कुटुंबातील कोणतीही व्यक्ती मरताच महिलांची छाटली जातात बोटे; कुठे घडते अंगावर काटा आणणारी कुप्रथा?

अशी प्रथा ज्यामुळे एखाद्याचा जीवही जाऊ शकतो. या समाजाच्या प्रथेप्रमाणे घरात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास महिलांची बोटे छाटली जातात. ही भयानक प्रथा घडते तरी कुठे आणि त्यामगचं नेमकं कारण काय? जाणून घेऊयात

कुटुंबातील कोणतीही व्यक्ती मरताच महिलांची छाटली जातात बोटे;  कुठे घडते अंगावर काटा आणणारी कुप्रथा?
Follow us
| Updated on: Dec 12, 2024 | 4:30 PM

जगभरात अनेक अजब प्रथा आणि परंपरा आहेत ज्याबद्दल कदाचितच आपल्याला माहित असतं. पण काही परंपरा आणि प्रथा या अंधश्रद्धेच्या स्वरुपात मनुष्यासाठी धोकादायक बनतात. प्रत्येक समुदायात अशा बऱ्याच प्रथा असतात ज्या आपल्या कल्पनेबाहेरच्या असतात आणि मुळात आजही जग एवढं पुढे गेलं असतानाही अशा प्रथा आहे यावर विश्वास बसणं कठीण होऊन जातं. अशीच एक प्रथा आजही जिवंत आहे जिच्याबद्दल जाणून घेतल्यानंतर अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.

भारतासोबतच असे अनेक देश आहेत जेथील लोक आपल्या परंपरा सोडू इच्छित नाहीत. मात्र, काही परंपरा अशाही आहेत, ज्यावर तिथल्या सरकारनंही बंदी घातली आहे पण तरिही त्या काही भागात अजूनही सुरुच आहेत. ही परंपरा अशी आहे की, ज्यात घरातील सदस्याच्या मृत्यूनंतर चक्क घरातील महिला आपली बोटे कापतात किंवा कापली जातात? होय, ही परंपरा आजही या समुदायातील लोक त्यांची परंपरा म्हणून मानतात आणि त्याचं पालनही करतात. हे अत्यंत धक्कादायक आहे.

घरातील महिलांची बोटे छाटली जातात

आपण पाहिलं असेल की जेव्हा एखाद्याच्या घरातील सदस्याचं निधन होतं तेव्हा कुटुंबातील इतर सदस्य अतिशय भावनिक होतात. त्यांचं दुःख कमी करण्यासाठी सांत्वन करायला जवळचे नातेवाईकही समोर येतात. मात्र. इंडोनेशियामधील एका समजात लोक यापेक्षाही जास्त वेदना सहन करतात. कारण या घरातील महिलांना आपली बोटं कापतात.

एका वृत्तानुसार, जेव्हा या समाजातील त्यांच्या जवळच्या व्यक्तीचं निधन होतं तेव्हा घरातील सदस्याच्या निधनानंतर या महिलांच्या बोटांचा वरचा अर्धा भाग कापला जातो. असं मानलं जातं, की बोटं कापल्यानं मृत व्यक्तीचा अशांत आत्मा दूर राहतो, सोबतच हे दुःखाचं एक प्रतिक मानलं जातं.

मृत पावलेला व्यक्ती भूत होऊन छळू नये म्हणून ही प्रथा 

इतकंच नाही तर काही बाळांची बोटंही त्यांच्या आईकडून कापली जातात. या प्रथेला इकिपलिन म्हटलं जातं. बोटं कापण्याच्या या प्रथेवर इंडोनिशाच्या सरकारने काही वर्षांपूर्वीच बंद घातली आहे. मात्र ही प्रथा या समाजात इतकी रुजली आहे की, ती बंद होणं कठीण आहे. असं म्हटलं जातं, की अजूनही गुप्त पद्धतीनं ही प्रथा सुरूच आहे. अडीच लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या या समाजाचे लोक पश्चिमी न्यू गिनीच्या उंच आणि घनदाट भागात राहतात.

मृत पावलेला व्यक्ती भूत होऊन छळू नये म्हणून त्या घरातील महिलांची बोटे कापून टाकली जातात. बोटे कापण्याआधी त्याखालील भाग दोरीने करकचून बांधला जातो. जेणेकरून रक्तप्रवाह थांबावा. त्यानंतर कुऱ्हाडीने बोटे कापली जातात.

सरकारने बंदी घालूनही गुप्त पद्धतीनं प्रथा सुरुच 

इतकी भयंकर प्रथा पाहून खरच प्रश्न पडतो की या महिला इतक्या वेदना कशा काय सहन करत असतील आणि असे विचित्र अन् भयानक प्रकार प्रथा-परंपरेच्या नावाखाली किती दिवस सुरु राहणार आहेत? कारण अशा अघोरी प्रथांमुळे एखाद्याचा जीवही जाऊ शकतो.

दरम्यान, जगभरात अशा अनेक स्थानिक परंपरा आहेत ज्या बंदीनंतरही समाजातील लोक त्या पाळतात. सरकार याबाबत कठोर आहे, अशा परंपरांना खूप विरोधही झाला आहे मात्र त्या अजूनही थांबल्या नाहीत. अशा वाईट प्रथा आणि विधी फक्त स्त्रियांसाठीच का?, असा प्रश्नही अनेकदा उभा राहिला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...