अशी हौस तुम्ही कराला का? कारच्या एका VIP नंबरसाठी मोजले तब्बल 122 कोटी रुपये

एखादा व्यक्ती व्हिआयपी क्रमांकासाठी किती खर्च करु शकेल. दुबईतील त्या व्यक्तीने लाखो नाही तर कोट्यवधी रुपये खर्च केले आहे. ते फक्त मानसिक समाधानासाठी. त्या व्यक्तीने 122 कोटी रुपयांमध्ये p7 हा व्हिआयपी क्रमांक घेतला आहे.

अशी हौस तुम्ही कराला का? कारच्या एका VIP नंबरसाठी मोजले तब्बल 122 कोटी रुपये
vip number plate Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Apr 11, 2023 | 4:26 PM

दुबई : म्हणतात ना, हौसेला मोल नसते, त्याची प्रचिती अनेकांना येते. परंतु काही जणांची प्रत्येक गोष्टी वेगळी असते. आपल्याकडे काहीतरी युनिक असावे, असे त्यांना वाटत असते. मग त्यासाठी लाखो नाही तर कोट्यवधी रुपये खर्च करण्यास ते तयार असतात. फक्त मानसिक समाधानासाठी ही रक्कम खर्च होत असते. एका अवलीया व्यक्तीने कारच्या एका VIP नंबरसाठी पाच, पन्सास कोटी नव्हे तर तब्बल 122 कोटी रुपये मोजले आहे. विशेष म्हणजे 122 कोटी रुपयांमध्ये नंबर घेणाऱ्या व्यक्तीने आपली ओळख गुप्त ठेवली आहे.

लिलावात मोजली रक्कम

कोणाला आपल्या वाहनावर आपल्या पसंतीचा क्रमांक हवा असतो. या क्रमांकासाठी काहीही करण्यास काही जणांची तयारी असते. दुबईमध्ये व्हिआयपी क्रमांकाचा लिलाव झाला. यामध्ये पी 7 हा क्रमांकासाठी बोली सुरु झाली. लिलावाची सुरुवात १.५ कोटी दिरहम (दुबई चलन)ने सुरु झाली. परंतु एका व्यक्तीने या क्रमांकासाठी ५५ मिलियन दिरहम म्हणजे १२२ कोटी रुपये मोजले. लिलावात पी 7 क्रमांक १२२ कोटी रुपयांमध्ये घेणाऱ्या व्यक्तीने आपले नाव गुप्त ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. जगातील हा सर्वात महाग क्रमांक आहे.

हे सुद्धा वाचा

काय करणार या निधीचा

लिलावात मिळालेली रक्कमेचा काय करणार? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. या पैशांमधून रमजानमध्ये जनतेला जेवण देण्यात येणार आहे. हा लिलाव दुबई सडक व परिवहन प्राधिकरण अन् इतर कंपन्यांनी मिळून आयोजित केला होता. उपराष्ट्रपती शेख मोहम्मद बिन रशिद यांनी या लिलावाचा प्रस्ताव ठेवला होता.

पुण्यात व्हिआयपी क्रमांकाची क्रेझ

पुणे शहरातील नागरिकांचा वाहनांच्या आकर्षक क्रमांकाकडे कल वाढत आहे. यासाठी लाखो रुपयांचा खर्च करीत आहेत. पसंतीच्या आकर्षक क्रमांकातून मार्चअखेर संपलेल्या आर्थिक वर्षात पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयास ३६ कोटी रुपयांहून महसूल मिळवला आहे. हा महसूल मागील वर्षाच्या तुलनेत ६० टक्क्यांहून अधिक आहे.

हे ही वाचा

पुणेकरांची हौसच वेगळी, ३६ कोटी खर्च केले फक्त पसंतीसाठी

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.