omicron : जगावर दुहेरी संकट, ओमिक्रोनसोबतच डेल्टाचाही अमेरिका, युरोपात हाहा:कार

दक्षिण आफ्रिकेसोबतच बोत्सवाना, इस्वातिनी, झिम्बाब्वे, त्यानंतर ब्राझिल, अमेरिका, कॅनडा, युरोपमध्ये अनेक देशांमध्ये ओमिक्रॉन आढळल्यानंतर भारत, दक्षिण कोरिया, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, साऊदी अरेबिया अशा आता जगभरात तब्बल 40 देशांमध्ये ओमिक्रॉनचा फैलाव झाल्यानं चिंतेत आणखी भर पडलीय.

omicron : जगावर दुहेरी संकट, ओमिक्रोनसोबतच डेल्टाचाही अमेरिका, युरोपात हाहा:कार
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Dec 04, 2021 | 10:48 PM

मुंबई : अवघ्या 12 दिवसांपूर्वी फक्त दक्षिण आफ्रिकेत आढळलेला ओमिक्रॉनचा फैलाव आता जगभरात होतोय. दक्षिण आफ्रिकेचे शेजारी देशात याच्या प्रसाराचा वेग वाढला आहे. बोत्सवाना, इस्वातिनी, झिम्बाब्वे, त्यानंतर ब्राझिल, अमेरिका, कॅनडा, युरोपमध्ये अनेक देशांमध्ये ओमिक्रॉन आढळल्यानंतर भारत, दक्षिण कोरिया, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, साऊदी अरेबिया अशा आता जगभरात तब्बल 40 देशांमध्ये ओमिक्रॉनचा फैलाव झाल्यानं चिंतेत आणखी भर पडलीय. ओमिक्रॉनचा सर्वात जास्त फैलाव ख्रिश्चन बहुल राष्ट्रांमध्ये होण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे डिसेंबरमध्ये होणारा ख्रिश्चनांचा सर्वात मोठा सण ख्रिसमस. याचं ताजं उदाहरण म्हणजे यूरोपमधला नॉर्वे देश, नॉर्वेची राजधानी ओस्लोमध्ये एका कंपनीने ख्रिसमस पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीत जवळपास 120 पेक्षा अधिक कर्मचारी सहभागी झाले होते.. यातल्या 13 कर्मचाऱ्यांना ओमिक्रॉनची लागण झालीय. हा आकडा 60 च्यावर जाण्याची शक्यता वर्तवली जातेय. विशेष म्हणजे ज्यांना ओमिक्रॉनची लागण झालीय, त्या सर्वांचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण आहेत. सुपर स्प्रेडर इव्हेंट असं नॉर्वेमध्ये याला म्हटलं जातंय. युरोप, अमेरिका आणि आफ्रिका खंडातले बरेच देश ख्रिश्चन बहुल असल्याने ओमिक्रॉनचा सर्वात जास्त धोका या देशांना आहे.

दक्षिण आफ्रिकेनंतर ओमिक्रॉन कुठे?

इंग्लंडमध्ये आतापर्यंत ओमिक्रॉनचे तब्बल 104 रुग्ण आढळले. घाना या देशात ओमिक्रॉनचे 34 रुग्ण आहेत. कॅनडामध्ये ओमिक्रॉनचे 15 रुग्ण आढळलेत. नेदरलँडमध्ये 16 रुग्ण, नॉर्वेमध्ये 13 रुग्ण आढळलेत. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पोर्तूगालमध्ये 13 रुग्ण, जर्मनीमध्ये 10 रुग्ण, ऑस्ट्रेलियात 8 रुग्ण, तर दक्षिण कोरियात ओमिक्रॉनचे 9 रुग्ण आढळलेत.

ओमिक्रॉमुळे अद्याप एकही मृत्यू नाही

ओमिक्रॉनचा वेगानं फैलाव होत असला तरी कोरोनाच्या या विषाणूमुळे अद्याप एकही मृत्यू झाला नसल्याची दिलासादायक माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिलीय. तर सध्या ओमिक्रॉनचा अभ्यास सुरु असून ओमिक्रॉनच्या धोक्याबाबत डिसेंबरनंतरच स्पष्टता होईल अशी माहिती ब्रिटनच्या वैज्ञानिकांनी दिलीय.

युरोप, अमेरिकेत डेल्टाचा हाहा:कार

ओमिक्रॉनच्या फैलावासोबतच युरोप आणि अमेरिकेत कोरोनाच्या डेल्टा व्हायरसने हाहा:कार माजवलाय. अमेरिकेत सलग पाचव्या दिवशी 1 लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. गेल्या 5 दिवसात अमेरिकेत रोज कोरोनामुळे 1500 पेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झालाय. लस न घेतलेल्यांना कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण अधिक आहे. शिवाय लस न घेतलेल्यांमध्ये कोरोनामुळे मृत्यूचं प्रमाण अधिक आहे. तिकडे युरोपमध्येही वाढत्या कोरोना रुग्णांमध्ये तिथल्या सरकारांची चिंता वाढलीय.

युरोपात पहिल्या, दुसऱ्या लाटेसारखी अवस्था

युरोपात पहिल्या आणि दुसऱ्या लाटेसारखी रुग्णालयांमध्ये अवस्था निर्माण झालीय. रोज हजारो रुग्ण रुग्णालयांमध्ये दाखल होत आहेत. रशियामध्ये 30 नोव्हेंबरपासून सरासरी 30 हजार नवे रुग्ण आढळत आहेत, तर रोज अकराशे रुग्णांना आपला प्राण गमवावा लागतोय. जर्मनीमध्ये 30 नोव्हेंबरपासून सरासरी 60 हजार रुग्णांना कोरोनाची लागण होतीय. मात्र जर्मनीत त्या तुलनेत मृत्यूचं प्रमाण कमी आहे.  फ्रान्समध्ये दररोज 45 हजार रुग्णांना कोरोनाची लागण होतीय. मात्र, कोरोना मृत्यूचं प्रमाण नगन्य आहे.

युरोपातील देशांनी निर्बंध वाढवले

वाढत्या कोरोना रुग्णामुळे युरोपियन देशांची चिंता वाढलीय. त्यामुळे काही युरोपियन देशांनी निर्बंध वाढवले आहेत. झेक रिपब्लिक देशात 30 दिवसांची आधीच आणीबाणी घोषित झालीय. तर स्लोवाकिया सध्या दोन आठवड्यांच्या लॉकडाऊनमध्ये आहे. काही ठिकाणी ख्रिसमस पार्ट्यांवरही बंदी घालण्यात आलीय. जर्मनी, फ्रान्स यादेशांमध्ये 18 वर्षाखालील लहान मुलांच्या लसीकरणाचा वेग वाढवण्यात आलाय. लसीचे दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना बूस्टर डोसही देण्यात येतोय. जगभराच्या तुलनेत भारतात सध्या कोरोनाचा कुठलाईही स्पाईक नाहीये. मात्र इतर देशांप्रमाणे भारतातही ख्रिसमस पार्ट्या आणि नववर्षाच्या स्वागतासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे.  त्यामुळे भारतीय नागरिकांनीही स्वत:ला कोरोनापासून दूर ठेवायचं असेल तर काळजी घेणं अत्यावश्यक आहे. अमेरिका आणि युरोप सध्या दुहेरी संकटात आहे. एकीकडे डेल्टाचे लाखो रुग्ण तर दुसरीकडे ओमिक्रॉनचा वाढणारा फैलाव. त्यातच आता ख्रिसमसच्या सुट्ट्या, पार्ट्यांमुळे होणारी गर्दी यामुळे अमेरिका, यूरोपसह ख्रिश्चन बहुल देशांची धास्ती वाढलीय.

Omicron Update | ओमिक्रॉनचा धसका ! या जिल्ह्यात राज्यातील पहिली जमावबंदी; रॅली, धरणे, आंदोलनावर बंदी

Omicron Update | राज्याला दिलासा! डोंबिवली ओमिक्रॉनाबाधिताच्या संपर्कातील सर्व कोरोना निगेटिव्ह, तरीही सावधान!

दारुसाठी पैसे न दिल्याच्या रागातून एकाची हत्या, 12 तासांत आरोपींना बेड्या; वाहनांना लुटणारी टोळीही गजाआड

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....