एका क्षणात झाला करोडपती! मच्छिमाराच्या हाती काय लागलं हे पाहून तुम्हीही थक्क व्हाल

चालरमचाई महापण नावाचा एक माणूस 6 जानेवारीला सोंगखला इथल्या समीला बीचवर मासेमारी करत होता. यावेळी त्याला एक मौलव्यान वस्तू हाती लागली.

एका क्षणात झाला करोडपती! मच्छिमाराच्या हाती काय लागलं हे पाहून तुम्हीही थक्क व्हाल
Follow us
| Updated on: Jan 21, 2021 | 11:59 AM

बँकॉक : ‘देने वाला जब भी देता देता छप्पर फाड़ के’ ही हिंदीमधील म्हण तुम्ही सगळ्यांनीच एकली असेल. पण अगदी या म्हणीसारखा प्रकार समोर आला आहे. एका मच्छिमाराला असं काही हाती लागलं की आता तो करोडपती झाला आहे. चालरमचाई महापण नावाचा एक माणूस 6 जानेवारीला सोंगखला इथल्या समीला बीचवर मासेमारी करत होता. यावेळी त्याला एक मौलव्यान वस्तू हाती लागली. त्याने तपास केला असता ही व्हेल माशाची उलटी असल्याचं समोर आलं. (thailand news fisherman found 7 kg blob of whale vomit that could be worth rs 1 7 crore)

मिळालेल्या माहितीनुसार, महापनाला मोमी व्हेलची 7 किलोची उलटी मिळाली ज्याची किंमत 1,71,000 युरो (1.7 कोटी रुपये) असू शकते. 20 वर्षांचा महापना त्याची बोटी डॉकमध्ये ठेवण्यासाठी परत येत होता. तेव्हा त्याला ही व्हेल माशाची उलटी मिळाली.

व्हेल उलटीला अ‍ॅम्बर्ग्रिस (ambergris) सुद्धा म्हणतात. एक घन, मेणाचा आणि ज्वालाग्राही पदार्थ व्हेलच्या पाचक प्रणालीत तयार होतो. तो राखाडी किंवा काळा रंगाचा असतो. अ‍ॅम्बर्ग्रिसला एक फिक्सिटेव्ह म्हणून अत्तर बनवण्यासाठी खूप मौल्यवान मानलं जातं. यामुळे सुगंध जास्त काळ टिकतो. यात काही खाण्यापिण्याच्या वस्तू देखील जोडल्या गेल्या आहेत.

‘सुरुवातीला वाटला साधा दगड, पण…’

जेव्हा महापनाला ही व्हेलची ही उलटी मिळाली तेव्हा त्याला वाटलं की हा एखादा साधा दगड असावा. पण जेव्हा त्याने बारकाईने पाहिलं तेव्हा ही व्हेलची उलटी असल्याचं त्याच्या लक्षात आलं. इतकंच नाही तर मी जेव्हा गावकऱ्यांना यासंबंधी विचारलं तेव्हा मला याची किंमत आणि ही उलटी किती मौल्यवान आहे याची माहिती मिळाल्याचं महापना म्हणाला.

मिळालेल्या माहितीनुसार, या उलटीचे सॅम्पल लॅबमध्ये पाठवण्यात आले असून तिथे ते अ‍ॅम्बर्ग्रिस असल्याचं स्पष्ट झालं आहे. यामुळे महापना स्वत:ला खूप भाग्यवान समजतो. आपण हे विकण्याची मला घाई केली नाही. एजंट त्यासाठी आंतरराष्ट्रीय खरेदीदार शोधणार असून याची प्रति किलोग्राम 100,000 किंमतीत विकला जाईल असं त्याला वाटतं. (thailand news fisherman found 7 kg blob of whale vomit that could be worth rs 1 7 crore)

संबंधित बातम्या – 

ट्रम्प तात्यानंतर ‘बायडेन भाऊ’-‘कमला अक्का’ची हवा, पुण्यात पोस्टरबाजी

दोन वाघ समोरासमोर भिडले, एकाने दुसऱ्याला लोळवलं, व्हिडीओ व्हायरल

(thailand news fisherman found 7 kg blob of whale vomit that could be worth rs 1 7 crore)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.