Russia Ukraine War : यूक्रेनच्या एक-एक इंच जमिनीचं रक्षण करणार, यूक्रेनला सैन्य आणि आर्थिक मदतही देणार- NATO

यूक्रेनच्या एक-एक इंच जमिनीचं संरक्षण केलं जाईल. त्याचबरोबर यूक्रेनला सैन्य आणि आर्थिक मदतही दिली जाईल, अशी घोषणा NATO कडून करण्यात आली आहे. दरम्यान, रशियान सैन्यानं कीवमध्ये मोठ्या प्रमाणात गोळीबार केलाय. रशियन सैन्य कुठल्याही क्षणी किववर कज्बा करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Russia Ukraine War : यूक्रेनच्या एक-एक इंच जमिनीचं रक्षण करणार, यूक्रेनला सैन्य आणि आर्थिक मदतही देणार- NATO
Ukraine Russia crisis
Follow us
| Updated on: Feb 26, 2022 | 12:09 AM

नवी दिल्ली : रशियाने यूक्रेनवरील आक्रमणाचा (Russia Ukraine War) दुसरा दिवस पूर्णपणे यूक्रेनची राजधानी कीव शहरावर केंद्रीत राहिला. शुक्रवारी पहाटे कीव परिसरात मोठ्या प्रमाणात बॉम्ब हल्ले आणि अनेक भागात गोळ्यांचा आवाज ऐकू येत राहिला. अशावेळी NATO  (North Atlantic Treaty Organization) कडून मोठी घोषणा करण्यात आलीय. त्यामुळे यूक्रेनला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. यूक्रेनच्या एक-एक इंच जमिनीचं संरक्षण केलं जाईल. त्याचबरोबर यूक्रेनला सैन्य आणि आर्थिक मदतही दिली जाईल, अशी घोषणा NATO कडून करण्यात आली आहे. दरम्यान, रशियान सैन्यानं कीवमध्ये मोठ्या प्रमाणात गोळीबार केलाय. रशियन सैन्य कुठल्याही क्षणी किववर कज्बा करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी यूक्रेनच्या सैन्याला सत्ता आपल्या ताब्यात घेण्याचं आवाहन केलं आहे.

रशियाने यूक्रेनमधील युद्धाचा परिणाम संपूर्ण युरोपवर पडण्याची शक्यता आहे. सोबतच हे युद्ध रोखण्यासाठी जगभरातून प्रयत्न केले जात आहेत. युद्धात मृतांची संख्या वाढत असल्यामुळे क्रेमलिनने सांगितलं की रशिया यूक्रेनच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी तयार आहे. तर पश्चिमी देशातील नेत्यांनी एक आपतकालीन बैठक बोलावली आहे. यूक्रेनच्या राष्ट्रपतींनी रशियाचा हा हल्ला रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरुन मदतीचं आवाहन केलं आहे.

पुतिन यांचं यूक्रेनच्या सैन्याला आवाहन

शियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांनी राजधानी कीवमधील विद्यमान सरकार हटवण्यास सांगितलं आहे. ‘मी पुन्हा एकदा यूक्रेनच्या सैन्यातील सैनिकांना आवाहन करतो. नव-नाझी आणि यूक्रेनी कट्टरपंथी राष्ट्रवाद्यांना आपली मुलं, बायका आणि वृद्धांना मानवी ढाल म्हणून वापर करु देऊ नका’, असं शुक्रवारी रशियाच्या सुरक्षा परिषदेत टीव्हीवर झालेल्या एका बैठकीत पुतिन म्हणाले. सत्ता तुमच्या हातात घ्या, त्यानंतर आपल्याला योग्य निर्णयापर्यंत पोहोचण्यास मदत होईल, असंही पुतिन म्हणाले. तसंच यूक्रेनमध्ये रशियन सैन्य मोठी बहादुरी आणि शौर्य दाखवत आहेत, अशा शब्दात पुतिन यांनी रशियन सैन्याचं कौतुक केलं आहे.

यूक्रेनच्या राष्ट्रपतींची मदतीसाठी विनंती

दरम्यान, पश्चिमी नेत्यांनी एक तातडीची बैठक बोलावली आहे. यूक्रेनच्या राष्ट्रपतींनी त्यांचं लोकशाही पद्धतीने आलेलं सरकार पाडू शकेल, मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊ शकेल आणि जागतिक अर्थव्यवस्थेला हानी पोहोचवू शकेल असे रशियाचे हल्ले रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय मदतीसाठी आवाहन केलं आहे.

इतर बातम्या :

Russia Ukraine War : महाराष्ट्रातील तब्बल 1200 विद्यार्थी यूक्रेनमध्ये अडकले, 300 विद्यार्थ्यांशी संपर्क; राज्य सरकारकडून हेल्पलाईन जारी

रशियाचे 1 हजार सैनिक मारले; युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा दावा,ओस्कोल नदीवरचा पूल जमीनदोस्त करुन संपर्क तोडला

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.