Exclusive: पाकिस्तानची पोलखोल, TV9 च्या मुलाखतीत अफगाणिस्तानमधील तालिबान्याचे धक्कादायक खुलासे

टीव्ही9 च्या Exclusive मुलाखतीत पाकिस्तानच्या या दाव्याची पोलखोल झालीय. टीव्ही 9 ने अफगाणिस्तानमध्ये जाऊन तेथील सिक्रेट जेलमध्ये तालिबान्यांची मुलाखत घेतली. यात त्यांनी धक्कादायक खुलासे करत पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणलाय.

Exclusive:  पाकिस्तानची पोलखोल, TV9 च्या मुलाखतीत अफगाणिस्तानमधील तालिबान्याचे धक्कादायक खुलासे
Follow us
| Updated on: Aug 03, 2021 | 8:26 AM

काबूल : अफगाणिस्तानमध्ये सैन्य आणि तालिबान यांच्या संघर्षानं जगाचं लक्ष्य वेधलंय. त्यात अफगाणिस्तानकडून वारंवार पाकिस्तानकडून तालिबान्यांना मदतीचे आरोप झाले, मात्र पाकिस्तानने ते फेटाळले. आता टीव्ही9 च्या Exclusive मुलाखतीत पाकिस्तानच्या या दाव्याची पोलखोल झालीय. टीव्ही 9 ने अफगाणिस्तानमध्ये जाऊन तेथील सिक्रेट जेलमध्ये तालिबान्यांची मुलाखत घेतली. यात त्यांनी धक्कादायक खुलासे करत पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणलाय. या मुलाखत देणाऱ्या तालिबान्याचं नाव शेर आगा असं आहे. त्याने तालिबान्यांचं ट्रेनिंग पाकिस्तानमध्येच होत असल्याचं स्पष्ट केलंय. तसेच पाकिस्तान मोठ्या प्रमाणात तालिबान्यांना युद्धासाठी तयार करत असल्याचं म्हटलंय. विशेष म्हणजे तालिबान्यांना मिळणारी शस्त्रास्त्र देखील पाकिस्तानातून येत असल्याचं दिसंतय.

टीव्ही 9 चे रिपोर्टर सुमित चौधरी आणि कॅमेरामन विरेंद्र मौर्या हे आपला जीव धोक्यात टाकून अफगाणिस्तानमधील सैन्य आणि तालिबानच्या युद्धावर रिपोर्टिंग केलंय. यात त्यांनी अफगाण सैन्याने अटक केलेल्या तालिबान्यांची मुलाखत घेतली. त्यात अफगाणिस्तानमधील युद्धामागे पाकिस्तानचाच प्लॅन असल्याचा दावा करण्यात आलाय. तालिबान्यांना पाकिस्तानी सैन्याकडून प्रशिक्षण मिळत असल्याचंही या मुलाखतीत सांगण्यात आलंय. प्रशिक्षणानंतर तालिबान्यांना चोर मार्गाने अफगाणिस्तानमध्ये आणलं जातं.

तालिबान्यांना लोगारवर नियंत्रण का हवं?

मागील काही दिवसांपासून तालिबानी अफगाणिस्तानमधील लोगार प्रांतावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठे प्रयत्न करत आहेत. मात्र, अफगाणिस्तानचं सैन्य त्यांना विरोध करत आहे. त्यामुळे या भागात तुंबळ युद्ध सुरू आहे. लोगार अफगाणमधील त्या 34 प्रांतांपैकी एक आहे जेथे सध्या तालिबान आणि सैन्यात युद्ध सुरू आहे. मात्र, तालिबान लोगार आपल्या ताब्यात घेण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे. कारण लोगारचं अंतर अफगाणिस्तानची राजधानी काबूलपासून केवळ 90 किलोमीटर आहे. त्यामुळेच अफगाणिस्तानवरील नियंत्रणासाठी तालिबान लोगारवर ताबा मिळवण्याचे प्रयत्न करत आहे.

काबुलला जाण्याचे महामार्ग देखील लोगारमधून जातात. त्यामुळे लोगारवर तालिबान्यांचा ताबा आल्यास काबुलचा उर्वरित अफगाणिस्तानपासून संपर्क तुटेल. असं असल्यानंच या युद्धात लोगारचं महत्त्व वाढलंय. सध्या तालिबान्यांनी लोगारमध्ये आपले अनेक तळ तयार केलेत. तेथून अफगाणी सैन्यावर सातत्याने हल्ले होत आहेत. अफगाण सैन्य देखील तालिबानला सडेतोड उत्तर देत आहे. सैन्याने आपल्या कारवाईत अनेक तालिबानी तळांवर हल्ले चढवले. यात काही जण मारले गेलेत, तर अनेकजण पकडले गेलेत.

“युद्ध बंद करा आणि शांततेत जीवन जगा”

मुलाखत देणारा तालिबानी शेर आगाने अफगाणमधील युद्ध संपावं अशी इच्छा व्यक्त केलीय. तसेच एकमेकांशी भांडण थांबवून आरामात जीवन जगायला हवं असं आवाहनही केलंय. यावर मग तुम्ही बंदुक का उचलली असा प्रश्न केला असता त्याने तेव्हा मला काहीही समजलं नाही असं उत्तर दिलं.

संबंधित व्हिडीओ पाहा :

हेही वाचा :

प्रसिद्ध कॉमेडियनच्या मृत्यूचा Video व्हायरल, तालिबानने हत्येची जबाबदारी घेतली, कारण काय?

तालिबानच्या मुसक्या आवळण्यासाठी तजाकिस्तानसह रशियाचा अॅक्शन प्लॅन

अफगानिस्तानच्या पहिल्या उपराष्ट्रपतींकडून खास फोटो शेअर, पाकिस्तानची आगपाखड

TV9 Exclusive interview of Talibani terrorist in Afghanistan expose Pakistan

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.