Taliban in Kabul: तालिबान्यांची काबूलमध्ये धडक, अफगाणिस्तानच्या राजधानीला वेढा, नेमकं काय घडतंय?

अफगाणिस्तान सरकारच्या हातातून दिवसेंदिवस देशाचा ताबा निसटत आहे. देशाच्या ग्रामीण भागात दबा धरून असलेलं तालिबान काबूल शहरापर्यंत येऊन पोहोचलंय. तालिबानने काबूलच्या बाहेरील भागात प्रवेश केला आहे.

Taliban in Kabul: तालिबान्यांची काबूलमध्ये धडक, अफगाणिस्तानच्या राजधानीला वेढा, नेमकं काय घडतंय?
तालिबानी काबूलच्या वेशीवर
Follow us
| Updated on: Aug 15, 2021 | 3:12 PM

काबूल: अफगाणिस्तान सरकारच्या हातातून दिवसेंदिवस देशाचा ताबा निसटत आहे. देशाच्या ग्रामीण भागात दबा धरून असलेलं तालिबान काबूल शहरापर्यंत येऊन पोहोचलंय. तालिबानने काबूलच्या बाहेरील भागात प्रवेश केला आहे. अफगाणिस्तान सरकारच्या माहितीनुसार तालिबान सर्व बाजूंनी राजधानीच्या दिशेने वाटचाल करत आहे. अद्याप लढाई सुरू झालेली नाही. दोन दशकांच्या लढाईनंतर अफगाणिस्तानातून अमेरिकन आणि नाटो सैन्याच्या संपूर्ण माघारीपूर्वी तालिबानने सर्व बाजूंनी देशाला व्यापलं असल्याचं अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. राजधानी काबूलच्या बाहेरील भागात प्रवेश करण्यापूर्वी तालिबानच्या अतिरेकी गटाने रविवारी सकाळी जलालाबादवर कब्जा केला.

अफगाणिस्तानातून येत असलेल्या रिपोर्टनुसार, तालिबानने त्यांच्या समर्थकांना काबूलच्या चहूबाजूनं थांबण्यास सांगितलं आहे. काबूलवर ‘बळाचा वापर करुन’ काबीज करु नये, असे तालिबानकडून त्यांच्या समर्थकांना आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वी, रविवारी सकाळी सरकारी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना अचानक घरी पाठवण्यात आल्याची बातमी आली होती. लष्कराची हेलिकॉप्टर आकाशात फिरू लागली असल्याचंही निदर्शनास आलं. दरम्यान, तालिबानने जलालाबाद ताब्यात घेतल्यानंतर काही तासांनी अमेरिकेची हेलिकॉप्टर रविवारी येथील अमेरिकन दूतावासावर उतरली आहेत. .

जलालाबादही ताब्यातून निसटलं

काबूल व्यतिरिक्त जलालाबाद हे एकमेव मोठे शहर होते जे तालिबानच्या ताब्यातून वाचले होते. जलालाबाद हे पाकिस्तानच्या सीमेवजवळ आहे जलालाबादवर देखील तालिबान्यांनी कब्जा केला आहे. आता अफगाणिस्तानच्या केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या देशाच्या 34 प्रांतीय राजधानींपैकी काबूल व्यतिरिक्त इतर फक्त सहा प्रांतीय राजधानी आहेत. अमेरिकन दूतावासाजवळ अमेरिकन लष्कराची सशस्त्र एसयूव्ही वाहने बाहेर येताना दिसली आणि त्यांच्याबरोबर विमानांची सतत हालचाल सुरू होती. मात्र, अमेरिकन सरकारने अद्याप याबाबत कोणतीही तात्काळ माहिती दिलेली नाही.

अमेरिकन अधिकाऱ्यांनी कागद जाळले

अमेरिकन दूतावासाच्या छताजवळ धूर दिसून आला, दोन अमेरिकन लष्करी अधिकाऱ्यांच्या मते राजनैतिक अधिकाऱ्यांनी संवेदनशील कागदपत्रे जाळल्यामुळे धूर झाला. झेक प्रजासत्ताकाने अफगाणिस्तानातील कर्मचाऱ्यांना आपल्या दूतावासातून बाहेर काढण्यासाठी तयारी सुरु केलीय. झेक प्रजसत्ताकनं त्यांच्या अधिकाऱ्यांना काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावर नेले. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी शनिवारी सांगितले की ते 20 वर्षांची “मेहनत” वाया जाऊ देणार नाहीत. ते म्हणाले की तालिबानच्या हल्ल्यावरुन “चर्चा” सुरू आहे.

सर्वसामान्यांच्या अडचणी वाढल्या

अशरफ गनी यांनी शनिवारी दूरदर्शनद्वारे राष्ट्राला संबोधित केले. तालिबानने अलिकडच्या दिवसांत प्रमुख क्षेत्रांवर कब्जा केल्यानंतर ही त्यांची पहिली सार्वजनिक भाषण केलं आहे. एकीकडे अमेरिका आपल्या दूतावासातील कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न तीव्र करत आहे. तर, दुसरीकडे हजारो नागरिक काबूलमधील उद्याने आणि मोकळ्या जागांमध्ये आश्रय घेत आहेत. रविवारी काबूलमध्ये शांतता होती परंतु अनेक एटीएममधून पैसे काढणे बंद करण्यात आले होते, शेकडो लोक खाजगी बँकांबाहेर जमले होते.

तालिबानने रविवारी सकाळी काही छायाचित्रे ऑनलाईन प्रसिद्ध केली. ज्यात नांगरहार प्रांताची राजधानी जलालाबाद येथील राज्यपाल कार्यालयात तालिबानचे लोक पाहायला मिळत आहेत. प्रांताचे खासदार अबरुल्ला मुराद यांनी असोसिएटेड प्रेसला सांगितले की अतिरेक्यांनी जलालाबाद ताब्यात घेतले आहे. गेल्या आठवड्यात तालिबानने अफगाणिस्तानचा मोठा भाग काबीज केला होता. त्यानंतर अफगाणिस्तानच्या केंद्र सरकारवर दबाव वाढला आहे. दुसरीकडे, अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडा यांनी त्यांच्या राजनैतिक कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी सैन्य पाठवले आहे.

मैदान वर्दकही सरकारच्या हातातून निसटले

अतिरेक्यांनी रविवारी मैदान वर्दकची राजधानी काबीज केली.ते काबूलपासून 90 किमी दूर आहे. अफगाणिस्तानचे चौथे सर्वात मोठे शहर, मजार-ए-शरीफ, तालिबान्यांनी शनिवारी संपूर्ण हल्ल्यानंतर ताब्यात घेतले आणि त्याच्याबरोबर संपूर्ण उत्तर अफगाणिस्तान अतिरेक्यांनी ताब्यात घेतला. दोन प्रादेशिक लष्करी प्रमुख अट्टा मोहम्मद नूर आणि अब्दुल रशीद दोस्तम शनिवारी उझबेकिस्तानला पळून गेले.

इतर बातम्या:

अफगाणिस्तानमध्ये तांडव, 10 प्रमुख शहरांवर कब्जा, तालिबान पुन्हा सत्तेत येणार?

Taliban entered in afghanistan kabul from all sides after seized major cities

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.