कतारमध्ये अडकलेल्या माजी अधिकाऱ्यांना शाहरुख खानने सोडवले?; काय आहे सत्य?

भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी एक ट्विट केलं आणि त्याची गावभर चर्चा सुरू झाली. कतारमध्ये अडकलेल्या आठ भारतीयांना वाचवण्यात शाहरुख खानने मोठी भूमिका बजावल्याचं ट्विट सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं. त्यामुळे चर्चांना उधाण आलं. अखेर अभिनेता शाहरुख खानला या सर्व प्रकरणावर खुलासा करावा लागला आहे. शाहरुख खाननेच या प्रकरणाचं सत्य सांगितलं आहे.

कतारमध्ये अडकलेल्या माजी अधिकाऱ्यांना शाहरुख खानने सोडवले?; काय आहे सत्य?
Superstar Shah Rukh KhanImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 13, 2024 | 8:56 PM

दोहा | 13 फेब्रुवारी 2024 : कतारमध्ये भारतीय नौदलाचे आठ माजी अधिकारी अडकले होते. या नौदलाच्या अधिकाऱ्यांना प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानने सोडवल्याचं सांगितलं जात आहे. सकाळपासून शाहरुखनेच मदत केल्याचा मेसेज व्हायरल होत आहे. त्यावर शाहरुख खानने स्पष्टीकरण दिलं आहे. शाहरुखने या सर्व अफवा असल्याचं म्हटलं आहे. शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीने शाहरुखच्यावतीने खुलासा केला आहे. या प्रकरणात शाहरुख खानचा सहभाग असल्याची चर्चा निराधार असल्याचं पूजाने म्हटलं आहे.

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी आधी ट्विट करून हा दावा केला होता. कतारवरून नौदलाच्या माजी सैनिकांना सोडवण्यात शाहरुख खानची महत्त्वाची भूमिका होती, असं सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं होतं. मोदींना त्यांच्यासोबत शाहरुख खानला घेऊन जायला पाहिजे. कारण परराष्ट्र मंत्रालय आणि एनएसए कतारच्या शेखांना समजावण्यात अपयशी ठरले तर मोदींनी खानला हस्तक्षेप करण्याची विनंती केली. त्यानंतर आमच्या अधिकाऱ्यांना सोडवण्यासाठी एक अत्यंत महागडा करार झाला आहे, असं सुब्रमण्यम स्वामी म्हणाले.

स्वामींच्या ट्विटचा इन्कार

सुब्रमण्यम स्वामी यांच्या दाव्यानंतर इंटरनेटवर अनेक चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे शाहरुख खानच्या मॅनेजरने खुलासा करत अफवांना पूर्णविराम दिला आहे. कतारमध्ये फसलेल्या नौदलाच्या अधिकाऱ्यांना सोडवण्यात शाहरुख खानचा मोठा वाटा असल्याचं सांगितलं जात आहे. पण या दाव्यात काहीच तथ्य नाही, सर्व गोष्टी निराधार आणि चुकीच्या आहेत, असं शाहरुख खानच्या कार्यालयातून खुलासा करण्यात आला आहे.

एक भारतीय म्हणून आनंदी

अधिकाऱ्यांना सोडवण्याचं काम भारताच्या सरकारी अधिकाऱ्यांनी केलं आहे. शाहरुख खानचा यात सहभाग असल्याच्या वृत्ताचा आम्ही इन्कार करत आहोत. डिप्लोमसीशी संबंधित सर्व प्रकरणे सक्षम नेतेच सोडवतात. पण, भारतीय नौदलाचे अधिकारी सुखरूप मायदेशी पोहोचल्याने एक भारतीय म्हणून शाहरुख खान खूश आहेत. शाहरुख खान यांनी या अधिकाऱ्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत, असंही या खुलाश्यात म्हटलं आहे.

कतारहून सुटका

2022मध्ये भारतीय नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांना कतारमध्ये अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर इस्रायलसाठी हेरगिरी केल्याचा आरोप करण्यात आला होता. तेव्हापासून हे अधिकारी कतारमध्ये होते. काही दिवसांपूर्वी या अधिकाऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. मात्र, यापैकी सात अधिकारी आता घरी आले आहेत. तर एक अधिकारी कागदपत्रांची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर मायदेशी परतणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यूएई आणि कतारच्या दौऱ्यावर आहेत, अशावेळी सुब्रमण्यम स्वामी यांचं ट्विट आलं आहे. मोदी अबूधाबीत आहे. त्यांनी अहलान मोदी या कार्यक्रमाला संबोधितही केलं आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.