पंतप्रधान मोदी या खास ट्रेनने युक्रेनला पोहोचणार, युद्धभूमीला देणार भेट
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी 23 ऑगस्ट 2024 रोजी युक्रेनची राजधानी कीवला भेट देणार आहेत. ३० वर्षानंतर पहिल्यांदाच भारताचे पंतप्रधान युक्रेनला भेट देणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, पंतप्रधान मोदी कीवमध्ये सात तास असणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या कीव दौऱ्यात 20 तासांचा रेल्वे प्रवास असेल.
जुलैमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची रशियात भेट घेतली होती. आता मोदी हे युक्रेन दौऱ्यावर जाणार आहेत. ते या वेळी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची भेट घेणार आहेत. पीएम मोदी आणि झेलेन्स्की यांची ही चौथी भेट आहे. झेलेन्स्की यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी कीवला भेट देणार आहेत. 23 ऑगस्ट 2024 रोजी ते या ठिकाणी पोहोचणार आहेत. ३० वर्षांहून अधिक काळ झालाय. भारतीय पंतप्रधानाची ही युक्रेनला झालेली पहिलीच भेट असेल. परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी याबाबत माहिती दिलीये. पंतप्रधान मोदी सात तास कीवमध्ये असणार आहेत. सध्या पंतप्रधान मोदी हे पोलंडमध्ये आहेत.
पंतप्रधान मोदी युक्रेनला कसे जाणार?
आता प्रश्न असा आहे की युद्धग्रस्त युक्रेनमध्ये जिथे विमानतळ बंद आहेत. तेथे ते कसे जाणार. रस्त्याने प्रवास करणे धोकादायक ठरू शकते. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदी युक्रेनमध्ये कसे पोहोचणार? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. पंतप्रधान मोदी पोलंडहून कीव येथे खास डिझाइन केलेल्या लक्झरी ट्रेनने (रेल फोर्स वन) पोहोचणार आहेत. या ट्रेनमधून जगातील मोठे नेते युक्रेनला गेले आहेत. यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि जर्मन चान्सलर ओल्फ स्कोल्झ यांचा समावेश आहे.
बायडेन यांच्या व्यतिरिक्त आतापर्यंत 200 हून अधिक परदेशी राजनैतिक मिशन्सनी युद्धग्रस्त युक्रेनमध्ये पोहोचण्यासाठी या रेल्वे सेवेचा वापर केला आहे. ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आणि इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचा यात समावेश आहे.
व्हीआयपींसाठी खास ट्रेन
पंतप्रधान मोदी यांच्या कीव दौऱ्यात 20 तासांच्या ट्रेन प्रवासाचा समावेश असेल, ज्या दरम्यान ते रात्रभर रेल्वे फोर्स वन ट्रेनमध्ये असतील. खास डिझाइन केलेली ही हाय सेफ्टी ट्रेन आरामदायी प्रवास देते. तसेच आलिशान सुविधा, कार्यलयीन स्तरावरील काम आणि विश्रांती सुविधांनी युक्त आहे.
‘रेल फोर्स वन’चा भाग अतिशय सुरक्षित आहे. यात कामासाठी आणि विश्रांतीसाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींनी सुसज्ज लाकूड-पॅनेल केबिन आहेत. ट्रेनमध्ये मीटिंगसाठी एक मोठे लांब टेबल, एक आलिशान सोफा, टीव्ही आणि आरामदायी झोपण्याची व्यवस्था देखील आहे. जागतिक नेत्यांना आणि व्हीआयपींना युद्धग्रस्त देशात सुरक्षितपणे नेण्यासाठी ही ट्रेन वापरली जातेय. ही ट्रेन इलेक्ट्रिक इंजिनवर नाही तर डिझेल इंजिनवर चालतेय.