AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mehul Choksi Arrested: पीएनबी घोटाळ्यातील फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला अटक, बेल्जियममधून भारतात आणणार

Mehul Choksi Arrested: मेहुल चोक्सी याने पंजाब नॅशनल बँकेकडून १३,५०० कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा केला होता. अटकेपासून वाचण्यासाठी तो भारतातून बेल्जियममध्ये फरार झाला होता. तो तेथे त्याची पत्नी प्रीती चोक्सीसोबत अँटवर्पमध्ये राहत होता.

Mehul Choksi Arrested: पीएनबी घोटाळ्यातील फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला अटक, बेल्जियममधून भारतात आणणार
मेहुल चोक्सी
| Updated on: Apr 14, 2025 | 8:02 AM
Share

Mehul Choksi Arrested: पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली आहे. भारतीय सुरक्षा एजन्सींच्या विनंतीवरून चोक्सीला अटक झाली. केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने बेल्जियममधील सरकारकडे विनंती केली होती. त्यानंतर ६५ वर्षीय मेहुल चोक्सी याला शनिवारी अटक करण्यात आली होती. तो आता तुरुंगात आहे.

पत्नीसह बेल्जियममध्ये राहत होता…

मेहुल चोक्सी याने पंजाब नॅशनल बँकेकडून १३,५०० कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा केला होता. अटकेपासून वाचण्यासाठी तो भारतातून बेल्जियममध्ये फरार झाला होता. तो तेथे त्याची पत्नी प्रीती चोक्सीसोबत अँटवर्पमध्ये राहत होता. प्रीती चोक्सीकडे बेल्जियमचे नागरिकत्व आहे. चोक्सीकडे बेल्जियममध्ये ‘एफ रेसिडेन्सी कार्ड’ आहे.

मेहुल चोक्सीला अटक करताना बेल्जियम पोलिसांनी मुंबई न्यायालयाने त्याच्याविरुद्ध जारी केलेल्या दोन अटक वॉरंटचा हवाला दिला. याबाबत इकोनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, मुंबई न्यायालयाने वॉरंट २३ मे २०१८ आणि १५ जून २०२१ रोजी जारी करण्यात आले होते.

काय आहे प्रकरण

पीएनबीमधून १३,८५० कोटी रुपयांची फसवणूक प्रकरणात मेहुल चोक्सीवर सीबीआय आणि ईडीकडून खटला दाखल केला आहे. या प्रकरणात चोक्सीचा पुतण्या नीरव मोदीसुद्धा आरोपी आहे. तो लंडनमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. त्याचे प्रत्यार्पण होण्याची शक्यता आहे. मेहुल चोक्सी जानेवारी २०१८ मध्ये त्याचा पुतण्या नीरव मोदीसह भारतातून पळून गेला होता. पंजाब नॅशनल बँकेतील कर्ज घोटाळ्याचे प्रकरण उघडकीस येण्यापूर्वीच हे दोघेही देश सोडून गेले होते. हा भारतातील दुसरा सर्वात मोठा बँक घोटाळा होता.

मेहुल चोकसी यापूर्वी अटक

मेहुल चोकसी याला यापूर्वी २०२१ मध्ये अटक झाली होतो. तेव्हा तो क्युबाला जात होता, त्यावेळी त्याला डोमिनिकामध्ये पकडण्यात आले होते. यानंतर मेहुलने म्हटले होते की, राजकीय कट रचल्यामुळे हे खटले त्याच्याविरुद्ध चालवले जात आहेत. ईडीने भारतातील त्यांच्या मालमत्ता बेकायदेशीरपणे जप्त केल्या आहेत. २०१८ मध्ये इंटरपोलने त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती.

२०१८ मध्ये ईडीने चोक्सीच्या १,२१७ कोटी रुपयांच्या ४१ स्थावर मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केल्या होत्या. जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये मुंबईतील आलिशान भागात असलेले त्याचे दोन फ्लॅट, कोलकातामधील एक मॉल, मुंबई-गोवा महामार्गावरील २७ एकर जमीन यांचा समावेश आहे.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.