अफगाणिस्तानमध्ये ‘पाकिस्तान मुर्दाबाद’चे नारे, रस्त्यावर उतरल्या महिला, तालिबान्यांचं गोळीबारानं उत्तर

तालिबानच्या प्रवक्त्यानं असा कुणीही विरोध केला तर तो सरकारच्याविरोधात द्रोह असल्याचं मानलं जाईल असं म्हटलंय. आज झालेल्या मोर्चावरही तालिबाननं गोळीबार केला. ह्या गोळीबारात किती जखमी झाले, मृत्यूमुखी पडले याचा आकडा समोर आलेला नाही. पण मोर्चावर तालिबाननं गोळीबार केल्याचं खात्रीशीर वृत्त आहे.

अफगाणिस्तानमध्ये 'पाकिस्तान मुर्दाबाद'चे नारे, रस्त्यावर उतरल्या महिला, तालिबान्यांचं गोळीबारानं उत्तर
तालिबानविरोधी रोष काबूलमध्ये पहायला मिळतोय, पाकिस्तान मुर्दाबादचे नारेही ऐकायला येतायत
Follow us
| Updated on: Sep 07, 2021 | 5:07 PM

काबूल : अफगाणिस्तानमध्ये अजून तालिबानचं सरकार अस्तित्वात आलेलं नाही. पण त्याआधीच अफगाण लोकांचा मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसतोय. त्यातही अफगाण महिला तालिबान्यांच्याविरोधात रस्त्यावर पुन्हा पुन्हा उतरतायत. त्यांना उत्तर म्हणून तालिबानी बंदुकीचा आधार घेतायत. आजही राजधानी काबूलमध्ये तालिबानच्याविरोधात एक मोठा मोर्चा निघाला. ह्या मोर्चात महिलांचं प्रमाण मोठं होतं. मोर्चात सहभागी झालेल्या अफगाण जनतेनं तालिबान मुर्दाबादचे नारे दिले. विशेष म्हणजे ह्या मोर्चात पाकिस्तानच्या बरबादीसाठी दुवा मागितली गेली.

पंजशीर जिंदा रहे तालिबाननं पंजशीरवर कब्जा केल्याची घोषणा केलीय. पण अजूनही अहमद मसूद, अमरुल्ला सालेह यांनी त्याला दुजोरा दिलेला नाही. उलट नॉर्दन अलायन्स हे तालिबान्यांच्याविरोधात पाय रोवून लढत असल्याचं जाहीर केलंय. काबूलमध्ये जी तालिबानविरोधी रॅली काढण्यात आली त्यात शंभरपेक्षा जास्त जण सहभागी होते. ह्यात महिलांचं प्रमाण अधिक होतं. आंदोलकांनी पाकिस्तानी राजदुताबाहेर जोरदार प्रदर्शन केलं. पाकिस्तान अफगाणिस्तानमध्ये ढवळा ढवळ करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. याच वेळेस पाकिस्तानच्याविरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी झाली. पाकिस्तान मुर्दाबाद, पंजशीर जिंदार रहे असे नारेही यावेळेस लावले गेले. विशेष म्हणजे यावेळेस महिलांनी, पंजशीरमध्ये ना तालिबान, ना पाकिस्तान, कुणालाही घुसू दिलं जाणार नसल्याची प्रतिज्ञा केली. रेजिस्टेंस फोर्स अमर रहेच्या घोषणाही दिल्या गेल्या.

तालिबानविरोधी रोष वाढतोय अफगाणिस्तानचा कब्जा करुन तालिबानला आता वीस दिवसांपेक्षा जास्त काळ लोटतोय. सरकार बनवण्यावरुन तालिबान, हक्कानी नेटवर्क यांच्या तणावपूर्ण स्थिती आहे. परिणामी तालिबानच्याविरोधात अफगाणी जनतेतही रोष वाढताना दिसतोय. त्यातल्या त्यात पाकिस्तान आणि त्यांची गुप्तचर संस्था ISI नं ज्याप्रमाणे अफगाणिस्तानच्या कारभारात, लोकांच्या आयुष्यात ढवळा ढवळ केलीय, त्यानेही अफगाण जनता संतप्त आहे. शेकडो अफगाण महिला आणि पुरुषांनी हातात तालिबान, पाकिस्तानविरोधी बॅनर घेऊन जोरदार प्रदर्शन केलं. संतप्त झालेल्या अफगाण जनतेनं आझादी, आझादीचे नारे लगावले तसच पाकिस्तान की मौत, ISI की मौत अशी नारेबाजी, बॅनरबाजीही केली. महिला ज्याप्रमाणं रस्त्यावर उतरतायत ते पहाता फक्त तालिबानच नाही तर पाकिस्तानलाही चांगलीच धडकी भरलीय.

अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानचे ड्रोन हल्ले

ISI प्रमुख खास कमांडोजसह सध्या काबूलमध्ये आहे. त्याच्याच पाठिंब्यावर तालिबाननं पंजशीरमध्ये अहमद मसूद आणि अमरुल्ला सालेहविरोधात मोर्चा उघडला. पण तालिबान तेवढ्यावरच थांबलेलं नाही. पंजशीर व्हॅली हा अफगाणिस्तानचा भाग आहे आणि तिथं पाकिस्तानी लष्करानं ड्रोन हल्ले केल्याचं आता उघड झालंय. म्हणजे तालिबाननं स्वत:च्याच भूभाग आणि जनतेवर दुसरा देश म्हणजेच पाकिस्तानला हल्ले करायला सांगितले किंवा तशी परवानगी दिलीय. त्याचाही रोष जनतेत दिसतोय. पण तालिबानला पाकिस्ताननं कायम पाठिंबा दिलाय. गेल्या 20 वर्षापासून पाकिस्ताननेच तालिबानला पोसलंय. तालिबान नेत्यांनीही अनेक वेळेस पाकिस्तान हे आमचं दुसरं घर असल्याचं म्हटलंय. त्यामुळे सरकारच्या स्थापना समारोहसाठी पाकिस्तानला विशेष निमंत्रण पाठवलं गेलंय.

आंदोलन मोडीत काढण्याचा दबाव

अफगाण जनता अशीच रस्त्यावर उतरली, त्यातही महिला जर याच प्रमाणात काबूलसह इतर ठिकाणी तालिबानच्याविरोधात उतरल्या तर परिस्थिती चिघळू शकते. त्यामुळेच हे आंदोलन, मोर्चे मोडीत काढण्यासाठी तालिबानवर पाकिस्तानचाही दबाव असल्याचं दिसतंय. तालिबानच्या प्रवक्त्यानं असा कुणीही विरोध केला तर तो सरकारच्याविरोधात द्रोह असल्याचं मानलं जाईल असं म्हटलंय. आज झालेल्या मोर्चावरही तालिबाननं गोळीबार केला. ह्या गोळीबारात किती जखमी झाले, मृत्यूमुखी पडले याचा आकडा समोर आलेला नाही. पण मोर्चावर तालिबाननं गोळीबार केल्याचं खात्रीशीर वृत्त आहे.

MHT CET Exam Date : एमएचटी सीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर, ‘या’ दिवशी परीक्षेला सुरुवात, उदय सामंतांची घोषणा

ती सहा महिन्यांची गर्भवती, आधी तिच्यावर तालिबाननं गोळ्या झाडल्या नंतर चेहरा विद्रूप केला, अफगाण महिला दुहेरी कचाट्यात?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.