वडिलांच्या सांगण्यावरुन इस्लामिक शाळेची मुलीला क्रूर शिक्षा, 4 पुरुष शिक्षकांनी काठ्यांनी मारलं, नायजेरियातील धक्कादायक प्रकार
Islamic School : मुलीच्या वडिलांनी तिला दारु पिताना पकडलं होतं, त्यानंतर त्यांनी स्वतः शिक्षकांना सांगितले की, त्याच्या मुलीला शिक्षा द्या. (School Teachers Beat Girl) या घटनेचा व्हिडिओ खूपच धक्कादायक आहे
Girl Whipped by Islamic School Teachers: आफ्रिकन देश नायजेरियातून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. इथळ्या इस्लामिक शाळेत 4 शिक्षकांनी मिळून एका मुलीला छड्यांनी मारहाण केली आहे. तेही मुलीच्या वडिलांसमोर. मिळालेल्या माहितीनुसार, मुलीच्या वडिलांनी तिला दारु पिताना पकडलं होतं, त्यानंतर त्यांनी स्वतः शिक्षकांना सांगितले की, त्याच्या मुलीला शिक्षा द्या. (School Teachers Beat Girl) या घटनेचा व्हिडिओ खूपच धक्कादायक आहे आणि जो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. (Nigeria islamic school teachers whipped girl in front of father for consuming alcohol)
या व्हिडीओत चार पुरुष शिक्षक एकाच मुलीला एकत्र मारहाण करताना दिसत आहेत. त्यांनी हातात काठ्या धरल्या आहेत आणि मुलीला मध्यभागी बसवलं आहे. फेरी मारत असताना चार जण मुलीला मारहाण करत आहेत. (Islamic School Punishments) घटनास्थळी लोकांचा जमाव जमला आहे आणि मुलीला वाचवण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. मुलीने हिजाब घातला आहे आणि ती स्वतःचे रक्षण करण्यासाठी अनेक वेळा हात उंचावताना दिसत आहे. पण तरीही कुणाचंही हृदय पाझळत नाही. तिला इतका मारहाण केली जाते की तिचा हिजाबही खाली पडतो.
हा व्हिडीओ तुम्ही तुम्हाला विचलित करु शकतो.
वडिलांनी स्वतः शिक्षा देण्यास सांगितले
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, मुलीच्या वडिलांनी म्हटलं की, त्यांनी आपल्या मुलीचा कथितरित्या दारू पितानाचा व्हिडिओ पाहिला होता. त्यानंतर त्यांनी स्वतः या मुलीला शिक्षकांनी शिक्षा द्यावी (Girl Whipped by Teachers) म्हणजेच मारहाण करावी असं सांगितलं. मुलीचे वडील म्हणाले की, ‘मी शाळेला त्या घटनेबद्दल सांगितले आणि वैयक्तिकरित्या त्यांना कठोर शिक्षा देण्यासही बोललो. तिला मारहाण झाल्यावरही मी तिथेच राहायला सांगितलं आहे. रिपोर्टनुसार, मुलगी चार विद्यार्थ्यांसह वाढदिवसाच्या पार्टीत दारू पित होती. या चार लोकांमध्ये मुलांचाही समावेश आहे. पण इतर मुलांनी दारू पिण्यास नकार दिल्याची माहिती देण्यात आली आहे.
शाळेचे मुख्याध्यापक निलंबित
या घटनेशी संबंधित व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर लोक शाळेवर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, नायजेरियातील क्वारा राज्यात असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकाला निलंबित करण्यात आलं आहे, तर विद्यार्थिनीवर उपचार सुरू आहेत. शाळेने शिक्षेचा बचाव केला आहे. शाळेने म्हटलं आहे की, त्याला पालकांची मान्यता होती. शाळेने असेही म्हटले आहे की, ही शिक्षा इस्लामिक कायद्यानुसार (Islamic Law For Alcohol Consumption)आहे. त्याच वेळी, स्थानिक सरकारने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, तपास सुरू झाला आहे आणि एक समिती त्याची सखोल चौकशी करेल, ज्यात ‘मुस्लिम विद्वान, नेते आणि सरकारी अधिकारी समाविष्ट आहेत’.
हेही वाचा: