रशियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत 160 अब्ज पौंड संपत्तीचे मालक; अलिशान कारची संख्या ऐकून थक्क व्हाल
रशियाच्या ज्या राष्ट्रपतींची संपत्तीचे आकडे बघाल तर तुम्ही हैराण व्हाल. रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्याकडे 160 बिलियन पाउंड संपत्तीचे मालक आहेत. या संपत्तीबरोबरच त्यांच्याकडे अनेक अलिशान कार आहेत, आणि एक भला मोठा त्यांच्याकडे असा गुप्त महल आहे. त्यांची संपत्ती सांगायचीच झाली तर 43 विमाने 7000 कार आणि गुप्त महल आहेत.
मॉस्कोः सध्या जगात एक नाव गाजत आहे ते म्हणजे व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांचे, आज जगभरातील सगळ्यांमध्ये त्यांचेच नाव चालत आहे. पुतीन म्हणजे कोणत्याही परिणामांचा विचार न करता एका मागून एक असे निर्णय घेणारे ते राष्ट्राध्यक्ष (President)आहेत. त्यांच्या या बेधडकपणामुळेच त्यांना जगभर ओळखले जाते. वयाची 69 वर्षे पूर्ण केलेले पुतीन हे गर्भश्रीमंतपणाची जिदंगी (Life of fetal wealth) जगतात. ते सगळ्यात श्रीमंत आहेत की नाहीत हा वादाचा मुद्दा ठरेल पण ते जे आयुष्य जगतात त्यामुळेच ते नेहमी चर्चेत राहतात.
द सनच्या अहवालानुसार पुतीन यांच्याजवळ 9641 अरबचे सोने त्यांच्या जवळ आहे. अलिशान कार आणि त्यांच्या मालकीची विमानांचा काफिला तर आहेच पण त्याच बरोबर त्यांचे खास असे महल आहेत. आताच्या त्यांच्या या भूमिकेमुळे काही जण असा निष्कर्ष काढत आहेत की, आता जे निर्बंध लादण्यात आले आहेत, त्या निर्बंधाकडे जर नजर टाकली तर असे दिसते की अनेक वर्षापासून ते याच घटनेची वाट बघत होते. गेल्या आठवड्यात, स्वीडनमधील क्रेमलिनचे राजदूत व्हिक्टर तातारिन्सेव्ह यांनी एक धोक्याचा इशारा दिला आहे, की पश्चिम रशियावर जितका जास्त दबाव आणण्याचा प्रयत्न होईल तितका तो जोरदार प्रत्युत्तर देणार आहे.
People flock to leave #Kyiv as Russian President Vladimir Putin commenced an attack on #Ukraine overnight, with explosions reported in multiple cities. ?: @PierreCrom pic.twitter.com/n6qPnuqPaA
— Getty Images News (@GettyImagesNews) February 24, 2022
पुतीन यांच्याकडे ९६४१ अब्ज रुपयांचे सोने आहे
रशिया हे राष्ट्र जगातील सर्वात प्रगत आणि सगळ्यात जास्त सोने खरेदीदारांपैकी एक देश आहे. रशियाकडे मॉस्को, सेंट पीटर्सबर्ग आणि येकातेरिनबर्ग येथे सोन्याचा प्रचंड मोठा साठा आहे. फोर्ब्सच्या मते, रशियाकडे 1995 मध्ये 1.4 अब्ज पौंड (152 अब्ज रुपये) सोन्याचा साठा होता. पण आज पुतिन यांच्याकडे ९५ अब्ज पौंड (९६४१ अब्ज रुपये) सोन्याचा साठा आहे. आणि हे सगळं सोने रहस्यमय ठिकाणी कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आले आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष 160 अब्ज पौंडांचे मालक आहेत
रशियापेक्षा जास्त सोने हे जगात फक्त अमेरिका, जर्मनी आणि इटलीकडे आहे. त्यामुळे पुतिन अनेक वर्षांपासून पाश्चात्य निर्बंधांची ते तयारीच करत होते अशी टीका केली जाते. इतकेच नाही तर रशियाकडे केंद्रीय बँकांमध्ये 472 दशलक्ष पौंड (47 अब्ज रुपये) ठेवी आहेत जे कठोर निर्बंधांवेळी वापरता येतील असे आहेत. टीकाकारांच्या मते, पुतिन हे स्वतः 160 अब्ज पौंडांचे (1,62,41,99,49,76,000 रुपये) मालक आहेत.
?????? BREAKING: The fighter jets have arrived #RussiaUkraineConflict Explosions are being heard in several Ukrainian cities, including Kyiv and Kharkiv. More Retweet #RussiaUkraineConflict #UkraineRussie #UkraineRussiaCrisis #Kyiv #RussiaUkraineConflict pic.twitter.com/mQX7ahsqq7
— kiran joshi (100% Follow Back) (@kiranjoshi235) February 24, 2022
पुतीन जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत का?
पुतीन यांच्या संपत्तीची तुलना करायचीच झाली तर जगातील सर्वात जास्त श्रीमंत एलोन मस्क आणि जेफ बेझोस यांच्याबरोबर केली जाते. त्यांच्याबरोबर तुलना केली असली तरी पुतिन यांची संपत्ती या दोघांपेक्षा कदाचित जास्त आहे. राजकीय विश्लेषक बोरिस नेमत्सोव्ह म्हणतात की, पुतीन यांच्याकडे 43 विमाने, 7000 कार आणि 15 हेलिकॉप्टर आहेत. ज्यात एक लक्झरी प्रायव्हेट जेट विमान आहे. ज्याच्या सोन्याच्या टॉयलेटची किंमत 50 लाख रुपये इतकी आहे.
फक्त 5 कोटी रुपयांची घड्याळे
पुतीन यांच्याकडे अलिशान कार आणि त्यांची विमाने, हेलिकॉप्टर आहेत तसेच त्यांना घड्याळाचीही आवड आहे. घड्याळ्यांचा त्यांचा असा खास संग्रह आहे, ज्याची किंमत ५ कोटी रुपयांच्या वर आहे. तर त्यांच्या घरातील टॉयलेट सोन्याचे असून त्याची किंमत 50 लाखापेक्षाही जास्त आहे.
संबंधित बातम्या
Russia-Ukraine war: ‘या’ मुद्यावरुन तुम्हाला कळेल रशिया आणि युक्रेनमध्ये का युद्ध सुरु आहे ते?
Ukraine Russia War: रशियाचा युक्रेवर हल्ला, युद्ध आणखीन पेटण्याचा धोका, असंख्य बेघर, शेकडो जखमी!