांचा पुनरुच्चार केला. कॅथलिक चर्चने एलजीबीटी समुदायाच्या लोकांचं स्वागत केलं पाहिजे, असं ते म्हणाले. सर्वच देवाची मुलं आहेत. देव कुणाचाही अस्वीकर करत नाही. देव एक पिता आहे. त्यामुळे मला चर्चमधून काढून टाकण्याचा कुणालाही अधिकार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

गर्भपाताचं समर्थन नाही

गर्भपात करणाऱ्या महिलांबाबत पाद्रींनी दयाळू असावं. मात्र, गर्भपाताच्या प्रथेचा स्वीकार केला जाऊ शकत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. एखाद्या महिलेने गर्भपात केला असेल तर तिला साथ देणं ही एक वेगळी गोष्ट आहे. आणि गर्भपाताचं समर्थन करणं ही दुसरी गोष्ट आहे. या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं.

सोशल मीडियात चर्चा

पोप फ्रान्सिस यांच्या या मुलाखतीचा भाग व्हॅटिकन चर्चच्या L’Osservatore Romano या वृत्तपत्रात छापण्यात आला आहे. तरुणांसोबत पोप यांनी केलेली ही चर्चा मनमोकळी आणि प्रामाणिक असल्याचं या वर्तमानपत्राने म्हटलं आहे. पोपच्या या मुलाखतीची सोशल मीडियात प्रचंड चर्चा होत आहे. या चर्चेचं तरुणांनी स्वागत केलं आहे. खरे सांगते, पोप असं बोलतील यावर मला विश्वासच बसत नाहीये, असं एका महिलेने ट्विटमध्ये म्हटलं आहे. तर दुसऱ्या एका यूर्जर्सने मस्करीच्या सूरात ते खरोखरच पोप होते ना? की एआय (Artificial Intelligenc) ने बनवलेलं त्यांचं एक रुप होतं? असा सवाल केला आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.