AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Russia Coal mine Blast: सायबेरियन कोळशाच्या खाणीत भिषण स्फोट, 52 ठार, 239 जणांची विषारी धुरातून सुटका

एकूण 285 लोक गुरुवारी पहाटे Listvyazhnaya खाणीत होते. स्फोटानंतर काही वेळातच विषारी धुर वेंटिलेशन सिस्टमद्वारे पुर्ण खाणीत पसरला. बचावकर्त्यांनी 239 खाण कामगारांना बाहेक काढले, 49 जखमी होते आणि 11 मृतदेह त्यांना सापडले. मात्र, खाणीत एकदम आतल्या भागात अडकलेल्या इतरांचा शोध घेत असताना, सहा बचावकर्ते देखील नंतर मरण पावले.

Russia Coal mine Blast: सायबेरियन कोळशाच्या खाणीत भिषण स्फोट, 52 ठार, 239 जणांची विषारी धुरातून सुटका
Siberia Coal mine blast (AP)
| Edited By: | Updated on: Nov 26, 2021 | 1:29 PM
Share

मॉस्को: सायबेरियाच्या (Siberia, Russia Coal mine) कोळशाच्या खाणीत गुरुवारी झालेल्या भिषण स्फोटात कामगार आणि त्यांच्या बचावासाठी आलेल्या बचावकर्य टीममधल्या काही लोकांसह एकूण 52 जणांचा मृत्यू झाला आहे. सुमारे 250 मीटर (820 फूट) जमिनीखाली हा स्फोटात झाला, रशियन अधिकाऱ्यांनी सांगितले. मिथेन वायूच्या स्फोटानंतर काही वेळात आगीचा विषारी धुर खाणीत पसरला होता, ज्यामुळे बचावकार्य अत्यंत कठीण होते. बचावकर्त्यांना सुरूवातीला 14 मृतदेह सापडले, पण आगीतून मिथेन आणि कार्बन मोनोऑक्साइड वायू तयार झाल्यामुळे त्यांना इतर 38 कामगारांचा शोध थांबवावा लागला. टीमने मात्र, इतर 239 जणांना खाणीतून बाहेर काढले आणि त्यांची सुटका करण्यात आली. आपत्कालीन दलाच्या अधिका-यांनी नंतर मिडीयाला सांगितले की खाणीत आणखी कोणीही जिवंत सापडण्याची शक्यता नाही. ही घटना सायबेरियाच्या केमेरोवो (Kemerovo) प्रदेशातल्या लिस्टव्यझनाया (Listvyazhnaya) खाणीत झाली आहे.

ज्या 52 जणांचा मृत्यू झाला आहे, तो आगीने नाही तर कार्बन मोनॉक्साईडच्या विषबाधेमुळे झाला आहे. स्फोटानंतर खाणीत विषारी धुर पसरला होता. 2010 नंतरचा हा रशियामधील हा सर्वात प्राणघातक खाण अपघात होता. दहा अकरा वर्षांपुर्वी केमेरोवो प्रदेशातील रास्पाडस्काया खाणीत दोन मिथेन स्फोटांच्या आगीत 91 लोकांचा मृत्यू झाला होता.

तीन दिवसांचा दुखवटा जाहीर

एकूण 285 लोक गुरुवारी पहाटे Listvyazhnaya खाणीत होते. स्फोटानंतर काही वेळातच विषारी धुर वेंटिलेशन सिस्टमद्वारे पुर्ण खाणीत पसरला. बचावकर्त्यांनी 239 खाण कामगारांना बाहेक काढले, 49 जखमी होते आणि 11 मृतदेह त्यांना सापडले. मात्र, खाणीत एकदम आतल्या भागात अडकलेल्या इतरांचा शोध घेत असताना, सहा बचावकर्ते देखील नंतर मरण पावले.

सर्बियाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मृतांच्या कुटुंबियांना शोक व्यक्त केला आणि जखमींना आवश्यक ती सर्व मदत देण्याचे आदेश सरकारला दिले.

रशियाचे डेप्युटी प्रॉसिक्युटर जनरल दिमित्री डेमेशिन यांनी पत्रकारांना सांगितले की, आग बहुतेक मिथेनच्या स्फोटामुळे लागली हेती आणि एकूण तपास चालू आहे. रशियाच्या तपास समितीने या घटनेची गुन्हेगारी चौकशी (criminal investigation) सुरू केली आहे. सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आगीत मृत्यू झाले असा तायंना संशय आहे. खाणीचे संचालक आणि दोन वरिष्ठ व्यवस्थापकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

इतर बातम्या

उत्तर कोरियात आता काळ्या लेदर कोटवर बंदी, सनकी किमच्या सरकारने हा निर्णय का घेतला, वाचा सविस्तर!

मोठी बातमी ! फ्रान्स, जर्मनी, इंग्लंडमध्ये कोरोनाची तिसरी लाट धडकली, पोर्तुगाल, झेक रिपब्लिकमध्ये आणीबाणीची घोषणा

BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...