युरोपात कोरोनाचा कहर, डिसेंबरपर्यंत 2 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता; WHO ला भीती

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) युरोपियन देशांमध्ये कोरोना लसीकरणाच्या संथ गतीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. WHO ने अशी भीतीही व्यक्त केली आहे की, 1 डिसेंबरपर्यंत युरोपात 2 लाख 36 हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होऊ शकतो.

युरोपात कोरोनाचा कहर, डिसेंबरपर्यंत 2 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता; WHO ला भीती
Tedros Adhanom Ghebreyesus
Follow us
| Updated on: Aug 30, 2021 | 11:33 PM

नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) युरोपियन देशांमध्ये कोरोना लसीकरणाच्या संथ गतीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने अशी भीतीही व्यक्त केली आहे की, या वर्षी 1 डिसेंबरपर्यंत युरोपमध्ये सुमारे 2 लाख 36 हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होऊ शकतो. यावेळी कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने युरोपियन देशांमध्ये कहर केला आहे. युरोपमध्ये लसीकरणाच्या गतीमध्येही मंदी आली आहे. तथापि, आतापर्यंत जागतिक आरोग्य संघटना गरीब देशांमध्ये लसीकरणाबद्दल चिंतेत होती. हेच कारण आहे की जागतिक आरोग्य संघटनेने काही युरोपियन देशांच्या वतीने बूस्टर डोस सुरु करण्यास अनिच्छा व्यक्त केली होती. (more than 2,36,000 Covid-19 Deaths In Europe By December 1: WHO’s Warning)

त्याच वेळी, जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) युरोप शाखेच्या प्रमुखाने असे म्हटले आहे की, ते अमेरिकन सरकारच्या शीर्ष संसर्गजन्य रोग तज्ज्ञांच्या मताशी सहमत आहेत. कोविड -19 लसीचा तिसरा डोस अतिसंवेदनशील लोकांचे संसर्गापासून संरक्षण करण्यास मदत करू शकतो, असे त्यांना वाटते. संक्रमणाचा उच्च प्रसार अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगून डॉ. हंस क्लुगे म्हणाले की, युरोप क्षेत्रामध्ये समाविष्ट असलेल्या 53 देशांपैकी 33 देशांमध्ये गेल्या एका आठवड्यात 10 टक्के किंवा त्याहून अधिक वाढ झाली आहे.

यूकेमध्ये 12-15 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाची तयारी

दरम्यान, ब्रिटनमधून बातमी आली आहे की, तिथे 12-15 वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्याची तयारी केली जात आहे. मात्र, देशातील लस सल्लागार समितीने या लसीकरण मोहिमेला अद्याप मान्यता दिलेली नाही.

आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे की, मंजुरी मिळताच लसीकरण मोहीम सुरू करण्यास ते तयार आहेत. देशाच्या बहुतांश भागांमध्ये नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असल्याने शाळांमध्ये लस देण्यास तयार असल्याचे विभागाने म्हटले आहे. सप्टेंबरमध्ये येथे शाळा उघडणार आहेत आणि याच काळात ब्रिटनमध्ये कोरोना विषाणू संसर्गाचे प्रमाण आणखी वाढेल, असे बोलले जात आहे.

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात लहान मुलांसाठी कोरोना लस : पूनावाला

सीरम इन्स्टिट्युटचे (Serum Institute) सीईओ अदर पूनावाला (Adar Poonawala) यांनी काही दिवसांपूर्वी एक मोठी घोषणा केली होती. येत्या ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सीरमची लहान मुलांसाठीची कोवोवॅक्स (Covovax) कोरोना लस लॉन्च होणार असल्याचं अदर पूनावाला यांनी म्हटलंय.

सीरम सध्या कोवावॅक्स कोरोना लशीवर संशोधन करत आहे. ही कोरोना प्रतिबंधक लस 12 वर्षांवरील मुलांसाठी विकसित करण्यात येत आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ही लस भारतात लॉन्च केली जाऊ शकते. त्यामुळे भारतातल्या कोरोनाविरोधातल्या लढ्याला आणखी बळ मिळणार आहे. विशेष म्हणजे पुढच्या वर्षी मार्चपर्यंत 12 वर्षाखालील मुलांसाठीची कोरोना लस येऊ शकते असंही पूनावाला यांनी स्पष्ट केलं आहे.

लहान मुलांवर लसीची चाचणी सुरू

सीरम इन्स्टिट्युटकडून 2 ते 17 वर्षे वयोगटातल्या मुलांवर कोरोना लसीची चाचणी (Vaccine Trail) सुरू असल्याची माहिती पूनावाला यांनी दिली. कोवोवॅक्स लसीची दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातली चाचणीसाठी काही शर्थींसह परवानगी देण्याची मागणी सीरम इन्स्टिट्युटे केली आहे. या चाचणीमध्ये देशातल्या 10 शहरांमधली 920 मुलं सहभागी होणार आहेत. ज्यात 2 ते 11 वर्षे आणि 12 ते 17 वर्षे अशा दोन वयोगटातली प्रत्येकी 460 मुलं आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येणार?

मंत्री सतेज पाटील यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचं सतेज पाटील यांनी आज स्पष्ट केलं. या लाटेचा सामना करण्यासाठी सरकार सज्ज असल्याचंही त्यांनी सांगितलं.

सतेज पाटील यानी टीव्ही 9 मराठीशी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. मागच्या वेळी जिल्ह्यात सर्वाधिक 19 हजार रुग्ण होते. यावेळी 29 हजार रुग्ण गृहीत धरून तयारी करण्ता आली आहे. 12 तालुक्यात लवकरच ऑक्सिजन प्लांट सुरू होणार आहे. जिल्ह्यात 80 टक्के लसीकरण झालं आहे, असं सांगतानाच ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात कोरोनाची लाट येईल, असं पाटील म्हणाले.

इतर बातम्या

गणेशोत्सवासाठी गावी जाताय? दोन डोस घेतले असतील तरच रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश, नवी नियमावली जाहीर

तिसऱ्या लाटेसाठी प्रशासनाची तयारी, पुणे जिल्हा ऑक्सिजनसज्ज होण्याच्या मार्गावर!

Corona Third wave : केरळमध्ये एका दिवसात 31 हजार रुग्ण, तिसऱ्या लाटेबद्दल राजेश टोपे काय म्हणाले?

(more than 2,36,000 Covid-19 Deaths In Europe By December 1: WHO’s Warning)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.