Pakistan Flood: वीज गेली, पाणी गेलं, लोकं बेघर झाली, आता पाकिस्तानात नवं संकट!
Pakistan Flood: पाकिस्तानात ही समस्या गंभीर होत चालली आहे आणि समस्येवर सध्या कुठलाच तोडगा नसल्याचं सांगितलं जातंय त्यामुळे पाकिस्तानातील जनता त्रस्त आहे.
वीज आणि पाण्यापाठोपाठ पाकिस्तानात आणखी एक संकट उभं राहिलंय. पाकिस्तानात इंटरनेट सेवा खूप कमी होत आहे. गेल्या काही काळापासून पाकिस्तानात इंटरनेट (Pakistan Internet)वापरणाऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. केबलमध्ये बिघाड असल्या कारणाने लोकांना या समस्येला सामोरं जावं लागतंय. पाकिस्तानात ही समस्या गंभीर होत चालली आहे आणि समस्येवर सध्या कुठलाच तोडगा नसल्याचं सांगितलं जातंय त्यामुळे पाकिस्तानातील जनता त्रस्त आहे. तिथे मुसळधार पाऊस पडत असल्याचं एका अहवालात म्हटलं गेलंय, अनेक भागात पूरही (Pakistan Flood) आला आहे. त्यामुळे लोक वैतागले आहेत. पुरामुळे ऑप्टिकल फायबरवरही (Optical Fiber) त्याचा परिणाम झाला आहे. ज्यामुळे पाकिस्तानच्या अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
समस्या आणखी वाढत जाणार
येत्या काळात इंटरनेटची समस्या आणखी वाढत जाणार आहे असं म्हटलं जातंय. डेली डॉनच्या वृत्तानुसार, केबल कटच्या घटनेनंतर पाकिस्तान टेलिकम्युनिकेशन कंपनी लिमिटेड (पीटीसीएल) आणि पाकिस्तान टेलिकॉम ऑथॉरिटीला सरकारने अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
पाकिस्तानात संकट!
Horrifying footage from S. #Pakistan today of entire building washed away by floods. Over 935 people killed, more than 33 million affected, worst natural disaster for country in decades: pic.twitter.com/aO6ZMlQycf
— Joyce Karam (@Joyce_Karam) August 26, 2022
आयटी आणि दूरसंचार मंत्र्यांचे वक्तव्य
पूर हे इंटरनेट बंद पडण्याचं मुख्य कारण होतं, असं या अहवालात म्हटलं आहे. फायबर-ऑप्टिक्स केबल्सचे नुकसान करणारे पाणी काढण्यासाठी अवजड यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला. पाकिस्तानच्या आयटी आणि दूरसंचार मंत्र्यांनी याबाबत तांत्रिक अहवाल मागवला आहे. येणाऱ्या काही दिवसांत अशा घटना अधिक घडतील, असंही त्यांनी म्हटलं आहे. तसेच अशी घटना घडल्यास दुरुस्तीचे काम पूर्ण करता यावे, यासाठी पाकिस्तान टेलिकम्युनिकेशन कंपनी लिमिटेडने आपत्कालीन घोषणापत्र करण्याचे सांगितले अहवालात नमूद करण्यात आले आहे. आम्ही पाकिस्तानच्या दूरसंचार प्राधिकरण सेवेवर सतत लक्ष ठेवून असल्याचंही मंत्र्यांनी म्हटलंय.