Russia Ukraine War Live : अमेरिका, जपानने रशियावरील निर्बंध कडक केले, बायडेन यांचा मोठा निर्णय

| Updated on: Mar 08, 2022 | 9:23 PM

Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूजसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Russia Ukraine War Live :  अमेरिका, जपानने रशियावरील निर्बंध कडक केले, बायडेन यांचा मोठा निर्णय
युद्धाची वेगवान अपडेटImage Credit source: tv9

मुंबई : आज मंगळवार 8 मार्च 2022. रशिया आणि युक्रेन युद्दावर (Russia Ukraine War) अजूनही तोडगा निघाला नाही. रशियाने अजूनही युक्रेनला गंभीर इशारा दिला आहे. तर दुसरीकडे रशियाचे युद्धात मोठे नुकसान झाल्याचा दावा करण्यात येत आहे. याच परिस्थिवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) आणि पंतप्रधान मोदी (Pm Modi) यांच्यात तासभर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी मोदींनी सध्याच्या परिस्थिबाबत पुतीन यांच्याकडून आढावा घेतला आहे. तर दुसरीकडे रशिया आणि युक्रेन यांच्यात चर्चेची तिसरी फेरी होण्याची शक्यता आहे. त्यासाठी रिशियाची टीम बेलारुसमध्ये पोहोचली आहे. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना युक्रेन आणि रशियाच्या चर्चेच्या स्थितीची माहिती दिली. पीएम मोदींनी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना त्यांच्या संघांमध्ये सुरू असलेल्या चर्चेव्यतिरिक्त युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी थेट चर्चा करण्याचे आवाहन केले आहे. सुमीसह युक्रेनच्या काही भागांमध्ये युद्धविराम आणि कॉरिडॉरच्या घोषणेची त्यांनी प्रशंसा केली.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 08 Mar 2022 08:04 PM (IST)

    बायडेन रशियन तेलाच्या आयातीवर निर्बंध लादणार

    अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन रशियाच्या तेलाच्या आयातीवर निर्बंध लादणार आहेत. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाला प्रत्युत्तर म्हणून रशियाची अर्थव्यवस्था कमकुवत केली जाईल.

  • 08 Mar 2022 08:01 PM (IST)

    जपानने रशियावर आणखी निर्बंध लादले

    जपानने रशिया आणि बेलारूसमधील आणखी 32 लोकांची मालमत्ता गोठवली आहे. जपानने मंगळवारी चेचन रिपब्लिकचे प्रमुख रमजान कादिरोव, उप लष्करप्रमुख, राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या सरकारचे प्रेस सचिव आणि राज्य संसदेचे उपाध्यक्ष यांच्यासह 20 रशियन लोकांची मालमत्ता रोखून धरली. याशिवाय बेलारूसचे १२ अधिकारी आणि व्यावसायिक अधिकारी ज्यांवर जपानने बंदी घातली आहे त्यात बेलारूसच्या राष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष व्हिक्टर लुकाशेन्को यांचा समावेश आहे.

  • 08 Mar 2022 06:06 PM (IST)

    सुमीमधून भारतीयांना बाहेर काढले

    12 बसचा ताफा आज सुमी, युक्रेनहून निघाला. तेथे उपस्थित असलेल्या सर्व भारतीयांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. भारतीय दूतावास आणि रेडक्रॉसचे अधिकारी त्यांना सहकार्य करत आहेत. बांगलादेशी आणि नेपाळींनाही सुविधा देण्यात आल्या आहेत. ते सध्या पोल्टावा प्रदेशात जात आहेत.

  • 08 Mar 2022 03:49 PM (IST)

    सुमीतून बाहेर पडू लागले भारतीय

    युक्रेनच्या सुमी शहरात 700 भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले की, भारतीय विद्यार्थ्यांनी भरलेली बस सुमी येथून निघत आहे.

  • 08 Mar 2022 02:23 PM (IST)

    कीव शहरात मोठा धमाका होण्याची शक्यता

    रशिया आणि युक्रेनची राजधानी यांच्यात सध्या युद्धाची पातळी एका टोकाने गाठली असून तिथं मोठा धमाका होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

  • 08 Mar 2022 01:55 PM (IST)

    ‘202 शाळा आणि 34 रुग्णालये उद्ध्वस्त’

    सुमी हल्ल्यात आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा युक्रेनने केला आहे. येथे रशियन सैन्याने 500 किलो वजनाच्या बॉम्बने हल्ला केला आहे. रशियन हल्ल्यात 202 शाळा उद्ध्वस्त झाल्या आहेत. 34 रुग्णालयेही कचऱ्याच्या ढिगाऱ्यात बदलली आहेत. झिटोमिरमधील शाळेवर क्षेपणास्त्र हल्ला

  • 08 Mar 2022 01:52 PM (IST)

    ल्विव्हमध्ये 2 लाख युक्रेनियन, खायला अन्न नाही, राहायला जागा नाही

    ल्विव्हमध्ये 2 लाख युक्रेनियन, खायला अन्न नाही, राहायला जागा नाही

    ल्विव्हचे महापौर म्हणतात की ते 2 लाख विस्थापित युक्रेनियन लोकांना पोसण्यासाठी संघर्ष करत आहे. ते म्हणाले, पश्चिम युक्रेनमध्ये स्थित हे शहर, देशाच्या युद्धग्रस्त भागातून पळून गेलेल्या सुमारे 2 लाख विस्थापित युक्रेनियन लोकांना अन्न आणि घरे देण्यासाठी संघर्ष करत आहे.

  • 08 Mar 2022 12:24 PM (IST)

    रशियाच्या हल्ल्यात युक्रेनच्या 9 विद्यार्थ्यांचा मृत्यू

    युक्रेनमधील सुमी येथे रशियन हल्ल्यात दोन मुलांसह नऊ जण ठार झाले. बचाव कर्मचाऱ्यांनी घरांच्या ढिगाऱ्याखालून नागरिकांचे मृतदेह बाहेर काढले.

  • 08 Mar 2022 12:22 PM (IST)

    भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी सुरक्षित कॉरिडॉर अजून नाही

    भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला सांगितले की, रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांकडून वारंवार विनंती करूनही, पूर्व युक्रेनच्या सुमी शहरात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी सुरक्षित कॉरिडॉर तयार करण्यात आलेला नाही, याची काळजी आहे. भारताचे स्थानिक प्रतिनिधी आणि संयुक्त राष्ट्रातील राजदूत टी. एस. “भारताने सर्व प्रकारचे शत्रुत्व संपवण्याचे आवाहन केले आहे,” असे तिरुमूर्ती यांनी सोमवारी युक्रेनमधील मानवतावादी परिस्थितीवर सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सांगितले.

  • 08 Mar 2022 11:26 AM (IST)

    युक्रेनला 700 दशलक्ष डॉलर्स मिळतील

    रशियन हल्ल्यांचा सामना करत असलेल्या युक्रेनला जागतिक बँकेने मदतीचा हात पुढे केला आहे. देशाच्या अत्यावश्यक सेवांसाठी वित्तपुरवठा करण्यासाठी युक्रेनला जागतिक बँकेकडून $700 दशलक्ष पेक्षा जास्त मदत मिळेल.

  • 08 Mar 2022 11:24 AM (IST)

    रशिया-युक्रेन युद्धादरम्यान झालेल्या हल्ल्यात दुसरा अणु प्रकल्प उद्ध्वस्त

    रशिया-युक्रेन युद्धादरम्यान झालेल्या हल्ल्यात दुसरा अणु प्रकल्प उद्ध्वस्त झाला आहे. आतापर्यंत किरणोत्सर्गाची गळती झाल्याचे वृत्त नसले तरी धोका कायम आहे.

  • 08 Mar 2022 11:14 AM (IST)

    युक्रेनमधल्या एका विद्यार्थ्याने त्याच्या आगोदर प्राणी पाठवले भारतात

  • 08 Mar 2022 09:26 AM (IST)

    युक्रेन-रशिया चर्चेची तिसरी फेरी

    युक्रेन-रशिया चर्चेची तिसरी

  • 08 Mar 2022 07:39 AM (IST)

    युक्रेनने खार्किवजवळ रशियन मेजर जनरल विटाली गेरासिमोव्हची हत्या

    युक्रेनने खार्किवजवळ रशियन मेजर जनरल विटाली गेरासिमोव्हची हत्या केली, असे वृत्त द कीव इंडिपेंडंटने युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाच्या मुख्य गुप्तचर संचालनालयाच्या हवाल्याने दिले आहे.

  • 08 Mar 2022 07:36 AM (IST)

    युक्रेनमधून 200 भारतीय निर्वासितांना घेऊन एक विशेष विमान रोमानियातील सुसेवा येथून दिल्लीत परतले

    युक्रेनमधून 200 भारतीय निर्वासितांना घेऊन एक विशेष विमान रोमानियातील सुसेवा येथून दिल्लीत उतरले.

    “आम्ही बसमधून प्रवास करत असताना, कोणतेही बॉम्बस्फोट झाले नाहीत. सरकार आणि आमच्या दूतावासाने आम्हाला खूप मदत केली, आम्हाला परत आल्याने खूप आनंद झाला आहे,” युक्रेनमधून परतलेल्या एका विद्यार्थ्याने सांगितले.

  • 08 Mar 2022 07:35 AM (IST)

    रशियाकडून तेल आयात करण्यावर बंदीबाबत कोणताचं निर्णय

    रशियाकडून तेल आयात करण्यावर बंदी घालण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे

  • 08 Mar 2022 07:29 AM (IST)

    युक्रेनमधून आतापर्यंत 418 विद्यार्थी हिमाचल प्रदेशात परतले

    शिमला – युक्रेनमधून आतापर्यंत ४१८ विद्यार्थी हिमाचल प्रदेशात परतले असून ५८ विद्यार्थी येणे बाकी आहे. यातील काही विद्यार्थी युक्रेनमधील आहेत तर काही जवळपासच्या देशांमध्ये आहेत. सर्व विद्यार्थी सुरक्षित आहेत आणि लवकरच परत येण्याची अपेक्षा हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.

Published On - Mar 08,2022 6:16 AM

Follow us
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.