सुनीता विल्यम्सच्या सुटकेसाठी ‘नासा’ने पाठवले ‘हे’ अंतराळयान

भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्सच्या सुटकेसाठी ‘नासा’ने तातडीने निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. सुनीता विल्यम्स रेस्क्यू मिशनकडे आता जगभराचे लक्ष लागून आहे. सुनीता विल्यम्सच्या रेस्क्यू मिशनला सुरुवात झाली आहे.

सुनीता विल्यम्सच्या सुटकेसाठी ‘नासा’ने पाठवले ‘हे’ अंतराळयान
Follow us
| Updated on: Nov 25, 2024 | 5:34 PM

जगभराच्या नजरा भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्सच्या सुटकेकडे लागल्या आहे. कारण, ‘नासा’ने तातडीने निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. सुनीता विल्यम्ससाठी रेस्क्यू मिशन राबवलं जातंय. सुनीता विल्यम्सच्या रेस्क्यू मिशनला सुरुवात झाली आहे. त्यासाठी रशियाच्या मदतीने अंतराळयान पाठवण्यात आले आहे.

भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर जवळपास 6 महिन्यांपासून अंतराळात आहेत. 5 जूनपासून ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) आहेत. इतके दिवस अंतराळात राहिल्याने भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांची तब्येत देखील बिघडत चालली आहे.

जगभराच्या नजरा भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्सच्या सुटकेकडे लागल्या आहे यातच नुकताच अंतराळातून सुनीता आणि बुचचा एक फोटो समोर आला होता. यात दोघांचेही वजन कमी झाल्याचे दिसत होते.

हे सुद्धा वाचा

डॉक्टरांचे काय म्हणणे आहे?

नासाच्या स्पेस ऑपरेशन मिशन डायरेक्टरेटचे प्रवक्ते जिमी रसेल यांनी या चिंतेवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “अंतराळ स्थानकावरील ‘नासा’च्या सर्व अंतराळवीरांची नियमित वैद्यकीय तपासणी केली जाते. त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी फ्लाईट सर्जन तैनात करण्यात आले आहेत आणि सध्या सर्व अंतराळवीरांची स्थिती पूर्णपणे सामान्य आणि चांगली आहे.”

ताज्या अन्नाचा पुरवठा नाही

अंतराळात ताज्या अन्नाचा पुरवठा होत नसल्याने त्यांची तब्येत चांगली नसल्याचे बोलले जात आहे. ‘नासा’ने आता सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्यासाठी एक विशेष मोहीम सुरू केली आहे. ‘नासा’ने भारतीय वेळेनुसार सायंकाळी सहा वाजता कझाकस्तानमधील बायकोनूर कॉस्मोड्रोम येथून सोयुज रॉकेटद्वारे एक अन-क्रू विमान (क्रू मेंबर्सशिवाय) पाठवले आहे.

हे विमान भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचेल. ‘नासा’ने या विमानातून काय पाठवले आहे ते जाणून घेऊया.

‘नासा’ने रोस्कॉसमॉस कार्गो अंतराळयानातून काय पाठवले?

नुकतेच ‘नासा’ने रोसकॉसमॉसच्या कार्गो अंतराळयानाद्वारे अंतराळ स्थानकावर (ISS) एक्सपिडिशन-72 क्रूसाठी 3 टन अन्न, इंधन आणि इतर आवश्यक वस्तू पाठविल्या. काही दिवसांपूर्वी सुनीता विल्यम्स आणि इतर अंतराळवीरांच्या अन्नपुरवठ्यात संकट आल्याचा दावा करण्यात आला होता.

3 टन अन्न पाठवण्याचा निर्णय

प्रत्यक्षात अंतराळ स्थानकावर असलेल्या फूड सिस्टीम लॅबोरेटरीमध्ये ताज्या अन्नपुरवठ्याचा तुटवडा निर्माण झाला होता. या समस्येवर तातडीने तोडगा काढण्यासाठी ‘नासा’ने तातडीने पावले उचलली आणि अंतराळवीरांना जीवनावश्यक वस्तू आणि ताजे अन्न पुरवता यावे यासाठी 3 टन अन्न पाठवण्याचा निर्णय घेतला.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.