डेमॉक्रेटिक पक्षाच्या उपराष्ट्राध्यक्षापदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी दणदणीत विजय मिळवत इतिहास रचला आहे.
भारतीयवंशाच्या कमला हॅरिस यांनी एकाचवेळी अनेक विक्रम केले आहेत. त्या कमला हॅरिस या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्षा, पहिल्या कृष्णवर्णीय अमेरिकन आणि पहिल्या आशियायी अमेरिकन उपराष्ट्राध्यक्षा ठरल्या आहेत.
20 ऑक्टोबर 1964 रोजी कॅलिफोर्नियाच्या ऑकलंडमध्ये कमला हॅरिस यांचा जन्म झाला. त्यांचे वडील डोनाल्ड हॅरिस हे आफ्रिकेचे असून आई श्यामला गोपालन भारतीय आहेत.
कमला यांचं शिक्षण ऑकलंडमध्येच झालं. त्यांनी हॉवर्ड विद्यापीठातून पदवी घेतलेली आहे.
कॅलिफोर्निया विद्यापीठातून कायद्याचं शिक्षण घेतलं. त्यांनी सॅनफ्रान्सिस्कोमध्ये जिल्हा अॅटर्नी म्हणून काम पाहिलं आहे. 2003मध्ये त्या सॅनफ्रान्सिस्कोमध्ये जिल्हा वकील बनल्या होत्या.
2017मध्ये कॅलिफोर्नियामधून संयुक्त राज्य सीनेटर म्हणून शपथ घेतली होती. या पदावर जाणाऱ्या त्या दुसऱ्या कृष्णवर्णीय महिला होत्या.
सध्या त्या सिनेटच्या सदस्य तर आहेच, सोबत डेमॉक्रॅटिक पक्षाकडून त्या उपराष्ट्राध्यक्षा म्हणून निवडूनही आल्या आहेत.
2016 मध्ये कमला हॅरिस पहिल्यांदा डेमॉक्रेटिक पक्षाच्या सिनेट सदस्य झाल्या.
सिनेटमध्ये त्या कॅलिफोर्नियाचं प्रतिनिधित्व करतात. याआधी त्या 2011 ते 2017 पर्यंत स्टेट अॅटोर्नी जनरल देखील होत्या.