रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे भारताबद्दल मोठे वक्तव्य, मोदींबाबत पाहा काय म्हणाले
Vladimir Putin on Narendra Modi : रशियाचे अध्यक्ष Vladimir Putin यांनी भारताचे कौतूक केले आहे. त्यांनी भारतीय नेतृत्वाचे देखील कौतूक केले आहे. भारताला कोणत्याही देशाच्या मार्गदर्शनाची गरज नाही. कारण त्याचं नेतृत्व सक्षम असल्याचं पुतिन यांनी भाषणात म्हटलं आहे.
मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल मोठे वक्तव्य केले आहे. वाल्डाई इंटरनॅशनल डिस्कशन क्लबमध्ये भाषण करत असताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. पुतिन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले आहे. पुतिन म्हणाले की, भारत हा एक शक्तिशाली देश आहे. पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली ते आणखी मजबूत होत आहे. भारतीय नेतृत्व हे राष्ट्रहिताचे निर्णय घेत असल्याचे देखील व्लादिमीर पुतीन यांनी म्हटले आहे. जगातील कोणताही देश भारतीय नेतृत्वाला मार्गदर्शन करू शकत नाही असे देखील पुतीन यांनी म्हटले आहे.
भारताचे नेतृत्व राष्ट्रहिताचे निर्णय घेत आहे
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पाश्चात्य देशांवर आरोप करत म्हणाले की, “एका ठराविक वेळी त्यांनी भारतासोबत असेच करण्याचा प्रयत्न केला. ते निश्चितच छेडछाड करत आहेत. हे आम्हा सर्वांना चांगले समजले आहे. आशियातील परिस्थिती आम्ही समजतो आणि पाहतो. सर्व काही स्पष्ट आहे. मला सांगायचे आहे की भारतीय नेतृत्व स्व-निर्देशित आहे. त्यांचे नेतृत्व राष्ट्रीय हितसंबंधांनी केले जाते.
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत सुधारणा व्हायला हवी
भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका हे देश संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अधिक जबाबदारीचे पात्र आहेत, असे रशियाचे अध्यक्ष म्हणाले. संयुक्त राष्ट्रांमध्ये हळूहळू सुधारणा व्हायला हवी. पुतिन म्हणाले, “भारताची लोकसंख्या 1.5 अब्जाहून अधिक आहे. तिची अर्थव्यवस्था 7 टक्क्यांहून अधिक वेगाने वाढत आहे. हा एक शक्तिशाली देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तो आणखी शक्तिशाली होत आहे.”
India is a Powerful country now. And it’s growing stronger and stronger under the leadership of PM Modi – Russian President Putinpic.twitter.com/3sSkD0RTeU
— Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) October 6, 2023
पंतप्रधान मोदींचे कौतुक
बुधवारी पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना ‘अत्यंत बुद्धिमान व्यक्ती’ म्हटले होते. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत खूप प्रगती करत असल्याचे ते म्हणाले होते. गेल्या महिन्यातही त्यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले होते आणि मेक इन इंडिया कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी ते ‘योग्य गोष्ट’ करत असल्याचे सांगितले होते.