AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इस्रायल-हमास युद्ध सुरु असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन इस्रायलमध्ये दाखल

US President in Israel : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे इस्रायलमध्ये दाखल झाले आहेत. या दौऱ्यातून त्यांनी अरब देशांना थेट इशारा दिला आहे. आपण इस्रायलच्या मागे उभे असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. याचे पडसाद आता अरब देशांमध्ये देखील पाहायला मिळत आहेत.

इस्रायल-हमास युद्ध सुरु असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन इस्रायलमध्ये दाखल
| Updated on: Oct 18, 2023 | 3:06 PM
Share

US President in Israel :  इस्रायल-हमास युद्ध सुरु असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन इस्रायलला पोहोचले आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी तेल अवीव विमानतळावर जो बायडेन यांचे स्वागत केले. त्यामुळे जगाच्या राजकारणात पुन्हा एकदा नव्या चर्चांना उधाण आले आहे. बायडेन यांचे स्वागत करताना नेतान्याहू यांनी त्यांची गळाभेट ही घेतली. बायडेन यांनी नेतन्याहू यांना मिठी मारल आपण त्यांच्या पाठिशी उभे आहोत असा मेसेज दिला आहे. बायडेन हे हमास हल्ल्यातील पीडितांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत.

पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने सर्व ओलीस ठेवलेल्या नागरिकांना सोडण्यास तयार असल्याचे म्हटले आहे, मात्र इस्रायलने गाझावर सुरु असलेले हल्ले त्वरीत थांबवाने अशी अट ठेवली आहे. गाझा येथील रूग्णालयावर झालेल्या हल्ल्यात 500 जणांचा मृत्यू झाल्यामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. इस्रायलने हॉस्पिटलवर हवाई हल्ला केल्याचं हमासने म्हटले आहे.

जॉर्डनने प्रादेशिक शिखर परिषद रद्द केली

जो बायडेन हे आपला भक्कम पाठिंबा असल्यांचं दर्शवण्यासाठी इस्रायलला पोहोचले आहेत. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी चर्चा करतील. जॉर्डनने गाझा रूग्णालयावरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेली प्रादेशिक शिखर परिषद रद्द केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय, पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास आणि इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांची भेट घेणार होते. बायडेन आता इस्रायलहूनच परतणार आहेत.

हमासकडून ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला

हमासने ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर पहाटेच्या वेळी पाच हजार रॉकेटसने हल्ला केला होता. त्यानंतर मग इस्रायलकडून युद्धाची घोषणा करण्यात आली होती. इस्रायला आता हमासच्या दहशतवाद्यांना ठार करण्यासाठी जमीन, हवाई आणि जलमार्गाने त्यांच्यावर हल्ले करत आहे. हमासच्या ठिकाणांना इस्रायलकडून लक्ष्य केले जात आहे.

हमासचे तीन कमांडर इस्रायलने ठार केले आहेत. हमासकडून आता ओलीस ठेवलेल्या सर्व इस्रायली नागरिकांची सुटका करायची आहे, परंतु यासाठी इस्रायलला गाझावरील बॉम्बफेक थांबवावी लागेल. असे त्यांनी म्हटले आहे. इस्रायलने गाझा पट्टीवरील लष्करी हल्ला थांबवला तर तासाभरात सर्व ओलीस सोडू शकतो, असे हमासचे म्हणणे आहे.

हमासच्या दहशतवाद्यांनी नागरिक आणि सैनिकांसह सुमारे 200-250 लोकांना ओलीस ठेवल्याची माहिती समोर आली आहे. ओलिसांना गाझामध्ये लपवून ठेवण्यात आले आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.