23000 वर्षांपूर्वी उत्तरी अमेरिकेत माणसं राहायची, आशिया ते अमेरिका स्थलांतर, पायांच्या ठशांनी इतिहास जिवंत केला!

Fossilised footprints: व्हाइट सँड्स नॅशनल पार्कमधील कोरड्या तलावात पावलांचे ठसे सापडले आहेत. या खुणा पहिल्यांदा 2009 मध्ये पार्कच्या व्यवस्थापकानी पाहिल्या होत्या.

23000 वर्षांपूर्वी उत्तरी अमेरिकेत माणसं राहायची, आशिया ते अमेरिका स्थलांतर, पायांच्या ठशांनी इतिहास जिवंत केला!
हे ठसे लहान मुलं किंवा तरुणांच्या पायाचे ठसे आहेत, जे हिमयुगात इथं राहत होते.
Follow us
| Updated on: Sep 24, 2021 | 10:45 AM

न्यू मेक्सिको : अमेरिकेमध्ये सापडलेल्या जीवाश्मांच्या पावलांचे ठसे सांगतात की, सुरुवातीचे मानव सुमारे 23,000 वर्षांपूर्वी उत्तर अमेरिकेत फिरत होते. संशोधकांनी गुरुवारी ही माहिती दिली. व्हाइट सँड्स नॅशनल पार्कमधील कोरड्या तलावात पावलांचे ठसे सापडले आहेत. या खुणा पहिल्यांदा 2009 मध्ये पार्कच्या व्यवस्थापकानी पाहिल्या होत्या. यूएस जियोलॉजिकल सर्व्हेच्या शास्रज्ञांनी पावलांमध्ये फसलेल्या बियांचं विश्लेषण केलं. यानंतर त्यांनी सांगितले की, या बिया सुमारे 22,800 आणि 21,130 वर्ष जुन्या आहेत. ( Man lived in North America 23000 years ago, footprints found. Migration from Asia to America, big claim in research)

बहुतेक शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, प्राचीन काळी मानवांचे स्थलांतर जमिनीवरील काही पुलांवरुन झालं असावे. हे पूल आता पाण्यात बुडाले आहेत. त्यांना असा विश्वास आहे की, हाच लँड ब्रिज आशियाला अलास्काशी जोडण्याचं काम करायचा. दगडांची अवजारं, जीवाश्मांची हाडं आणि जेनिटीक एनालिसिससारख्या गोष्टींचा अभ्यास करण्यात आला, त्यातून संशोधकांनी मानवाच्या अमेरिकेत स्थलांतर करण्याच्या संभाव्य तारखांची माहिती दिली. ते म्हणतात की, मानव 13,000 ते 26,000 वर्षांपूर्वी किंवा त्याहून आधी अमेरिकेत आले असावे.

लहान मुलं आणि तरुणांच्या पायाचे ठसे

लेखक म्हणतात की, माणूस या काळाच्या खूप आधी इथं आला होता. त्यांनी लिहिलं की, जीवाश्म पावलांचे ठसे सांस्कृतिक कलाकृती, सुधारित हाडं किंवा इतर पारंपारिक जीवाश्मांपेक्षा चांगला पुरावा आहेत. त्यांच्या मते, सध्या ज्या गोष्टी मांडल्या जातात, त्या एका ठराविक वेळ आणि स्थानाचा पुरावा देतात. पायाच्या ठशांवर संशोधन करणाऱ्या संशोधकांचा असा विश्वास आहे की, हे ठसे लहान मुलं किंवा तरुणांच्या पायाचे ठसे आहेत, जे हिमयुगात इथं राहत होते. हे संशोधन गुरुवारी सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालं. व्हाईट सँड्स नॅशनल पार्कमध्ये यापूर्वी केलेल्या उत्खननात टोकदार दातांची मांजर, लांडगा, कोलंबियन विशाल मॅमथ, जो हत्तीच्या वंशातील आहे आणि इतर हिमयुगातील प्राण्यांचे जिवाश्म सापडले.

2000 वर्षांपूर्वी इथं माणसं राहायची

व्हाईट सँड्स आता वाळवंटीय प्रदेश आहे. पण ज्यावेळी हे पावलांचे ठसे उमटले, त्यावेळी या परिसरात मुबलक पाणी होतं, आणि जमिनही हिरवीगार होती. हा प्रदेश हत्तीच्या कुळातील हे मॅमथ, ग्राउंड स्लॉथ, गुरेढोरं आणि जंगली उंटांचे घर होतं. त्यावेळी या प्राण्यांची शिकार पाषाण युगातील मानवांनी केली. थॉमस अर्बन, या संशोधनाचे सह-लेखक आणि कॉर्नेल विद्यापीठातील पुरातत्वशास्त्रज्ञ म्हणाले, “पावलांचे ठसे प्राण्यांच्या मार्गांशी संबंधित आहेत. हे दर्शवतात की, मानव किमान 2000 वर्षेापूर्वी इथं वास्तव्यास होता.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.