Russia Ukraine War Live : युक्रेन रशियात चर्चेची दुसरी फेरी, युद्धावर तोडगा निघणार?

| Updated on: Mar 03, 2022 | 11:05 PM

Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूजसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Russia Ukraine War Live : युक्रेन रशियात चर्चेची दुसरी फेरी, युद्धावर तोडगा निघणार?
Image Credit source: PTI

रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या आठ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. युद्ध सुरू झाल्यामुळे युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेले अनेक भारतीय विद्यार्थी तिकडे अडकले आहेत. आता या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडून भारतात परत आणले जात आहे. यासाठी ऑपरेश गंगा नावाची मोहीम राबवण्यात आली आहे. दरम्यान याबाबत संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी माहिती दिली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या प्रत्येक भारतीय विद्यार्थ्याला परत भारतात आणणे हे आपले कर्तव्य आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत आणले जात आहेत. त्यासाठी रात्रंदिवस विमानाच्या फेऱ्या चालू आहेत. या मोहिमेत सहभागी झालेल्या आणि रात्रंदिवस काम करणाऱ्या क्रूचे मी अभिनंदन करतो असे भट यांनी म्हटले आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 03 Mar 2022 10:49 PM (IST)

    क्वाड परिषदेत मोदींनी काय भूमिका मांडली?

    या क्वाड परिषदेत बोलताना मोदींनी चर्चेतून मार्ग काढण्यावर भर दिला. आसियान, हिंदी महासागर क्षेत्र आणि पॅसिफिक बेटांमधील घडामोडींसह इतर मुद्द्यांवरही चर्चा या परिषेदत झाली आहे. पंतप्रधान मोदींनी UN चार्टरचे पालन करण्याच्या मुद्द्याचा पुनरुच्चार केला, सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर केला पाहिजे असेत मत मोदींनी नोंदवले: PMO

  • 03 Mar 2022 10:44 PM (IST)

    मोदींचा क्वाड परिषदेत सहभाग

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यासह क्वाड नेत्यांच्या आभासी शिखर परिषदेत भाग घेतला: PMO

  • 03 Mar 2022 09:06 PM (IST)

    रशिया-युक्रेनमध्ये चर्चा सुरू

    एएफपी वृत्तसंस्थेचे ट्विट

  • 03 Mar 2022 07:49 PM (IST)

    किरेन रिजिचू यांचा भारतीय विद्यार्थ्यांशी संवाद

    केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी स्लोव्हाकिया सीमेवर अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

  • 03 Mar 2022 07:11 PM (IST)

    भारतीयांचे मृतदेह आणण्यासाठी प्रयत्न सुरू

    युक्रेनमध्ये दोन भारतीयांचा मृत्यू वेगवेगळ्या कारणाने झाला आहे. आम्ही युक्रेनच्या दूतावासाशी संपर्क साधला आहे आणि नवीनचा मृतदेह भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत : MEA प्रवक्ते अरिंदम बागची

  • 03 Mar 2022 06:24 PM (IST)

    येत्या 24 तासांत भारतीय नागरिकांना 18 फ्लाइट्सद्वारे एअरलिफ्ट

    परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले, “आमची पहिली सूचना जारी झाल्यापासून एकूण 18,000 भारतीय नागरिकांनी युक्रेन सोडले आहे. ऑपरेशन गंगा अंतर्गत आतापर्यंत 30 फ्लाइटने 6,400 भारतीयांना युक्रेनमधून परत आणले आहे. पुढील 24 तासांत 18 फ्लाइटचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.

  • 03 Mar 2022 04:26 PM (IST)

    पाश्चात्य देश अणुयुद्धाच्या विचारात – रशिया

    रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी गुरुवारी पाश्चात्य देशांवर अणुयुद्धाचा विचार असल्याचा आरोप केला. लॅव्हरोव्ह यांनी रशियन आणि परदेशी माध्यमांना दिलेल्या ऑनलाइन मुलाखतीत सांगितले की, हे स्पष्ट आहे की तिसरे महायुद्ध केवळ अण्वस्त्र युद्ध असू शकते. मी हे निदर्शनास आणू इच्छितो की अणुयुद्धाची कल्पना रशियन लोकांच्या डोक्यात नसून पाश्चात्य देशांच्या नेत्यांच्या मनात सतत आहे.

  • 03 Mar 2022 03:56 PM (IST)

    युक्रेनमधून महाराष्ट्रातील विद्यार्थी नवी दिल्लीत दाखल

    मोठी पायपीट करून विद्यार्थी आले मायदेशात

    अजूनही अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याची माहिती

    सरकारकडून मदत पोचवण्याच विद्यार्थ्यांचं आवाहन

  • 03 Mar 2022 02:59 PM (IST)

    रशियाच्या मोठ्या नुकसानाचा युक्रेनचा दावा

  • 03 Mar 2022 02:56 PM (IST)

    रशिया आणि यूक्रेन यांच्यातील चर्चा थांबली, यूक्रेनचा मोठा निर्णय

    रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्धाचा आठवा दिवस आहे. आता यूक्रेननं रशियाशी चर्चा करण्यास नकार दिला आहे. दोन्ही देशांमध्ये पोलंड सीमेवर चर्चा होणार होती. चर्चेच्या दोन फेऱ्या अयशस्वी ठरल्यानंतर चर्चा थांबली आहे.

  • 03 Mar 2022 02:51 PM (IST)

    युक्रेनबाबत सल्लागार समितीची बैठक संपली

    युक्रेनमधील घडामोडींवर परराष्ट्र मंत्रालयाच्या सल्लागार समितीची बैठक नुकतीच संपल्याचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्विट केले. यात धोरणात्मक पैलूंवर चर्चा करण्यात आली. युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी तातडीने पाऊलं उचलण्यात येत आहेत.

  • 03 Mar 2022 01:59 PM (IST)

    ऑपरेशन गंगा : युक्रेनमधील विद्यार्थ्यांना घेऊन 9 विमाने भारताकडे रवाना

    युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना भारतात आणले जात असून, त्यासाठी ऑपरेशन गंगा नावाची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहीमेंतर्गत युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन आज हंगेरी, रोमानिया, स्लोवाकिया आणि पोलंडमधून 9 विमाने भारताकडे रवाना झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिली. या विमानांमधून जवळपास तीन हजार विद्यार्थी भारतात येणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

  • 03 Mar 2022 01:08 PM (IST)

    जर्मनी युक्रेनला आणखी 2,700 क्षेपणास्त्रे पुरवणार

    रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. युक्रेनला सध्या अनेक देशांकडून मदतीचा ओघ सुरू आहे. दरम्यान आता जर्मनी युक्रेनला आणखी 2,700 हवाई विरोधी क्षेपणास्त्रे पुरवणार असल्याची माहिती समोर येत आहे.

  • 03 Mar 2022 12:16 PM (IST)

    ‘युक्रेनमध्ये कुठल्याही भारतीय विद्यार्थ्याला ओलीस ठेवल्याचा अहवाल सरकारकडे नाही’

    युक्रेनमध्ये कुठल्याही भारतीय विद्यार्थ्याला ओलीस ठेवल्याचा अहवाल सरकारकडे नाही, युक्रेनमधील स्थानिक आमदाराचा खुलासा

  • 03 Mar 2022 11:16 AM (IST)

    आज 3726 विद्यार्थ्यांना युक्रेनमधून भारतात आणले जाणार – सिंधिया

    युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सध्या भारतात आणले जात आहे. त्यासाठी मोदी सरकारकडून ऑपरेशन गंगा नावाची मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहीमेंतर्गंत आज 3726 विद्यार्थ्यांना भारतात आणले जाणार असल्याची माहिती केंद्रीय नागरी उड्डान मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिली.

  • 03 Mar 2022 09:28 AM (IST)

    युक्रेनची राजधानी कीवमध्ये पुन्हा हवाई हल्ल्याचे संकेत

    रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या आठ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत युक्रेनचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक युक्रेनियन नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मोठ्याप्रमाणात वित्तहानी देखील झाली आहे. युद्ध मागे घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून रशियावर दबाव निर्माण केला जात आहे. मात्र या दबावाला न जुमानता रशियाचे युक्रेनवर हल्ले सुरूच आहेत. रशिया पुन्हा एकदा युक्रेनची राजधानी कीववर हवाई हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. या पार्श्वभूमीवर युक्रेनकडून पूर्ण खबरदारी घेण्यात येत असून, नागरिकांना बंकरबाहेर न येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहोत.

  • 03 Mar 2022 09:10 AM (IST)

    भारतीय पोरांची भूतदया, युद्धभूमीतून त्यांनी ‘टिप्या, स्वीटु’लाही सोबत आणलं

    रशिया आणि युक्रेनमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे युक्रेमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना रसकारकडून भारतात आणले जात आहे. मात्र यातील एका विद्यार्थ्याने चक्क युक्रेनमधून आपल्यासोबत दोन श्वान देखील आणले आहेत.

  • 03 Mar 2022 09:04 AM (IST)

    युक्रेनमध्ये अडकलेल्या 208 विद्यार्थ्यांना घेऊन हवाई दलाचे तिसरे विमान भारतात दाखल

    युक्रेनमध्ये अडकलेल्या 208 भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन हवाई दलाचे तिसरे विमान C-17 पोलंडमधील रझेझोमधून हिंडन एअरबेसवर दाखल. संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी विद्यार्थ्यांशी साधला संवाद

  • 03 Mar 2022 08:10 AM (IST)

    रशियन सैनिकांनी युक्रेनमधील खेरसन शहर ताब्यात घेतले

    गेल्या आठ दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. रशियाकडून युक्रेनवर होत असलेल्या हल्ल्यात आतापर्यंत युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान आता रशियाने दक्षिण युक्रेनमधील खेरसन शहर ताब्यात घेतले आहे. याबाबत युक्रेनच्या अधिकाऱ्यांकडून माहिती देण्यात आल्याचे ‘एएफपी’ने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

  • 03 Mar 2022 07:15 AM (IST)

    ऑपरेशन गंगा : 220 भारतीय नागरिकांसह दुसरे IAF विमान भारतात दाखल

    ऑपरेशन गंगा : 220 भारतीय नागरिकांसह दुसरे IAF विमान हिंडन एअरबेसवर पोहोचले

  • 03 Mar 2022 06:45 AM (IST)

    युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन एअर इंडियाचे विशेष विमान मुंबईत दाखल

    युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन एअर इंडियाचे विशेष विमान मुंबईत पोहोचले.

    ऑपरेशन गंगा या मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांना घेऊन मुंबईला पोहोचणारे एअर इंडियाचे हे तिसरे विमान आहे.

    या विमानाने 183 भारतीय नागरिकांना रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथून भारतात आणले

    केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी केले युक्रेनमधून भारतात परतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत

Published On - Mar 03,2022 6:19 AM

Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.