VIDEO: मद्यपान करुन डान्स करताना पंतप्रधान, सना मरीन यांनी ड्रग्ज घेतल्याचा विरोधकांचा आरोप, फिनलँडच्या पंतप्रधान म्हणाल्या..
सना मरीन यांनी ड्रग्ज घेतल्याचे वृत्त फेटाळले आहे. या केवळ अफवा असून या प्रकरणात ड्रग्ज चाचणीला सामोरे जाण्याची तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. सना मरीन म्हणाल्या आहेत की- मी माझ्या मित्रांसोबत होते. आम्ही पार्टी केली. मी गाणे म्हटले आणि डान्स केला. मी कधीही ड्रग्ज घेतलेले नाही.
हेल्सिंकी- फिनलँडच्या पंतप्रधान (Finland’s PM)सना मरीन (Sana Marin) यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. त्यात त्या मद्यपान करुन आपल्या मित्रांसोबत डान्स (dance in party)करताना दिसतायेत. विरोधकांनी यावरुन पंतप्रधानांवर आरोप करत, या पार्टीत त्यांनी मित्रांसोबत ड्रग्ज सेवन केल्याचा आरोप केला आहे. पंतप्रधानांच्या ड्रग्ज चाचणीची मागणीही विरोधकांनी केली आहे. मात्र यावर स्पष्टीकरण देत पंतप्रधान समा मरीन यांनी सांगितले आहे की, आपण त्या पार्टीत केवळ मद्यपान केले होते.
Sana Marin: The prime minister of this country was dancing under the influence of alcohol, said on the commotion… I am still young. Finland’s Prime Minister Sana Marin’s party dance went viral, opposition leaders criticized https://t.co/8iyc6QnTMp
हे सुद्धा वाचा— The Google (@thegoogle93) August 18, 2022
पंतप्रधान मरीन ड्रग्ज चाचणीसाठी तयार
सना मरीन यांनी ड्रग्ज घेतल्याचे वृत्त फेटाळले आहे. या केवळ अफवा असून या प्रकरणात ड्रग्ज चाचणीला सामोरे जाण्याची तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. सना मरीन म्हणाल्या आहेत की- मी माझ्या मित्रांसोबत होते. आम्ही पार्टी केली. मी गाणे म्हटले आणि डान्स केला. मी कधीही ड्रग्ज घेतलेले नाही. माझ्याकडे लपवण्यासारखे काही नाही. हा खासगी व्हिडीओ होता. त्याला असे सार्वजनिक करणे चुकीचे आहे.
Es dürfte neben Sanna Marin vermutlich nicht viele andere Regierungschefs geben, von denen in absehbarer Zeit solche Bilder kursieren … pic.twitter.com/uh5bvVebkK
— Jan Petter (@lepettre) August 18, 2022
सोशल मीडियावर लोकांनी दिल्या प्रतिक्रिया
हा व्हिडीओ सर्वात आधी इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला. त्यानंतर तो व्हायरल झाला. लोकांनी त्या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांनी यात काहीही वावगे नसल्याचे सांगितले आहे, तर काही जणांनी सना मरीन या फिनलँडच्या पंतप्रधानपदावर राहण्यास लायक नसल्याचे मत व्यक्त केले आहे. एका युझरने मरीन यांना समर्थन देत लिहिले आहे की – लकाम केल्यानंतर मरीन या पार्टी का करु शकत नाहीत, त्या मनुष्यप्राणीच आहेत ना. दुसऱ्या एका युझरने लिहिले आहे की – कधी कुणा पंतप्रधानांचे असे वागणे स्वीकार्ह आहे का, मला तर असे वाटत नाही.
यापूर्वीही मरीन यांच्यावर झाली होती टीका
मरीन यांच्यावर टीका होण्याची ही काही पहिली वेळ नाही. २०२१ साली कोरोना काळातही त्या पार्टी करताना दिसल्या होत्या. त्यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांना या प्रकरणात माफीही मागावी लागली होती.