AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जपानमध्ये ७.५ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा

जपानमधील हवामान संस्थेने इशिकावा, निगाता आणि तोयामा प्रांताच्या किनारपट्टी भागात सुनामीचा इशारा जारी केला आहे. हवामान संस्थेच्या म्हणण्यानुसार, भूकंपामुळे इशिकावा प्रांतातील नोटोपर्यंत ५ मीटर उंचीच्या लाटा उसळत आहेत. लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

जपानमध्ये ७.५ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा
Tsunami
| Updated on: Jan 01, 2024 | 3:36 PM
Share

टोकियो : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी वाईट बातमी समोर आली आहे. जपानमध्ये ७.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला आहे. त्यानंतर आता त्सूनामीचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रात सुनामीच्या लाटा उसळत आहेत. त्सुनामीच्या लाटा जपानच्या किनारपट्टीवर आदळल्या आहेत. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी उत्तर मध्य जपानमध्ये ७.५ रिश्टर स्केलचा भूकंप नोंदवला गेला. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, जपानच्या हवामान संस्थेने इशिकावा, निगाता आणि तोयामा प्रांताच्या किनारी भागात त्सुनामीचा इशारा दिला आहे. हवामान संस्थेच्या म्हणण्यानुसार, भूकंपामुळे इशिकावा प्रांतातील नोटोपर्यंत ५ मीटर उंचीच्या लाटा उसळत आहेत.

सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना

जपानमध्ये त्सुनामीच्या लाटा उसळण्याची भीती असताना  किनारपट्टी भागात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लोकांमध्ये घबराट पसरली आहे. त्सुनामीग्रस्त भागात बचाव पथकही पोहोचले आहे.

जपानच्या किनारपट्टीवर भूकंपाच्या केंद्रापासून 300 किलोमीटर आत धोकादायक त्सुनामीच्या लाटा येण्याची शक्यता आहे. जेएमएने सांगितले की, जपानच्या मुख्य बेटाच्या होन्शूच्या जपानच्या समुद्रावरील नोटो प्रदेशात स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 4:06 वाजता 5.7 तीव्रतेचा भूकंप जाणवला. यानंतर दुपारी 4:10 वाजता 7.6 रिश्टर स्केलचा भूकंप, 4:18 वाजता 6.1 रिश्टर स्केलचा भूकंप, 4:23 वाजता 4.5 रिश्टर स्केलचा भूकंप, 4:29 वाजता 4.6 रिश्टर स्केलचा भूकंप आणि दुपारी 4:29 वाजता भूकंपाचा धक्का बसला. त्यानंतर लगेचच ६.२ रिश्टर स्केलचा दुसरा भूकंप झाल्याचे यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने सांगितले.

२०११ मध्ये याआधी आली होती त्सुनामी

इमारती मजबूत भूकंप सहन करू शकतील याची खात्री करण्याच्या उद्देशाने जपानमध्ये कठोर बांधकाम नियम आहेत. मार्च 2011 मध्ये ईशान्य जपानमध्ये आलेल्या भूकंपानंतर जेव्हा त्सुनामी आली तेव्हा सुमारे 18,500 लोकांचा मृत्यू झाला होता. अनेक जण बेपत्ता झाले. 2011 च्या त्सुनामीने फुकुशिमा अणु प्रकल्पातील तीन अणुभट्ट्याही उद्ध्वस्त केल्या होत्या. ही जपानची युद्धानंतरची सर्वात वाईट आपत्ती होती आणि चेरनोबिल नंतरची सर्वात गंभीर आण्विक दुर्घटना होती. त्याच वेळी, मार्च 2022 मध्ये, फुकुशिमाच्या किनारपट्टीवर 7.4 तीव्रतेच्या भूकंपाने पूर्वेकडील जपानच्या मोठ्या भागांना हादरवून सोडले आणि तीन लोकांचा मृत्यू झाला.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.