Breaking News: तिसरं महायुद्ध हे अणूयुद्ध असेल, पुतिनचे इरादे रशियाच्या परराष्ट्र मंत्र्याकडून जाहीर

रशियानं त्यांच्या न्यूक्लिअर डिटरन्स फोर्सला सज्ज राहण्याचे आदेश दिले होते. रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्ध अणवस्त्र युद्धाच्या दिशेनं जाणार का याची भीती व्यक्त करण्यात येत होती.

Breaking News: तिसरं महायुद्ध हे अणूयुद्ध असेल, पुतिनचे इरादे रशियाच्या परराष्ट्र मंत्र्याकडून जाहीर
तिसरं महायुद्ध कसं असेल, रशियानं थेट सांगितलंImage Credit source: Tv9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 02, 2022 | 4:09 PM

नवी दिल्ली: रशिया (Russia) आणि यूक्रेन (Ukraine) यांच्यातील युद्ध सुरु झालंय त्याला सात दिवस होत आले आहेत. रशियानं त्यांच्या न्यूक्लिअर डिटरन्स फोर्सला सज्ज राहण्याचे आदेश दिले होते. रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्ध अणवस्त्र युद्धाच्या दिशेनं जाणार का याची भीती व्यक्त करण्यात येत होती. काही तज्ज्ञांनी सध्या सुरु असलेला वाद तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात असल्याचं म्हटलं होतं. आता रशियाचे परराष्ट्र मंत्री सेर्जी लावरो (Sergey Lavrov) यांनी तिसरं महायुद्ध हे अणवस्त्रांचं असून विनाशकारी असेल, असा इशारा दिला आहे. त्यामुळं रशिया आणि युक्रेन युद्धामुळं जग आता तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचल्याचं स्पष्ट झालंय. हे युद्ध मनुष्यांसाठी विनाशकारी ठरण्याची शक्यता आहे.

 रशिया आणि यूक्रेन यांच्यातील वाटचाल तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेनं

रशियानं युक्रेनच्या नाटोमधील समावेशाच्या मुद्याला विरोध करत आक्रमण केलं आहे. रशियाकडून यूक्रेनमधील लष्करी तळांवर हल्ले केल्यानंतर आता मानवी वस्तीत हल्ले सुरु करण्यात आले आहेत. रशियावर युरोपियन देशांनी निर्बंध जाहीर केले आहेत. तर, दुसरीकडे अमेरिकेनं देखील निर्बंध लादले आहेत. रशियाला एकटं पाडण्यााचा प्रयत्न नाटो देशांकडून करण्यात येत आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी न्यूक्लिअर डिटरन्स फोर्सला सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यापार्श्वभूमीवर रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी तिसरं महायुद्ध हे अणवस्त्रांनी लढलं जाईल आणि ते विनाशकारी असेल, असं म्हटलं आहे. त्यामुळे जगावर आता तिसऱ्या महायुद्धाचं संकट घोंघावणार का हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल.

रशियाकडे किती अणवस्त्र

आंतरराष्ट्रीय विषयाच्या जाणकारांच्या माहितीनुसार रशियाकडे फादर ऑफ बॉम्ब आहे. जर रशियानं त्याचा वापर केल्यास युरोपचं नाही तर पूर्ण जग उद्धवस्त होऊ शकतं. पुतिन यांना त्यांच्या अणवस्त्रांची क्षमता माहिती आहे. यामुळं ते वारंवार अणवस्त्र वापरण्याची धमकी देत आहेत. रशियाकडे सद्यस्थितीत 4477 अणवस्त्र आहेत. फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्टच्या ताज्या अहवालानुसार 4477 अणवस्त्रांपैकी 2565 स्ट्रॅटेजिक आणि 1912 नॉन स्ट्रॅटेजिक अणवस्त्र आहेत.

न्यूक्लिअर डिटरंट फोर्स म्हणजे काय?

न्यक्लिअर डिटरंट फोर्स ही अणवस्त्रांच्या हल्ल्यापासून वाचवणारी तुकडी आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर सुरु झालेल्या शीतयुद्धात न्यूक्लिअर डिटरन्स थेअरी समोर आली होती. अमेरिका आणि रशिया यांच्यात शीतयुद्ध सुरु असताना अमेरिकेनं पहिल्यांदा न्यूक्लिअर डिटरंट फोर्स तयारी केली होती.

इतर बातम्या:

Video: तिरंगा आहे तर सुरक्षा आहे, यूक्रेनमध्ये जेव्हा तुर्की, पाकिस्तान्यांनाही तिरंग्यानं वाचवलं !

Russia Ukraine War Live : रशियाकडून आला मोठा अलर्ट, रशियाचे इरादे काय?

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.