AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठा हाहाकार, जगाला ज्याची भीती तेच घडले, अमेरिकेचा इराणवर हल्ला, भारतावर थेट परिणाम..

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढला आहे. अमेरिकेने मोठा हल्ला केला. तब्बल चार कच्च्या तेलाच्या टँकर्सना पूर्णपणे नष्ट केले. तणाव वाढला आहे. आता इराण याला नक्की कसे उत्तर देते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

मोठा हाहाकार, जगाला ज्याची भीती तेच घडले, अमेरिकेचा इराणवर हल्ला, भारतावर थेट परिणाम..
Iran US
| Updated on: Sep 09, 2026 | 7:23 AM
Share

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव प्रचंड वाढला आहे. अमेरिकेने पुन्हा इराणवर हल्ले सुरू केली आहेत. ज्यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने  दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने दोनदा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या साहाय्याने अमेरिकेच्या नौदलाच्या युद्धनौकेला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केल्यानंतर अमेरिका चांगलीच भडकली आहे. अमेरिकन सैन्याने इराणचे एक नाही तर तब्बल पाच कच्च्या तेलाचे टँकर्स नष्ट केले. आता या टँकर्सवर हल्ला करतानाचे व्हिडीओ पुढे आली आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव वाढल्याने जग संकटात आहे. जागतिक बाजारात तणाव वाढण्याची शक्यता आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून मोठे युद्ध पेटले आहे. मध्यंतरी काही दिवस युद्ध शांत होते, आता पुन्हा पेटले आहे.

अमेरिकन लष्कराच्या माहितीनुसार, अमेरिकेच्या एका युद्धनौकेने इराणचे क्षेपणास्त्र हल्ल्याचे दोन्ही प्रयत्न हाणून पाडले. त्यानंतर त्यांनी आपली गस्त सुरू केली. सेंटकॉमने जाहीर केले की, इराणने केलेल्या अयशस्वी हल्ल्यांना प्रत्युत्तर आम्ही हे हल्ले केले. अमेरिकन लष्कराने ओमानच्या आखातात आयआरजीसीशी संबंधित चार कच्च्या तेलाच्या टँकर्सना पूर्णपणे नष्ट केले. या हल्ल्याचा भारतावरही परिणाम होणार आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती भडकल्याने थेट भारतातही पेट्रोल डिझेलच्या किमती वाढू शकतात.

एम/टी काविझ (M/T Kaviz), एम/टी चारमिनार (M/T Charminar), एम/टी होरायझन १ (M/T Horizon 1) आणि एम/टी रिस्को (M/T Riesco) या इराणी टँकर्सला अमेरिकेने पूर्णपणे नष्ट केले. अमेरिकेने हे हल्ले करण्यापूर्वी कर्मचाऱ्यांना जहाज सोडून जाण्याच्या सूचना दिल्या होत्या. ज्यामुळे कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही. अमेरिकेने जहाजांचा इंजन रूमवर हल्ले केले.

सेंटकॉमच्या माहितीनुसार, अमेरिकी सैन्याने यापूर्वी 5 सप्टेंबर रोजी इराणचे तीन कच्चे तेलवाहू जहाज नष्ट केले होते. अमेरिकी कमांडने सांगितले की, त्या कारवाईपूर्वी आयआरजीसीने एका अमेरिकी विमानवाहू जहाजावर आणि एका क्षेपणास्त्रवाहू जहाजावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. दोन्ही देशातील तणाव चांगलाच वाढला आहे. ज्यामुळे जागतिक बाजारात पुन्हा कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.

Follow Us
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन