Ukraine Russia Crisis : यूक्रेन रशिया वादासंदर्भात मोठी अपडेट, राष्ट्रपती जेलेंस्कीचा मॉस्कोला बैठकीचा प्रस्ताव,पश्चिमेच्या देशांनाही खडे बोल

यूक्रेन रशिया (Ukraine-Russia Conflict) वादादरम्यान यूक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर जेलेंस्की (Volodymyr Zelenskyy) यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Putin) यांना बैठक घेऊन चर्चा करुन वाद सोडवण्याचा प्रस्ताव दिला आहे.

Ukraine Russia Crisis : यूक्रेन रशिया वादासंदर्भात मोठी अपडेट, राष्ट्रपती जेलेंस्कीचा मॉस्कोला बैठकीचा प्रस्ताव,पश्चिमेच्या देशांनाही खडे बोल
Russia Ukraine conflict
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 11:47 AM

नवी दिल्ली : यूक्रेन रशिया (Ukraine-Russia Conflict) वादादरम्यान यूक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर जेलेंस्की (Volodymyr Zelenskyy) यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Putin) यांना बैठक घेऊन चर्चा करुन वाद सोडवण्याचा प्रस्ताव दिला आहे. तीन दिवसांपासून सुरु असलेल्या म्यूनिच सुरक्षा संमेलनमध्ये यूक्रेनच्या राष्ट्रपती वोलोदिमीर जेलेंस्की यांनी पश्चिमी देशांच्या विरोधातील धोरण रशियानं सोडून द्यावं, असं म्हटलंय. तर, यूक्रेननं रशियाकडून होणाऱ्या आक्रमणावरुन चिंता व्यक्त केलीय. वोलोदिमीर जेलेंस्की म्हणाले की, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना काय पाहिजे हे माहिती नाही. मी त्यांना चर्चेचा प्रस्ताव देत आहे. रशिया चर्चेचा पर्याय निवडू शकतं. या संकटावर शांततापूर्ण समाधान काढण्यासाठी यूक्रेन केवळ वाटाघाटीच्या मार्गानं पुढं जाऊ शकतं, असं म्हटलंय. रशिया आणि यूक्रेनच्या वादामुळ जगावर तिसऱ्या महायुद्धाची शक्यता निर्माण झालीय.

रशियाचा म्यूनिच संमेलनावर बहिष्कार

म्यूनिच सुरक्षा संमेलनामध्ये युक्रेन रशिया वादावर चर्चा घेण्यात आली होती. यूक्रेनमधील संकटाच्या पार्श्वभूमीवर पश्चिमेकडील देशांमध्ये चर्चा आयोजित करण्यात आली होती. मात्र, रशियानं या संमलेनलावर बहिष्कार टाकला आहे. रशियाचा एकही प्रतिनिधी यामध्ये सहभागी झाला नव्हता. यूक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी रशियानं आमच्या देशावर बॉम्बहल्ला केल्यास प्रतिबंधांचा उपयोग नाही, असं म्हटलंय. रशिया आमच्या देशावर अणूबॉम्बचा हल्ला करु शकतो, अशी माहिती वोलोदिमीर जेलेंस्की यांनी दिली. आमच्याकडे कोणतंही शस्त्र नाही. सुरक्षा नाही आमच्याकडे फक्त सुरक्षा आणि शांतता कायम राहावी, अशी मागणी करण्याचा अधिकार असावा, असं जेलेंस्की म्हणाले.

आम्हाला शांतता हवीय

यूक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी पश्चिमेकडील देशांनी आम्हाला मदत करायची असेल तर केवळ रशियाकडून होणाऱ्या हल्ल्याबाबतच्या तारखांवर चर्चा करण्याची गरज नाही. आम्ही आमच्या देशाच्या जमीनीचं रक्षण करु, असं जेलेंस्की म्हणाले. यूक्रेनला केवळ शांतता पाहिजे, असं ते म्हणाले.

रशिया आणि यूक्रेन यांच्यात कोणत्याही क्षणी युद्ध होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यूक्रेन आणि रशिया, यूक्रेनमधील रशिया समर्थक फुटीरतावादी भागात दोन्ही बाजूकडून तणाव वाढवला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यूक्रेन आणि रशिया यांच्यातील संभाव्य युद्धाच्या पार्श्वभूमीव जर्मनी, ऑस्ट्रिया देशान आपल्या नागरिकांना यूक्रेन सोडण्यास सांगितलं आहे.

इतर बातम्या:

Video : रुग्णवाहिकेचा सायरन वाजताच शिवप्रेमी दक्ष, शिवरायांच्या जयंतीचा जल्लोष करणाऱ्या तरणाईकडून रस्ता मोकळा, लातूरमध्ये काय घडलं?

औरंगाबादच्या पाणीपुरवठा योजनेच्या गतीवर प्रश्नचिन्ह, भाजप रस्त्यावर उतरणार, डॉ. भागवत कराड यांचा इशारा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.