Russia Ukraine War Live : युक्रेनमध्ये रक्ततांडव, खार्विकवरील हल्ल्यात 8 मृत्यू

| Updated on: Mar 01, 2022 | 11:47 PM

Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूजसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Russia Ukraine War Live : युक्रेनमध्ये रक्ततांडव, खार्विकवरील हल्ल्यात 8 मृत्यू
युक्रेनमधील भारतीयांना मोठा अलर्टImage Credit source: PTI

मुंबई : आज सोमवार 1 मार्च (March) रशिया आणि युक्रेन दोन देशात सध्या सुरू युद्धाची झळ पुढच्या काही दिवसात अनेक देशांना सेसावी लागणार असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. रशियाकडून (Russia) होत असलेल्या हल्ल्यामुळे युक्रेनच्या (Ukraine) अनेक महत्त्वाच्या शहरात अनेक सामान्य नागरिकांचे मृत्यू झाले आहेत. त्याचबरोबर युक्रेनकडून दिलेल्या प्रत्युत्तरात रशियाचे सुध्दा अनेक सैनिक मारले गेले आहेत. रशियाने युक्रेनची राजधानी कीव मधील सरकारी कार्यालये आणि लष्करसाठा मोठ्या प्रमाणात उद्वस्त केले आहेत. रशिया-यूक्रेनमधील युद्ध कुठल्याही स्थितीत थांबणं गरजेचं असल्याची संयुक्त राष्ट्राच्या महासभेत चर्चा झाली आहे. जर खरोखरंच पुतिननं यूक्रेनवर अणूबाँब टाकला तर काय काय होऊ शकतं? याची सुध्दा चिंता जगातल्या अनेकांना लागली आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 01 Mar 2022 10:50 PM (IST)

    आतापर्यंत 60 टक्के भारतीयांनी युक्रेन सोडले

  • 01 Mar 2022 09:26 PM (IST)

    खार्किववर झालेल्या रशियन हवाई हल्ल्यात आठ ठार: एएफपी

  • 01 Mar 2022 08:38 PM (IST)

    युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा

    चार्ल्स मिशेल यांनी ट्विट केले की, “निर्दोष नागरिकांवरील रशियन हल्ल्यांमुळे आज खार्किवमध्ये एका भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूबद्दल मी शोक व्यक्त करतो.”

  • 01 Mar 2022 08:36 PM (IST)

    UNHRC मधून रशियाची हकालपट्टी करावी

    युनायटेड नेशन्स ह्युमन राइट्स कौन्सिल (UNHRC) च्या सदस्यत्वातून रशियाला काढून टाकण्यात यावे, असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी सुचवले आहे. युक्रेनवरील हल्ल्याबाबत त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

  • 01 Mar 2022 08:31 PM (IST)

    रशिया-युक्रेनमध्ये चर्चेची दुसरी फेरी होणार

    बुधवारी रशिया आणि युक्रेन यांच्यात दुसऱ्या भेटीसाठी चर्चा होणार आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने रशियाच्या एका सूत्राच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

  • 01 Mar 2022 07:59 PM (IST)

    ब्रिटनची मागणी काय?

    रशियाला संयुक्त राष्ट्र परिषदेतून बाहेर काढण्याची ब्रिटनची मागणी-एएफपी

  • 01 Mar 2022 07:57 PM (IST)

    युक्रेनच्या राजदुतांची मोदींना साद

    हे मुघलांनी राजपुतांविरुद्ध घडवलेल्या नरसंहारासारखे आहे. बॉम्बिंग आणि गोळीबार थांबवण्यासाठी मोदींनी पुतीन यांच्याविरोधात सर्व ताकद वापरावी : डॉ. इगोर पोलिखा, भारतातील युक्रेनचे राजदूत

  • 01 Mar 2022 06:54 PM (IST)

    दिल्लीतल्या हलचाली वाढल्या, युक्रेनबाबत मोदींनी बैठक बोलवली

  • 01 Mar 2022 06:52 PM (IST)

    युक्रेनने चीनची मदत मागितली

    रशियाशी युद्ध सुरू असताना युक्रेनने चीनकडे मदत मागितली आहे. मात्र, हे प्रकरण मुत्सद्देगिरीने सोडवायला हवे, असे चीनने म्हटले आहे.

  • 01 Mar 2022 06:24 PM (IST)

    युक्रेनमध्ये रशियाचा गोळीबार

    युक्रेनमधील खार्किवमध्ये रशियाने गोळीबार केला आहे. या हल्ल्यात 10 जणांचा मृत्यू झाला आहे.

  • 01 Mar 2022 06:03 PM (IST)

    युक्रेनबाबत पंतप्रधान मोदींनी बोलवली बैठक

    काही वेळात बैठकीला होणार सुरुवात

    अति महत्त्वाची बैठक पंतप्रधान मोदींनी बोलवली

    कर्नाटकमधील विद्यार्थ्याच्या मृत्यू नंतर केंद्र सरकारच्या मोठ्या हालचाली

    वरिष्ठ मंत्री आणि अधिकारी बैठकीला उपस्थित राहणार

  • 01 Mar 2022 05:44 PM (IST)

    फोनवरून पंतप्रधान मोदी यांनी केलं सांत्वन

    कर्नाटक मधील नवीनच्या घरी नातेवाईकांची गर्दी

    पंतप्रधान मोदी यांनी नवीनच्या वडिलांशी साधला संवाद

    फोनवरून पंतप्रधान मोदी यांनी केलं सांत्वन

    नवीन याचा मृतदेह भारतात आणण्यासाठी प्रयत्न करणार – परराष्ट्र मंत्रालय

    हावेरी जिल्ह्यातील चलागेरी येथील नवीनच्या घरी नातेवाईकांची गर्दी

    रशियाच्या हल्ल्यात नवीनचा दुर्दैवी मृत्यू

  • 01 Mar 2022 05:43 PM (IST)

    बेलारूसच्या सैनिकांनी युक्रेनवर हल्ला केला

    बेलारशियन सैन्याने युक्रेनवर हल्ला केल्याचा दावा युक्रेनने केला आहे. दरम्यान, रशियाचा ताफा राजधानी कीवच्या दिशेने जात आहे.

  • 01 Mar 2022 04:57 PM (IST)

    युक्रेनमध्ये ठार झालेल्या विद्यार्थ्याच्या वडिलांचा दूतावासावर आरोप

    मंगळवारी युक्रेनमध्ये ठार झालेल्या एका भारतीय विद्यार्थ्याच्या वडिलांनी आरोप केला की, युक्रेनमधील खार्किवमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांपर्यंत भारतीय दूतावासाचा कोणताही अधिकारी पोहोचला नाही. येथील गोळीबारात कर्नाटकातील एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.

  • 01 Mar 2022 03:40 PM (IST)

    युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

  • 01 Mar 2022 02:16 PM (IST)

    मोदींचे भारतीय हवाई दलाला निर्वासन प्रयत्नांमध्ये सामील होण्याचे आवाहन

    ऑपरेशन गंगा अंतर्गत युक्रेनमधून सुरू असलेल्या निर्वासन प्रयत्नांना गती देण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय हवाई दलाला निर्वासन प्रयत्नांमध्ये सामील होण्याचे आवाहन केले आहे:

  • 01 Mar 2022 02:12 PM (IST)

    केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्याकडून विद्यार्थ्यांचं स्वागत

    केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी परतलेल्यांचे दिल्ली विमानतळावरती स्वागत केले आहे,

  • 01 Mar 2022 01:54 PM (IST)

    युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी रोमानियामार्ग दिल्लीत दाखल

    युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना घेऊन जाणारे विमान रोमानियाहून दिल्लीत आले

    केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी परतलेल्यांचे स्वागत केले, त्यांना आश्वासन दिले की युक्रेनमध्ये अडकलेल्या सर्व भारतीयांची सुटका करण्यासाठी भारत सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे

  • 01 Mar 2022 01:30 PM (IST)

    युक्रेनमधील भारतीय दूतावासाने ‘त्वरितपणे कीव सोडा’ असा सल्ला दिला आहे

    रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) यांच्यात सध्याची परिस्थिता युद्ध अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्यामुळे युक्रेनमध्ये वास्तव करीत असलेल्या भारतीयांना तात्काळ युक्रेन सोडण्याचा सल्ला युक्रेनचे भारतीय दुतावासाने दिले आहे.

  • 01 Mar 2022 12:55 PM (IST)

    भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी केंद्रीय मंत्री हरदीप सिंग यांचा पुढाकार

    युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी हंगेरीतील बुडापेस्टला जात आहेत.

  • 01 Mar 2022 12:26 PM (IST)

    ऑपरेशन गंगा आँपरेशनला भारतीय वायुदलाने सुद्धा सहकार्य करावे

    ऑपरेशन गंगा आँपरेशनला भारतीय वायुदलाने सुद्धा सहकार्य करावे वायुदलाचे विमान सुद्धा आँपरेशन गंगा मध्ये असल्यास मोठ्या प्रमाणात मदत आणि आँपरेशन लवकरच होईल – आँपरेशनला सहकार्य करण्यासाठी C-17 विमानांचा वापर करावा पंतप्रधान नरेद्रं मोदी यांचे आदेश

  • 01 Mar 2022 12:24 PM (IST)

    भारतीयांना परत आणण्यासाठी स्लोव्हाकियाच्या कोसीस येथे विशेष उड्डाण चालवणार

    युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी स्पाइसजेट आज स्लोव्हाकियाच्या कोसीस येथे विशेष निर्वासन उड्डाण चालवणार आहे. केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी निर्वासनांवर देखरेख करण्यासाठी भारत सरकारचे विशेष दूत म्हणून कोसीसला जात आहेत असल्याचं म्हणटलं आहे.

  • 01 Mar 2022 12:19 PM (IST)

    युक्रेनमधील भारतीय दूतावासाने भारतीयांना आज तातडीने कीव सोडण्याचा सल्ला दिला आहे

    युक्रेनमधील भारतीय दूतावासाने भारतीयांना आज तातडीने कीव सोडण्याचा सल्ला दिला आहे

    Embassy of India in Ukraine advises Indians to leave Kyiv urgently today pic.twitter.com/tmoXpWTd1l

    — ANI (@ANI) March 1, 2022

  • 01 Mar 2022 12:18 PM (IST)

    भारतीय विद्यार्थ्यांचा एक गट पोलंडमध्ये दाखल

    युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचा एक गट पोलंडमध्ये दाखल झाला असून भारताकडे पुढील प्रवास करेल

  • 01 Mar 2022 11:18 AM (IST)

    युक्रेनच्या परिस्थितीवर भारतीय भागीदारांशी नियमितपणे संवाद साधत आहे: यूएस

    युक्रेनच्या परिस्थितीवर भारतीय भागीदारांशी नियमितपणे संवाद साधत आहे: यूएस

  • 01 Mar 2022 11:16 AM (IST)

    182 भारतीयांना घेऊन घेऊन सातवे विमान मुंबईत दाखल

    युक्रेनमध्ये अडकलेल्या 182 भारतीयांना घेऊन सातवे विमान मुंबईत दाखल

  • 01 Mar 2022 10:51 AM (IST)

    आम्ही आधीच रशियावरील निर्बंधांचे परिणाम पाहू लागलो आहोत – नेड प्राइस

    आम्ही आधीच रशियावरील निर्बंधांचे परिणाम पाहू लागलो आहोत. रुबलचे मूल्य एक सेंटपेक्षा कमी झाले आहे. S&P ने रशियाचे सार्वभौम कर्ज “जंक” स्थितीत खाली आणले. रशियन स्टॉक मार्केट किमान 5 मार्चपर्यंत बंद आहे – यूएस स्टेट डिपार्टमेंटचे प्रवक्ते नेड प्राइस

  • 01 Mar 2022 10:38 AM (IST)

    रशियन तेल आयातीवर कॅनडाची बंदी

    कॅनडा पंतप्रधान यांनी रशियन तेल आयातीवर कॅनडाची बंदी जाहीर केली

  • 01 Mar 2022 09:38 AM (IST)

    रशियाच्या राजनैतिक मिशनच्या 12 सदस्यांची हकालपट्टी

    युनायटेड नेशन्समधील रशियाच्या राजनैतिक मिशनच्या 12 सदस्यांची अमेरिकेने हकालपट्टी केली आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्रातील रशियाचे स्थायी प्रतिनिधी वसिली नेबेन्झिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.

  • 01 Mar 2022 09:15 AM (IST)

    रशियाकडून व्हॅक्यूम बॉम्बचा वापर, काय आहे बॉम्बची खासियत; जिनिव्हा करारानुसार बंदी

    रशियाने युक्रेन (Russia-Ukraine) मधील युद्धाचा आज पाचवा दिवस आहे, आत्तापर्यंत रशियाकडून युक्रेन देशाचं खूप मोठं नुकसान केलं आहे. त्यामुळे तिथली परिस्थीती अत्यंत वाईट असल्याचे आपण व्हिडीओ (Russia-Ukraine Crisis video) पाहतोय. सध्या दोन्ही देशांमध्ये वारंवार हल्ले सुरू असून त्यामध्ये अनेक सामान्य लोकांचे मृत्यू होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे युक्रेनमधील भीतीच्या सावटाखाली आहेत. रशियाने युक्रेनविरुद्ध प्रतिबंधित थर्मोबॅरिक शस्त्रे वापरल्याचे दावा युक्रेनचे राजदूत ओक्साना मार्कोव्हा (Oksana Markarova) यांनी केला आहे. तसेच यामुळे शक्तीशाली स्फोट घडवण्यासाठी परिसरातील ऑक्सीजन शोषून घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. जिनिव्हा करारानुसार थर्मोबॅरिक शस्त्रे पारंपारिक दारूगोळा बंदी असल्याचे देखील क्रेनचे राजदूत ओक्साना मार्कोव्हा यांनी म्हणटले आहे. त्यामुळे सध्याची युक्रेनमधील स्थिती अत्यंत वाईट असून दुस-या देशातील तिथं वास्तव करीत असलेली अनेक लोक तिथं अडकली आहेत. तसेच युक्रेनमधून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत आहेत.

  • 01 Mar 2022 08:45 AM (IST)

    आणखी 182 विद्यार्थी यूक्रेनहून मायदेशी

    यूक्रेनहून भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणणारे ऑपरेशन गंगा सध्या वेगात आहे. मुंबई विमानतळावर 182 विद्यार्थ्यांना घेऊन येणारं विमान उतरलं. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ह्या विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. हे सर्व विद्यार्थी रोमानियाच्या बुचारेस्टमधून दाखल झालेत.

  • 01 Mar 2022 07:48 AM (IST)

    रशियाच्या विरोधात अमेरीकेचा मोठा निर्णय

    रशियाच्याविरोधात अमेरीकेनं मोठी पाऊलं उचलायला सुरुवात केलीय. आधी आर्थिक निर्बंधांची घोषणा केलीय. आता अमेरीकेनं रशियाच्या 12 डिप्लोमॅटसची हकालपट्टी केलीय. त्यामुळे रशियाच्या कुटनितीक संबंधांवर थेट परिणाम होणार आहे.

     

  • 01 Mar 2022 07:27 AM (IST)

    यूक्रेनमध्ये हजारो बेघर, रशियालाही निर्बंधांची झळ

    रशियाच्या यूक्रेनवरील हल्ल्याचा पाचवा दिवस आहे. ह्या पाच दिवसात यूक्रेनमध्ये हजारो जण बेघर झालेत तर काही ठिकाणी आता लूटही होताना दिसतेय. अन्नधान्याचा तुटवडा जाणवायला सुरुवात झालीय. विशेष म्हणजे युद्धामुळे रशियावर जे निर्बंध लावलेले आहेत, त्याचाही फटका पहायला मिळतोय.

  • 01 Mar 2022 07:17 AM (IST)

    भारत पुन्हा तटस्थ, तरच युद्धावर पर्याय मिळेल

    UNHRC मध्ये यूक्रेनमधल्या संकटावर  डिबेट हवी की नको? भारत पुन्हा मतदानापासून दूर, 29 देशांचं चर्चेच्या बाजूनं मतदान तर दुसरीकडे पुतीन अजूनही भूमिकेवर ठाम. रशियाचे सुरक्षा संबंधी गरजा लक्षात घेतल्या तरच युद्ध थांबवण्यावर काही पर्याय निघू शकतो असं पुतीन यांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना सांगितल्याचं स्पुटनिकचं वृत्त.

  • 01 Mar 2022 07:08 AM (IST)

    यूक्रेनमधला शेवटचा सुरक्षित दिवस?

    रशियाचे यूक्रेनमध्ये हल्ले सुरुच. कीव आणि खारकिवनंतर इतर शहरेही रशियाच्या टार्गेटवर. बेलारुसमध्ये यूक्रेन-रशियात चर्चा सुरु असतानाही हल्ले होत होते असा यूक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा आरोप.

  • 01 Mar 2022 06:40 AM (IST)

    विद्यार्थ्यांना घेऊन युक्रेनमधून एक विमान भारताच्या दिशेने रवाना

    एयर इंडियाची विमान युक्रेनहुन भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन मुंबईसाठी रवाना..

    विमान IX 1202 मंगळवारी 1 मार्च रोजी सकाळी 7.30 ते 8.30 वाजे पर्यंत मुंबई एयरपोर्टवर पोहचेल अशी संभावना आहे..

Published On - Mar 01,2022 6:37 AM

Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.