सांता क्लॉज आला, कोरोना देऊन गेला, तब्बल 121 जणांना संसर्ग, 5 जणांचा मृत्यू

कोरोना व्हायरलने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. याचदरम्यान, कोरोनाच्या भीतीमुळे सर्व सणसुद्धा कमी उत्साहात साजरे करण्यात येत आहेत.

सांता क्लॉज आला, कोरोना देऊन गेला, तब्बल 121 जणांना संसर्ग, 5 जणांचा मृत्यू
Follow us
| Updated on: Dec 28, 2020 | 11:01 AM

बेल्जियम : कोरोना व्हायरलने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. याचदरम्यान, कोरोनाच्या भीतीमुळे सर्व सणसुद्धा कमी उत्साहात साजरे करण्यात येत आहेत. मात्र, ख्रिसमसच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सांता क्लॉसने (Santa Claus) 157 लोकांना कोरोना बाधित केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.  हे प्रकरण बेल्जियमच्या (Belgium) मोल शहरातील एका केअर होममधील आहे. या घटनेनंतर लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Santa Claus made 157 people corona positive)

एका माहितीनुसार, 121 लोक आजारी पडले होते. तर यापैकी पाच लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ही घटना दोन आठवड्यांपूर्वीची असल्याचे सांगितले जात आहे. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, सांता क्लॉज आपल्या सहकाऱ्यांसह दोन आठवड्यांपूर्वी बेल्जियमच्या केअर होम येथे दाखल झाला. या केअर होममध्ये, कोरोनाची अनेक प्रकरणे आढळल्यानंतर, तेथे राहणाऱ्या सर्व लोकांची आणि काळजी घेणाऱ्या सर्व कर्मचार्‍यांची चाचणी घेण्यात आली. येथे 157 लोक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले.

तेथील स्थानिक महापौर विम कीयर्स म्हणाले की, पुढील काही दिवस खूप कठीण जाणार आहेत. केअर होमसाठी हा वाईट काळ आहे. यापूर्वी महापौरांनी सांताक्लॉजच्या केअर होमला भेट देताना हे नियम पाळले जात असल्याचे विधान केले होते. तथापि, केअर होमची फोटो पाहिल्यानंतर महापौर म्हणाले की, येथे नियमांचे पालन केले जात नाही. म्हणूनच, या घटनेवरून हे स्पष्ट झाले आहे की, केअर होमने निष्काळजीपणा घेतला आहे.

संबंधित बातम्या : 

कोरोनाशी लढाई जिंकता-जिंकता नाताळमध्ये अचानक रुग्ण वाढले, दक्षिण कोरियात नेमकं काय झालं?

Special Report | अमेरिकन कंपनी मॉडर्नाला विश्वास, नव्या विषाणूवर प्रभावशाली?

(Santa Claus made 157 people corona positive)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.