मुकेश अंबानी यांच्यापेक्षाही जास्त खर्च, या व्यक्तीने दिली होती जगातील सर्वात महागडी पार्टी

तीन दिवस चाललेल्या या पार्टीच्या बातम्या त्यावेळी माध्यमांमध्ये आल्या. त्यातील खर्च समोर आला. त्यानंतर इराणमधील जनतेने शाह यांच्याविरोधात आंदोलन सुरु केले. देशात 1979 मध्ये परिस्थिती आणखी बिकट झाली होती. त्यामुळे शाह परिवारास देश सोडावा लागला.

मुकेश अंबानी यांच्यापेक्षाही जास्त खर्च, या व्यक्तीने दिली होती जगातील सर्वात महागडी पार्टी
मोहम्मद रेजा शाह पहलवी
Follow us
| Updated on: Jul 25, 2024 | 10:03 AM

मुकेश अंबानी यांच्या मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न १२ जुलै रोजी झाले. या लग्नास जगभरातील दिग्गज, उद्योगपती, बॉलीवूड आणि हॉलीवूडमधील कलाकार उपस्थित होते. त्या लग्नात झालेल्या खर्चाची चर्चा देशात सुरु आहे. या लग्नात सुमारे पाच हजार कोटी रुपये खर्च झाल्याच्या बातम्या माध्यमांमधून दिल्या जात आहेत. यामुळे हे सर्वात महाग लग्न समजले जात आहे. परंतु त्यापेक्षाही महाग पार्टी यापूर्वी झाली आहे. 1971 मध्ये इराणचे शेवटचे राजे मोहम्मद रेजा शाह पहलवी यांनी ही पार्टी दिली होती. पर्शियन साम्राज्याला 2,500 वर्ष पूर्ण झाल्यामुळे ही पार्टी देण्यात आली होती. या पार्टीत 10 कोटी डॉलर खर्च झाले होते. म्हणजेच आजच्या प्रमाणे तो खर्च पाहिल्यास पाच हजार कोटी त्या काळात केला गेलो होतो. या पार्टीत जगभरातील राजे, महाराजे, राष्ट्रप्रमुख आणि हॉलीवूड कलाकार आले होते.

8 टन रेशन, 2700 किलो मीट, 10,000 सोन्याच्या तटांमध्ये जेवण

मोहम्मद रेजा शाह पहलवी यांनी दिलेली ही पार्टी तीन दिवस चालली होती. त्यात जेवणाचे पदार्थ बनवण्यासाठी पॅरीसमधील सर्वात महागड्या हॉटेलचे शेफ बोलवण्यात आले होते. या पार्टीसाठी 8 टन रेशन लागले होते. 2700 किलो मीटचा वापर केला गेला होता. 2500 बोतल शँपेन वापरले गेले होते. 1000 बॉटल बरगंडी वाइनचे वाटप झाले होते. 10,000 सोन्याच्या तटांमध्ये जेवण दिले गेले होते. पाहुण्यांच्या निवासाची व्यवस्था वाळवंटात टेंट सिटी उभारुन केली गेली होती. ही टेंट सिटी उभारण्यासाठी फ्रॉन्समधून 40 ट्रक आणि 100 विमानांमधून सामान आणले गेले होते.

लोकांचा संताप, शाह परिवार प्रसार

तीन दिवस चाललेल्या या पार्टीच्या बातम्या त्यावेळी माध्यमांमध्ये आल्या. त्यातील खर्च समोर आला. त्यानंतर इराणमधील जनतेने शाह यांच्याविरोधात आंदोलन सुरु केले. देशात 1979 मध्ये परिस्थिती आणखी बिकट झाली होती. त्यामुळे शाह परिवारास देश सोडावा लागला. त्यानंतर अयातुल्ला खुमेनी इराणमध्ये परत आले आणि त्या देशात इस्लामी राज्याची स्थापना झाली.

हे सुद्धा वाचा

आधुनिक इतिहासात ही सर्वात महाग पार्टी असल्याचे म्हटले गेले. त्यामुळे त्याची नोंद गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड्समध्येही झाली. त्याकाळातील खर्च पाहिल्यास ही जगातील सर्वात महाग पार्टी असल्याचे स्पष्ट होत आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.