AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kim Jong Un Video | चर्चा तर होणारच! हुकुमशहा किम जोंग उनचे वजन घटले, जगभरात तर्क-वितर्कांना उधाण

उत्तर कोरियाचा (North Korea) हुकूमशाह किम जोंग उनच्या (Kim Jong un helath) प्रकृतीबाबत पुन्हा एकदा उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. आताचं कारण आहे किम जोंग उनने घटवलेलं वजन (Weight Loss). गेल्या अनेक महिन्यांपासून गायब असलेला किम जोंग उन नुकताच एका सार्वजनिक कार्यक्रमात दिसला.

Kim Jong Un Video | चर्चा तर होणारच! हुकुमशहा किम जोंग उनचे वजन घटले, जगभरात तर्क-वितर्कांना उधाण
किम जोंग उन
| Edited By: | Updated on: Jun 10, 2021 | 3:08 PM
Share

प्योंगयांग : उत्तर कोरियाचा (North Korea) हुकूमशाह किम जोंग उनच्या (Kim Jong un helath) प्रकृतीबाबत पुन्हा एकदा उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. आताचं कारण आहे किम जोंग उनने घटवलेलं वजन (Weight Loss). गेल्या अनेक महिन्यांपासून गायब असलेला किम जोंग उन नुकताच एका सार्वजनिक कार्यक्रमात दिसला. मात्र यावेळी तो एकदम बारीक झाल्याचं पाहायलं मिळालं. मात्र त्याने वजन घटवलंय की त्याची प्रकृतीच ढासळलीय की त्याला कोणता आजार जडलाय याबाबत तर्कवितर्क सुरु झाले आहेत (North Korea Kim Jong un weight loss looks slim in his latest video).

फोटोंची तुलना

एनके न्यूजच्या वृत्तानुसार, उत्तर कोरिया आणि तिथल्या नेत्यांवर बारकाईने लक्ष ठेवणाऱ्यांनी केलेल्या दाव्यानुसार, किम जोंग उनने खूपच वजन घटवलं आहे. किमच्या नोव्हेंबर-डिसेंबर 2020 मधील फोटोची, एप्रिल 2021 आणि जून 2021 च्या फोटोशी तुलना केल्यास हे स्पष्ट होतंय की त्याने वजन घटवलं आहे. जवळपास महिनाभर गायब झाल्यानंतर किम गेल्या आठवड्यातच सार्वजनिक ठिकाणी दिसला होता.

घड्याळाने सांगितले सत्य

किमच्या फोटोंच्या सखोल विश्लेषणानंतर असे निरीक्षण समोर आले की, हुकूमशहा किम स्विस कंपनीचे घड्याळ वापरतो. या घड्याळाच्या पट्टाची लांबी त्याच्या मनगटाच्या खालपर्यंत पोहोचली आहे, याचाच अर्थ किमचे मनगट बारीक झाले आहे.  एमआयटीमधील राज्यशास्त्राचे उप प्राध्यापक विपिन नारंग म्हणाले की, किमने स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी वजन कमी केले असेल तर ते ठीक आहे. परंतु, जर वजन आपोआप कमी झाले असेल, तर ते एखाद्या आजाराचे लक्षण असू शकते.

पाहा व्हिडीओ :

 (North Korea Kim Jong un weight loss looks slim in his latest video)

किमची ‘लपाछपी’

नारंग यांनी एनके न्यूजशी बोलताना सांगितले की, जर हुकूमशहा किमची तब्येत खराब असेल तर, त्याचा वारसा निवडण्याची प्रक्रिया पडद्यामागे सुरु झाली असेल आणि येणारा काळ जगासाठी अत्यंत त्रासदायक ठरू शकेल. उत्तर कोरियाच्या हुकूमशहाचे आरोग्य, दक्षिण कोरियाची राष्ट्रीय इंटेलिजेंस सर्व्हिस (एनआयएस) यासह जगभरातील तज्ज्ञ आणि गुप्तचर यंत्रणांमध्ये तीव्र रुचीचा विषय बनला आहे. कारण, किम अनेक वेळा मोठ्या कालावधीसाठी गायब देखील झाला आहे.

हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोगाचा धोका

यापूर्वी तज्ज्ञ म्हणाले होते की, किम जोंग उनला हृदयविकाराचा धोका आहे. कारण त्याच्या कुटुंबात हृदयाशी संबंधित आजारांची पार्श्वभूमी आहे. नोव्हेंबर 2020मध्ये एनआयएसला दक्षिण कोरियाच्या काही खासदारांनी सांगितले होते की, किमचे वजन सुमारे 140 किलो आहे. त्याचवेळी दक्षिण कोरियामधील यूएस स्पेशल ऑपरेशन्स कमांडचे इंटेलिजन्स ऑफिसर माईक ब्रोडका म्हणाले की, ‘हुकूमशहाचे वजन कमी होणे हे त्याच्या निरोगी जीवनशैलीचा भाग असू शकते. परंतु, यामुळे अनेक गंभीर प्रश्नही उपस्थित होत आहेत आणि आम्हाला यावर लक्ष ठेवावे लागेल.’

‘या’ अहवालातून निर्माण झाले अनेक प्रश्न

1 जून रोजी समोर आलेल्या या अहवालात, उत्तर कोरियामध्ये ‘सेकंड-इन-कमांड’ची एक पोस्ट तयार करण्यात आल्याचे सांगितले आहे. यामुळे उत्तर कोरियामध्ये काहीही सुरळीत नाही, या वस्तुस्थितीची पुष्टी होत आहे. मात्र, हुकूमशहा आणि कोरिया याच्याविषयी नेमके काहीही सांगणे कठीणच आहे. कारण तिथून येणाऱ्या सगळ्या बातम्या या फिल्टर केल्या जातात. पण, किमच्या आजारपणाची बातमी खरी असेल, तर त्याचा उत्तराधिकारी कोण आहे आणि जगासाठी तो कोणती नवीन समस्या निर्माण करतो, याकडे पूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे.

(North Korea Kim Jong un weight loss looks slim in his latest video)

हेही वाचा :

Turkey Sea Snot : पृथ्वी आहे की दुसरा ग्रह? तुर्कीतील या समुद्राची अवस्था पाहून तुम्हीही चकित व्हाल

PHOTOS : मेक्सिकोनंतर आता यरुशलममध्येही ‘विशालकाय खड्डा’, आजूबाजूच्या तीन कारही गायब, फोटो पाहा…

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.