दोन दिवसापूर्वी चीनची लस टोचून घेतली, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना कोरोना

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना कोरोनाची लागण झाली आहे. (Pakistan PM Imran Khan tests Covid-19 positive)

दोन दिवसापूर्वी चीनची लस टोचून घेतली, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना कोरोना
Imran Khan
Follow us
| Updated on: Mar 20, 2021 | 4:07 PM

लाहोर: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना कोरोनाची लागण झाली आहे. इम्रान खान यांनी दोन दिवसांपूर्वीच चीनची कोरोनाची लस टोचून घेतली होती. त्यानंतरही त्यांना कोरोनाची लागण झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. (Pakistan PM Imran Khan tests Covid-19 positive)

पंतप्रधान इम्रान खान यांचे स्पेशल असिस्टंट फैजल सुल्तान यांनी ट्विट करून खान यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर इम्रान खान यांनी स्वत:ला आयसोलेटेड करून घेतलं असून संपर्कात आलेल्यांना कोरोनाची चाचणी करून घेण्याचे आवाहन केलं आहे.

ही लस टोचली होती

इम्रान खान यांनी दोन दिवसांपूर्वी चीनची कोरोना लस सिनोफार्म (Chinese vaccine Sinopharm) टोचून घेतली होती. कोरोना लसीसाठी पाकिस्तान चीनवर अवलंबून असून आता चीनची लस घेतल्यानंतरच खान यांना कोरोनाची लागण झाल्याने चीनची कोरोना लस सेफ आहे का? याबाबत शंकाकुशंका उपस्थित केल्या जात आहेत.

2,122 जणांची प्रकृती चिंताजनक

पाकिस्तानात आज या वर्षातील सर्वाधिक कोरोना रुग्ण सापडले. पाकिस्तानात 3876 कोरोना रुग्ण सापडले होते. त्यामुळे पाकमधील कोरोना संक्रमणाचा दर 9.4 टक्के झाला आहे. देशात आतापर्यंत 623,135 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या 24 तासात देशात 40 लोकांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या 13,799 झाली आहे. देशात आतापर्यंत 579,760 लोक कोरोना मुक्त झाले आहेत. तर 2,122 जणांची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती पाकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

कोवॅक्स लसही मिळण्याची आशा

दरम्यान, पाकिस्तानला चीनशिवाय जागतिक आरोग्य संघटनेची (WHO) कोवॅक्स Covax) ही लसही मिळण्याची आशा आहे. Who कडून गरिब आणि कमी उत्पन्न असलेल्या राष्ट्रांना ही लस पुरवण्यात येत आहे. यानुसार पाकिस्तानला 1 कोटी 71 लाख 60 हजार डोस मिळणार आहेत. सध्या पाकिस्तानातही 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत आहे.

अनेक शहरात लॉकडाऊन

पाकिस्तानात कोरोना आटोक्यात येत नसल्याने, अनेक ठिकाणी लॉकडाऊन करण्यात येत आहे. जवळपास 7 शहरात नव्याने लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. इथे शाळा-कॉलेजसह सर्व व्यवहार बंद करण्यता आले आहेत. रमजानचा महिना तोंडावर असल्याने, पाकिस्तानातील बाजारांमध्ये गर्दी वाढण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत इम्रान खान सरकार काय निर्णय घेतं याकडे सर्वांचं लक्ष आहे. (Pakistan PM Imran Khan tests Covid-19 positive)

संबंधित बातम्या:

Pakistan Corona : तिसऱ्या लाटेने पाकिस्तान भयभीत, लसीचा तुटवडा, इम्रान खान यांनी कोणती लस घेतली?

 आता कुत्रे कोरोनाचा शोध घेणार, थायलंड विद्यापीठाचा दावा, पहा प्रात्यक्षिकाचा व्हिडीओ

सेक्स, ईश्वर आणि बंदूका, अमेरिकेतल्या त्या हत्याकांडाचं कोडं उलगडलं? वाचा काय म्हणतो हत्यारा?

(Pakistan PM Imran Khan tests Covid-19 positive)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.