AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

News9 ग्लोबल समिट: भारताचा एकमेव मीडिया समूह जो देशाला जर्मनीसोबत जोडतोय, याचा मला आनंद : पंतप्रधान मोदी

TV9 च्या जर्मनीतील ग्लोबल समिट कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहभाग घेतला. त्यांनी भारताच्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेवर आणि भारत-जर्मनी संबंधांवर भाष्य केलं. मोदींनी जर्मन कंपन्यांना भारतात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. भारताच्या प्रगतीत सहभागी होण्याचा हा योग्य वेळ असल्याचे मोदी यावेळी म्हणाले.

News9 ग्लोबल समिट: भारताचा एकमेव मीडिया समूह जो देशाला जर्मनीसोबत जोडतोय, याचा मला आनंद : पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी
| Updated on: Nov 22, 2024 | 10:35 PM
Share

देशाचं नंबर 1 न्यूज नेटवर्क TV9चा ग्लोबल समिट कार्यक्रम जर्मनीच्या स्टर्टगार्ड सिटी येथे सुरु आहे. जर्मनीच्या ऐतिहासिक अशा MHP एरिना या फुटबॉल मैदानात तीन दिवसीय ग्लोबल समिटचं आयोजन करण्यात आलं आहे. आज या कार्यक्रमाचा दुसरा दिवस आहे. या समिटच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील कार्यक्रमात सहभागी झाली. यावेळी पंतप्रधान मोदींनी ‘India: Inside the Global Bright Spot’ या विषयावर भाष्य केलं. इंडो-जर्म पार्टनरशिमध्ये आज एक नवा अध्याय जोडला जात असल्याचं मोदींनी यावेळी म्हटलं. भारताच्या टीव्ही 9 ने जर्मनीत या ग्लोबल समिटचं आयोजन केलं आहे. “मला या गोष्टीचा खूप आनंद आहे की, भारताचा एक मीडिया समूह आज इन्फोर्मेशन युगात जर्मनी आणि जर्मनीच्या नागरिकांसोबत जोडण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे भारतीय नागरिकांना देखील जर्मनी आणि जर्मनीच्या नागरिकांना समजण्यासाठी एक प्लॅटफॉर्म मिळेल. तसेच न्यूज9 इंग्लिश चॅनल लॉन्च केलं जात आहे, याचादेखील मला आनंद आहे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी भारत-जर्मनी संबंधांवर देखील भाष्य केलं. “जर्मनीने फोकस ऑन इंडिया डॉक्युमेंट जारी केली आहे. भारत आणि जर्मनीचे संबंध शतकानुशतके जुने आहेत. आज जवळपास 3 लाख भारतीय जर्मनीत राहतात. भारत-जर्मनी संबंधांचा आणखी एक पैलू भारतात दिसून येतो. आज भारतात 1800 हून अधिक कंपन्या कार्यरत आहेत. आगामी काळात भारत आणि जर्मनी यांच्यातील व्यापार आणखी वाढेल असा मला विश्वास आहे”, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

भारत ही सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था

“भारत ही आज जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. जर्मनीचे फोकस ऑन इंडिया डॉक्युमेंट हे त्याचे उदाहरण आहे. भारताने प्रत्येक क्षेत्रात नवीन धोरणे आखली आहेत. भारताने 30 हजारांहून अधिक कंप्लाइंसेस काढून टाकले. कर प्रणाली दुरुस्त केली. जेणेकरून आपला व्यवसाय प्रगती करू शकेल”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

‘भारताच्या प्रगतीसोबत सामील होण्याची हीच योग्य वेळ’

“जर्मनीचा विकास प्रवासात उत्पादन आणि अभियांत्रिकीचा मोठा इतिहास आहे. कोणत्याही देशाच्या विकासासाठी आपण भौतिक, सामाजिक आणि डिजीटल क्षेत्रात गुंतवणूक करणे आवश्यक आहे. आज भारत मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादनाचे केंद्र आहे. आज भारतात अनेक जर्मन कंपन्या आहेत. मी आणखी जर्मन कंपन्यांना गुंतवणुकीसाठी आमंत्रित करतो. भारताच्या प्रगतीत सामील होण्याची हीच योग्य वेळ आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.