AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sergio Gor On Kashmir : अमेरिकन राजदूत सर्जियो गोर यांच्या काश्मीर संदर्भातील वक्तव्यानंतर पाकिस्तानचा नुसता थयथयाट, त्यांनी काय म्हटलं?

Sergio Gor On Kashmir : अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जियो गोर यांनी नुकतच श्रीनगरमध्ये जम्मू-काश्मीर संदर्भात एक वक्तव्य केलं. त्यांच्या या स्टेटमेंटने पाकिस्तानला चांगल्याच मिर्च्या झोंबल्या आहेत. पाकिस्तानचा नुसता थयथयाट सुरु आहे. पाकिस्तानने अमेरिकी अधिकाऱ्याला तलब केलं.

Sergio Gor On Kashmir : अमेरिकन राजदूत सर्जियो गोर यांच्या काश्मीर संदर्भातील वक्तव्यानंतर पाकिस्तानचा नुसता थयथयाट, त्यांनी काय म्हटलं?
US Ambassador Sergio Gor
| Updated on: Aug 20, 2026 | 7:33 AM
Share

अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जियो गोर यांनी जम्मू-काश्मीर संदर्भात एक मोठं वक्तव्य केलं. जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असल्याचं गोर म्हणाले. अमेरिकन राजदूत हे मोठं पद आहे. अशा व्यक्तीने जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे, असं म्हणणं हे पाकिस्तानसाठी झटका आहे. सर्जियो गोर यांनी हे वक्तव्य केल्यापासून पाकिस्तानने नुसता थयथयाट सुरु केला आहे. पाकिस्तानचा जळफळाट होत आहे. सर्जियो गोर यांनी श्रीनगरमध्ये हे वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर पाकिस्तानने त्यांच्या देशातील अमेरिकन राजनैतिक अधिकाऱ्याला तलब केलं. पाकिस्तानने या वक्तव्याला बेजबाबदार ठरवलं आहे. जम्मू-काश्मीर हे वादग्रस्त क्षेत्र आहे हा आपला जुना राग पाकिस्तानने आळवला आहे. त्यावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावाचं पालन करुनच तोडगा निघेल असं पाकिस्तानचं म्हणणं आहे.

भारतातील अमेरिकन राजदूत सर्जियो गोर जम्मू-काश्मीर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी ते जम्मू-काश्मीर भारताचा भाग आहे असं म्हणाले. इतकचं नाही, त्यांनी जम्मू-काश्मीरच्या सौंदर्याचं कौतुक केलं. अमेरिकेची जम्मू-काश्मीरशी संबंधित Travel Advisory ची समीक्षा आणि ती downgrade करण्याच्या मुद्यावर सुद्धा ते बोलले. हा खूप सुंदर भूप्रदेश आहे. अमेरिकी नागरिकांना इथे येऊन या भागाचं सौंदर्य पहायला आवडेल असं ते म्हणाले.

पाकिस्तानने काय म्हटलं?

काल 19 ऑगस्टला पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने एक वक्तव्य केलं. पाकिस्तानने अमेरिकेच्या Charge dAffaires ला तलब केलं आणि अमेरिकी राजदूत सर्जियो गोर यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप नोंदवला. पाकिस्तानने अमेरिकी राजदूताच्या टिप्पणीला तथ्यात्मक दृष्टया चुकीचं ठरवत जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असल्याचं अमान्य केलं.

अमेरिकेला काय म्हटलं?

पाकिस्तानने त्यांच्या स्टेटमेंटमध्ये अमेरिकेला त्यांच्या जुन्या काश्मीर धोरणाची आठवण करुन दिली. पाकिस्तान गोर यांच्या वक्तव्याने अस्वस्थ झाला आहे. “जम्मू-काश्मीर संदर्भात अमेरिकन राजदूताची टिप्पणी ही अमेरिकेच्या दीर्घकाळापासून धोरणाशी सुसंगत नाहीय. भविष्यात जम्मू-काश्मीर संदर्भात अमेरिकेची वक्तव्य ही पाकिस्तानच्या वादग्रस्त भूमिकेशी सुसंगतच असली पाहिजेत” असं पाकिस्तानने अमेरिकेला सांगितलं.

ट्रम्प यांनी दिलेला मध्यस्थतेचा प्रस्ताव

मध्यंतरी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान दरम्यान मध्यस्थतेचा प्रस्ताव दिला होता. पाकिस्तानने त्याचा सुद्धा कालच्या स्टेटमेंटमध्ये उल्लेख करत कौतुक केलं. पाकिस्तानने एकीकडे अमेरिकन राजदूतच्या वक्तव्यावर अमेरिकन राजनैतिक अधिकाऱ्याला तलब केलं. दुसरीकडे ट्रम्प यांच्या मध्यस्थतेच्या प्रस्तावाची अमेरिकेला आठवण करुन दिली.

भारताची भूमिका काय?

जम्मू-काश्मीर हे भारताचं अविभाज्य अंग आहे आणि तो आमचा अंतर्गत विषय आहे ही भारताची सुरुवातीपासून भूमिका राहिली आहे. काश्मीर मुद्याचं आंतरराष्ट्रीयकरण करण्याची पाकिस्तानची जुनी रणनिती आहे. भारतातील अमेरिकन राजदूताच्या या वक्तव्याने पाकिस्तानला चांगल्याच मिर्च्या झोंबल्या आहेत. त्यामुळे इस्लामाबादमध्ये कूटनितीक घडामोडी वाढल्या आहेत.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?