इथून निघून जा नाहीतर…; चिमुरडीचा रुद्रावतार! हा व्हिडिओ नक्की रशिया-युक्रेन युद्धाचा आहे?
Russia Ukraine war : रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये (Ukraine) गेल्या अनेक दिवसांपासून संघर्ष सुरू होता. या संघर्षाचे रुपांतर अखेर युद्धात झाले. त्यातच एक व्हिडिओ समोर आला आहे. एका लहान मुलीचा (Little girl) एका सैनिकाशी भांडत असल्याचा हा व्हिडिओ आहे.
Russia Ukraine war : रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) या दोन देशांत गेल्या अनेक दिवसांपासून संघर्ष सुरू होता. या संघर्षाचे रुपांतर अखेर युद्धात झाले. गुरुवारी रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांनी सैन्याला युक्रेनवर हल्ला करण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर युद्धाला सुरुवात झाली आहे. आंतरराष्ट्रीय दबावाला न जुमानता गेल्या चार दिवसांपासून रशियाने युक्रेनविरोधात युद्ध सुरूच ठेवले आहे. या युद्धात युक्रेनचे मोठे नुकसान झाले असून, हजारो युक्रेनियन नागरिकांचा मृत्यू झालाय. रशियाने युक्रेनचे शेकडो सैन्यस्थळे उद्धवस्त केली आहेत. युक्रेनच्या नागरिकांचे हाल सांगण्यापलिकडचे आहेत. लहान मुले, वृद्ध आणि एकूनच नागरिक अत्यंत असुरक्षिततेच्या भावनेतून जगत आहेत. त्यातच एक व्हिडिओ समोर आला आहे. एका लहान मुलीचा (Little girl) एका सैनिकाशी भांडण होत असल्याचा हा व्हिडिओ आहे.
चिमुरडीचा व्हिडिओ आला समोर
रशिया-युक्रेन युद्धादरम्यान अनेक व्हिडिओ व्हायरल झालेत. त्यातले काही व्हिडिओ सत्य तर काही फेक म्हणजेच दुसऱ्याच एखाद्या घटनेतले असून सध्या व्हायरल होत असलेले आहेत. आताही एक व्हिडिओ समोर आलाय. एक चिमुरडी आणि बंदुकधारी सैनिक या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतायत. ती चिमुरडी अक्षरश: या सैनिकाच्या अंगावर धावून जात आहे. अत्यंत आक्रमक आणि चिडलेल्या त्या मुलीसमोर तो सैनिक काहीही बोलत नाही. ती त्याला निघून जाण्याबाबत बोलत असावी. त्यांच्या हावभावावरून तरी असेच दिसते. ती त्याला मारण्याचेही इशारे करीत आहे. शेवटी तो सैनिक तिथून निघून जातो.
युद्ध संपुष्टात येण्याची व्यक्त होतेय अपेक्षा
निघून जात असतानाही ती मुलगी त्याचा पाठलाग करते आणि मारण्याचे हातवारे करते. यावरून ती खूप चिडलेली असावी, असे दिसते. हा व्हिडिओ कुठला आणि कधीचा आहे, हे समजू शकलेले नाही. मात्र रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मुस्तक गवंडी यांच्या फेसबुकवर हा व्हिडिओ टॅग करण्यात आलाय. एकूणच या युद्धामधून लहान मुलेही सुटलेली नाहीत. अनेक व्हिडिओ मन हेलावून टाकणारे आहेत. त्यामुळे हे युद्ध संपुष्टात यावे आणि दोन्ही देशांदरम्यान शांती प्रस्थापित व्हावी, अशी अपेक्षा जगभरातून व्यक्त होतेय.