Israel Palestine Crisis | महिला लाईव्ह रिपोर्टींग करत होती अन् तितक्यात.. अंगावर काटा आणणार हृदयद्रावक व्हिडीओ समोर
Israel Palestine Crisis | इस्त्रायलमध्ये तणावग्रस्त वातावरण, लाईव्ह रिपोर्टींग करत असताना महिले समोर आलं मोठं संकट... हृदयद्रावक घटनेचा व्हिडीओ समोर येताच सर्वत्र खळबळ... इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचं मोठं वक्तव्य
मुंबई | 8 ऑक्टोबर 2023 : इस्त्रायलमध्ये तणावग्रस्त वातावरण आहे. शुक्रवारी रात्री पॅलेस्टाईनच्या हमास संघटनेने इस्त्रायलवर हल्ला (Israel Palestine Crisis) केल्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी आहे. सध्या संपू्र्ण जगाचं लक्ष इस्त्रायलकडे आहे. हमासने अचानक केलेल्या हल्ल्याला इस्रायलने काय उत्तर द्यावं यावर चर्चा सुरु असल्याची देखील माहिती मिळत आहे. देशातील वादग्रस्त परिस्थिती लक्षात घेत इस्रायलच्या राजकीय-सुरक्षा मंत्रिमंडळाची काल रात्री उशिरा बैठक बोलावण्यात आल्याची देखील माहिती मिळत आहे.
इस्त्रायलमधील तणावग्रस्त वातावरणामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. पॅलेस्टाईनने केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलने देखील प्रत्युत्तर देत लष्करी कारवाई सुरू केली आहे. ज्यासाठी इस्त्रायलने तोफ आणि लढाऊ विमान गाझाकडे वळवले आहे. दरम्यान, इस्रायलकडून होत असलेल्या कारवाईत पॅलेस्टाईनचं मोठं नुकसान झालं आहे.
पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने शनिवारी इस्राईलवर अचानक केलेल्या हल्ल्यानंतर युद्ध सुरु झाले आहे. यामध्ये अनेक नागरिकांचे देखील प्राण गेले आहेत. सध्या वादग्रस्त परिस्थितीचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे..
Residential Palestine Tower in the heart of Gaza City targeted in direct hit ON LIVE TV by Israel. pic.twitter.com/u4wBLg45mt
— Jackson Hinkle 🇺🇸 (@jacksonhinklle) October 7, 2023
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक महिला अँकर लाईव्ह रिपोर्टींग करताना दिसत आहे. घटनेची माहिती आपल्या वाहिनीद्वारे देत असतात अचानक महिलेच्या मागे असणाऱ्या इमाररतीत स्फोट होतो. ज्यामुळे महिला अँकर घाबरते. हृदयद्रावक प्रसंद कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सध्या सर्वत्र व्हायरल होत असलेल्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचं वक्तव्य
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले, ‘आम्ही तात्काळ प्रत्युत्तर दिलं. आमचं उद्दिष्ट साध्य होईपर्यंत हे हल्ले सुरूच राहतील. हमास गेल्या अनेक वर्षांपासून इस्त्रायली नागरिकांना धमकावण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे त्यांची ही इच्छा आम्ही संपवणार आहोत. आम्ही देशातील नागरिकांना सुरक्षा देवू आणि आम्ही जिंकू… मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयांमध्ये शत्रूंना वीज, इंधन आणि इतर वस्तूंचा पुरवठा थांबवण्याचा समावेश आहे..’