महिला स्वातंत्र्याच्या गप्पा मारणाऱ्या पाकिस्तानी मीडियाचा बुरखा फाटला, तालिबान्यांच्या समर्थनार्थ महिला अँकरने लाईव्ह शोमध्येच हिजाब घातला!
पाकिस्तानातील समा टीव्हीच्या या महिला अँकर चक्क हिजाब घालणं किती बरोबर आहे हे सांगण्यासाठी एक बुलेटीन काढतात. आणि टीव्हीवर सर्वांसमोर हिजाब घालून तालिबान्यांच्या कायद्याचं समर्थन करतात.
इस्लामाबाद: तालिबान्यांना पाठिशी घालणाऱ्या पाकिस्तानने आता तालिबानी कायदे कसे बरोबर आहेत, याचा प्रोपोगंडा करायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानी महिला न्यूज अँकरचा सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये या अँकर बाई चक्क हिजाब घालणं किती बरोबर आहे हे सांगण्यासाठी एक बुलेटीन काढतात. आणि टीव्हीवर सर्वांसमोर हिजाब घालून तालिबान्यांच्या कायद्याचं समर्थन करतात. विशेष म्हणजे, बाईंच्या या कृतीचं कट्टरतावादी मुस्लिमांकडून स्वागत केलं जात आहे. ( The female anchor of Pakistani news channel Samaa TV wear a hijab in a live show Pervez Hoodbhoy statement )
हिजाब घालून दाखवण्यामागचं नेमकं कारण काय?
पाकिस्तानाच्या कायदे आझम विद्यापीठात शिकवणाऱ्या प्राध्यापकांच्या वक्तव्यावरुन हा वाद सुरु झाला. या प्राध्यापकांचं नाव आहे परवेज हुडभोय. अतिशय हुशार असे हे प्राध्यापक समजले जातात. समाजातील कुप्रथांवर ते नेहमी परखडपणे बोलत असतात. तालिबानमध्ये लागू करण्यात आलेल्या कडक कायद्यांवर न्यूज वन या चॅनलवर एक डिबेट शो होता. ज्यामध्ये त्यांनी हिजाब प्रथेविरोधात आपली मतं मांडली.
काय म्हणाले होते प्रोफेसर हुडभोय?
ते म्हणाले ”मी 1973 साली पाकिस्तानात शिकवायला सुरुवात केली, 47 वर्षांपूर्वी एखादीच मुलगी बुरख्यात दिसायची, आता तर बुरखा कुणीही घालताना दिसतं. आता तर नॉर्मल मुली कुठंही दिसत नाहीत. आणि जेव्हा मुली वर्गात बसतात, तेव्हा त्या बुरखा आणि हिजाबमध्ये वर्गात असून नसल्यासारख्या असतात. वर्गातील त्यांची एक्टीव्हिटी एकदम कमी असते. कधी कधी लक्षातच येत नाही की त्या वर्गात आहेत की नाही ”
समा टीव्हीच्या अँकर बाईंनी काय केलं?
प्रोफेसर हुडभोय यांच्या या वक्तव्यावर काही केलं नसतं तर चर्चा कशी झाली असती? चॅनल चालवण्यासाठी काहीतरी भडवणारा विषय हवाच ना. म्हणूनच अँकर मॅडमने भारी तयारी केली आणि चक्क एक बुलेटीन प्रोफेसर हुडभोय यांच्या वक्तव्याविरोधात बुलेटीन काढलं. बरं हुडभोय हे या मॅडमच्या शो आलेलेही नव्हते, त्यांनी हे वक्तव्य एका दुसऱ्याच चॅनलवर केलं होतं. मग काय मॅडमने हिजाब कसा बरोबर? मी हिजाब घातल नसले तरी हिजाबचा आदर करते? हिजाब हा मुस्लिम महिलांचा सन्मान आहे? असं म्हणत चक्क न्यूज शो दरम्यान हिजाब घालून दाखवला. सोशल मीडियावर अनेक कट्टरतावाद्यांनी या अँकरचं कौतुक केलं, आणि हुडभोय यांच्यावर टीका केली. व्हिडीओ पाहा..
Good on you girl for putting this man in his place. Unbelievable that a man of Pervez Hoodbhoy’s stature can make such outrageous comments against those wearing hijab. He needs treatment. #Pervezhoodbhoy pic.twitter.com/IpumFUGCYq
— Lubna U Rifat (@lubnaurifat) September 16, 2021
हिजाब घालणाऱ्या अँकरच्या बोलण्यातील विरोधाभास
बरं, याच मॅडम शोमध्ये म्हणत आहे की, प्रोफेसर खूप हुशार आहे, ते बाहेर शिकले आहे, त्यांनी पाकिस्तानात एवढी वर्ष सेवा केली आहे. हेच नाही तर मी हिजाब घालत नाही. बरं एवढं कबुल केल्यानंतरही हिजाब कसा बरोबर हे या अँकरबाई समजून सांगतात. बरं ब्रेकनंतर पुन्हा नॉर्मल पद्धतीने बातम्या देऊ असंही बाई सांगतात. म्हणजे हिजाब घालून जसं तुम्ही बातम्या देऊ शकत नाही, त्याच प्रमाणे शाळा-महाविद्यालयात शिकताना हिजाब अडचणीचा ठरतो हेच हुजभोय सांगत होते. त्यालाच या बाईंनी विरोध केला. तुम्ही हा व्हिडीओ पाहा..
While defending the #hijab , he himself said that after the break we will start the program in a normal way #SamaaTV pic.twitter.com/46BCilKKsL
— Shani waseer ☭ (@ShahnawzWaseer) September 17, 2021
कोण आहेत प्रोफेसर परवेज हुडभोय?
परवेज हुडभोय हे पाकिस्तानातील कायदे आझम विद्यापीठात गेल्या 50 वर्षांपासून शिकवतात. त्यांना देशा-विदेशात मानलं जातं. त्यांनी इंग्लंडमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं. मात्र, इंग्लंडमध्ये नोकरी न करता, तिथं स्थायिक न होता ते पाकिस्तानात आले आणि विद्यापीठामध्ये मुलांना शिक्षणाचे धडे देऊ लागले. जेव्हा पाकिस्तान अफगाणिस्तानात तालिबानी विचारांना पोसत होता, तेव्हा पाकिस्तानातील हुडभोयसारखे विचारवंत त्याला विरोध करत होते. आणि आजही ते अनेक कुप्रथांविरोधात उघडपणे बोलतात.
हिजाब फाडणारी अफगाणिस्तानची राणी ते हिजाब घालून दाखवणारी पाकिस्तानी अँकर
एकीकडे जेव्हा समा टीव्हीच्या अँकर हिजाब घालून तो मुस्लिम महिलांसाठी कसा बरोबर आहे हे सांगत आहेत, आणि तालिबानचं समर्थन करत आहेत. त्याचवेळी अफगाणिस्तानातील एका राणीची आठवण होते. या राणीचं नाव होतं सोराया तर्जी, ही तिच राणी होती जिने भर सभेत आपला हिजाब फाडला होता, आणि महिला स्वतंत्र आहेत हे जगाला ठणकावून सांगितलं होतं. राणीच्या पाठोपाठ शेकडो अफगाण महिलांनी बुरखा उतरवला आणि हिजाब फाडला होता. आजपासून तब्बल 90 वर्षांपूर्वी स्वतंत्र विचार करणाऱ्या महिला अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात होत्या. परवेज हुडभोयसुद्धा महिला आधी किती स्वतंत्र होत्या आणि आता त्या कशा गुलामीकडे जात आहे यावरच बोट ठेवलं, जे पाकिस्तानातील कट्टरतावाद्यांना पटलं नाही.
संबंधित बातम्या:
वाढती कट्टरता जगासाठी नवं आव्हान, अफगाणिस्तान ताजं उदाहरण, SCO संमेलनात मोदींचं रोखठोक भाषण