AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report : एकामागून एक महाआपत्ती… नेपाळच का बनतंय निसर्गाचं ‘फेव्हरेट टार्गेट’?

नेपाळमध्ये अलीकडेच आलेल्या महापुराने मोठी हानी झाली. 2015 च्या भूकंपानंतर नैसर्गिक आपत्तींचा नेपाळवर सतत मारा होत आहे. टेक्टोनिक प्लेट्सचे घर्षण, डोंगर, ग्लेशियर वितळणे, अतिवृष्टी आणि अनियोजित मानवी वस्त्या ही प्रमुख कारणे आहेत. ग्लोबल वॉर्मिंगमुळे हिमकडे तुटून पूर येत आहेत, तर विकासाच्या नावाखाली झालेले अतिक्रमणही संकटांना आमंत्रण देत आहे.

Special Report : एकामागून एक महाआपत्ती... नेपाळच का बनतंय निसर्गाचं ‘फेव्हरेट टार्गेट’?
Nepal flash floodsImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 28, 2026 | 4:17 PM
Share

नेपाळमध्ये तीन दिवसांपूर्वी प्रचंड जलप्रलय आला आणि देशात मोठा हाहाकार उडाला. आधी भूकंप आला आणि त्यानंतर हिमकडा तुटून महापूर आला. हे महापुराचं पाणी गावागावात शिरल्याने नेपाळमध्ये मोठी आर्थिक आणि जीवित हानी झाली. एकाच दिवसात 400 हून अधिक लोक दगावले. हजारो लोक बेपत्ता झाले. या विनाशाने नेपाळ पुन्हा एकदा हादरून गेलं आहे. 25 एप्रिल 2015 पासून नेपाळमध्ये सातत्याने नैसर्गिक आपत्ती येत आहे. जणू काही आपत्तीसाठी नेपाळ हे निसर्गाचं फेव्हरेट टार्गेट झाल्याचं दिसत आहे. नेपाळमध्ये नैसर्गिक आपत्ती का येते? त्या मागचं नेमकं कारण काय आहे? याचाच घेतलेला हा आढावा.

25 एप्रिल 2015मध्ये नेपाळमध्ये भूकंप झाला. हा भूकंप महाभयानक होता. शतकातील सर्वात मोठा भूकंप म्हणूनही या भूकंपाला संबोधलं गेलं. त्यानंतर नेपाळमध्ये काही ना काही आपत्ती येतच गेली. 2024मध्ये काठमांडूत मोठा पूर आला, 2025मध्ये ग्लेशियर सरोवर फुटला, त्यानंतर 26 ऑगस्ट 2026 रोजी भोटेकोशी नदीत महाभयानक पूर आला. परवा आलेल्या या महापुरात 400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. तर 1500 लोक बेपत्ता झाले आहेत.

नेपाळमध्ये आपत्ती का?

अनेक संकटं एकाचवेळी एकाच ठिकाणी येत असल्याने नेपाळमध्ये नैसर्गिक आपत्ती येत असते. हेच एक कारण नाहीये. तर अनेक कारणाने नेपाळमध्ये संकटं येत असतात. एकमेकांना धडकणारी टेक्टोनिक प्लेट, मोठ मोठे डोंगर, प्रचंड उतार, अतिमुसळधार पाऊस, ग्लेशियरचं वितळणं आणि या सर्वांच्या मध्ये निर्माण झालेल्या वस्त्या. त्यामुळे नेपाळमध्ये नेहमी नैसर्गिक संकट येतं आणि त्यामुळे तिथे मोठी जीवित तसेच वित्तहानी होते.

1. म्हणून भूकंप येतो

भारतीय प्लेट आणि यूरेशियन प्लेटचं घर्षण ज्या ठिकाणी होते, त्यावर नेपाळ वसलेला आहे. या दोन्ही प्लेट प्रत्येकवर्षी एकमेकांमध्ये 5 सेंटिमीटरपर्यंत घुसत आहे. त्यामुळे त्यांच्यात घर्षण होतं. या घर्षणामुळे जोरदार दबाव वाढतो. तो दबाव अचानक रिलीज होतो आणि भूकंप येतो.

त्यामुळेच हिमालयाचा हा भाग जगातीलसर्वाधिक भूकंप प्रभावित क्षेत्रामध्ये येतो. 2015मध्ये 7.8 रिश्टर स्केलचा भूकंप आला. हा गोरखा भूकंप याच कारणाने आला होता. या भूकंपात सुमारे 9 हजार लोक मृत्यूमुखी पडले होते. तर हजारो लोक भूस्खलनाचे शिकार झाले होते.

भूकंप केवळ झटके देत नाही, तर भूकंप हजारो भूस्खलन आणि हिमस्खलनलाही ट्रिगर करतो. 2015च्या भूकंपाने हिमालयातील डोंगराच्या कडा ढिल्या केल्या. त्यामुळे येणाऱ्या काळात पूर आणि भूस्खलनाचा धोका अधिक वाढला आहे.

2. पूर आणि भूस्खलन

नेपाळची भौगोलिक स्थितीच नेपाळला पूर आणि भूस्खलनासाठी संवेदनशील बनवते. इथे दक्षिण तेराईचं मैदान आहे. उत्तरेला माऊंट एव्हरेस्ट (8,848 मीटर) आहे. म्हणजे केवळ 150-250 किलोमीटरच्या अंतरावर एवढ्या उंचीचा फरक दिसतो. या अत्यंत टोकदार उतारावर पाणी आणि ढिगारा अत्यंत वेगाने खाली येतो.

त्याशिवाय नेपाळमध्ये 6000 नद्या आहेत. या नद्या निमूळत्या आहेत. तसेच खोल दऱ्यांमधून वाहतात. जेव्हा अचानक मुसळधार पाऊस होतो तेव्हा ग्लेशियर फुटतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी या निमूळत्या दऱ्यांमधून वाहते आणि महापुराच्या रुपाने बाहेर पडते.

26 ऑगस्ट 2026 रोजी भोटेकोशी ल्हेंडे खोला नदीत महापूर याच कारणामुळे आला. या महापुरात 400 हून अधिक लोक मारले गेले. तर हजारो लोक बेपत्ता आहेत.

3. ग्लोबल वॉर्मिंगमुळे ग्लेशियर वितळतोय

नेपाळच्या संकटात ग्लोबल वॉर्मिंग हा एक खतरनाक मुद्दा आहे.

वेगाने पिघळणारे ग्लेशियर : हिंदू कुश हिमालय क्षेत्रात ग्लेशियर पिघळण्याचा दर 2000 नंतर डबल झाला आहे. त्यामुळे अगणित ग्लेशियर सरोवर बनले आहेत. त्यामुळे कधीही धोका संभवू शकतो.

ग्लेशियर सरोवर स्फोट : हे सरोवर अचानक फुटल्यावर मोठ्या प्रमाणात पाणी, बर्फ आणि मोठे दगड मोठ्या प्रमाणात खाली येतात. त्याला ग्लेशियल आऊटबर्स्ट फ्लड (GLOF) म्हणतात.

हिमस्खलन : वाढत्या तापमानामुळे ग्लेशियरचे मोठ मोठा भाग तुटून खाली पडतो. 26 ऑगस्ट रोजी तेच घडलं. त्या दिवशी सुमारे 600 मीटर रुंद बर्फाचा विशाल तुकडा 1200 मीटरहून अधिक उंचावरून खाली कोसळला. परवाच्या महापुराच्या मागे हिमस्खलन आणि ग्लेशियर तुटणे हे कारण असल्याचं सांगितलं जात आहे. म्हणजे वितळणारा ग्लेशियर आणि अस्थिर उतार यामुळे एक घातक योग बनला.

4. अत्याधिक पाऊस

नेपाळमध्ये प्रचंड पाऊस होत असतो. पण ग्लोबल वॉर्मिंगने याला अनियमित बनवलं आहे. 2024मध्ये आलेल्या महापुराच्या मागे अतिवृष्टी आणि एकाच ठिकाणी धुवांधार पडणारा पाऊस हे कारण होतं.

कधी कधी पाऊस नसतानाही ग्लेशियर तुटतो किंवा हिमस्खलनाने महापूर येतो. त्यापुढे पारंपारिक अलर्ट सिस्टिमही फेल ठरते. 2026 चा महापूर याचं ताजं उदाहरण आहे. पावसाचा एक थेंबही पडलेला नसताना नेपाळमध्ये मोठा महापूर आला.

5. वस्त्या आणि विकासाच्या नावानं अतिक्रमण

नैसर्गिक कारणांप्रमाणेच मानवीय कारणंही या आपत्तीला जन्म देत असल्याचं दिसून आलं आहे. 1990 ते 2020 दरम्यान काठमांडूमध्ये 386% टक्क्याने वेगाने शहरीकरण झालं आहे. नेपाळमध्ये बेसूमार जंगल तोड झाली. 1989-2019 च्या दरम्यान 28% जंगल कमी झालं आहे. माणसं, घरं आणि मूळ ढाच्यावर जेव्हा परिणाम होतो तेव्हा नैसर्गिक आपत्ती मोठं संकट बनून समोर उभ्या राहतात.

नेपाळमध्ये रस्ते, पूल, शाळा, रुग्णालये आणि विद्यूत पुरवठा योजना या सर्व गोष्टी धोकादायक भागात आहे.

निमूळत्या खोऱ्यांमध्ये वस्त्या तयार केल्या आहेत. त्यामुळे महापूर आणि भूस्खलनाचा भयानक परिणाम होतो.

रस्ते निर्मिती, जंगलतोड आणि कोणत्याही योजनेशिवाय विकासाच्या नावाखाली डोंगर तोडले जात आहेत.

नद्यांवर अतिक्रमण होत आहे. त्या ठिकाणी घरे आणि इमारती उभ्या राहत आहेत. त्यामुळे नैसर्गिक संकटाला आपोआप निमंत्रण मिळत आहे.

Follow Us
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा...
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा भाजपवर निशाणा
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी
शिवसैनिकांच्या अनोख्या बॅनरची तुफान चर्चा; उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान
शिवसैनिकांच्या अनोख्या बॅनरची तुफान चर्चा; उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान अन् राज ठाकरे तर थेट...
ठाकरे बंधूंचा ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, मतदार यादीच्या मुद्द्यावर
ठाकरे बंधूंचा ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, मतदार यादीच्या मुद्द्यावर मुंबईत मोठं आंदोलन
अभिजीत दिपकेंना मोठा धक्का! दादरमधील आंदोलन भोवलं? रहिवाशांची थेट...
अभिजीत दिपकेंना मोठा धक्का! दादरमधील आंदोलन भोवलं? रहिवाशांची थेट गुन्हा...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!