जगातल्या सर्वात मोठ्या हुकूमशहाच्या टॉयलेट सीटचा होणार लिलाव, किंमत वाचून हैराण व्हाल

आजकाल हिटलरची टॉयलेट सीट चर्चेत आहे. हिटलरच्या मृत्यूच्या इतक्या वर्षानंतर आता या शौचालयाच्या जागेचा लिलाव होणार आहे.

जगातल्या सर्वात मोठ्या हुकूमशहाच्या टॉयलेट सीटचा होणार लिलाव, किंमत वाचून हैराण व्हाल
Follow us
| Updated on: Feb 02, 2021 | 2:25 PM

वॉश्गिंटन : जगातला सगळ्यात मोठे जर्मन हुकूमशहा अ‍ॅडॉल्फ हिटलर हे सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. हिटलर शौचालयासाठी जे सीट वापरायचा ते सीट आता विकण्यात येणार आहे. फक्त विकणारच नाही तर याची किंमत वाचून तुम्हीही हैराण व्हाल. आजकाल हिटलरची टॉयलेट सीट चर्चेत आहे. हिटलरच्या मृत्यूच्या इतक्या वर्षानंतर आता या शौचालयाच्या जागेचा लिलाव होणार आहे. ही टॉयलेट सीट खरेदी करण्यासाठी अनेक लोक बोली लावत आहेत. पण ही टॉयलेट सीट कोठून आली आणि त्यासाठी किती खर्च आहे जाणून घेऊया… (viral news adolf hitler toilet seat auctioned with winning bid of 15 lakhs)

हिटलरच्या या टॉयलेट सीटची बोली सुमारे15 हजार स्टर्लिंग पाउंड (म्हणजेच तब्बल 15 लाख रुपये) अपेक्षित आहे. या टॉयलेट सीटला अमेरिकन सैनिकाने बेरघोफमधील नाझी हुकूमशहाच्या खासगी बाथरूममधून चोरलं होतं. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने हिटलरच्या मालमत्तेमधील जे काही हवं ते घेऊन जाऊ शकता अशी घोषणा करण्यात आल्यानंतर एका सैनिकाने ही टॉयलेट सीट घेतली. यानंतर सार्जंटने अभिमानाने हिटलरची खास टॉयलेट सीट अमेरिकेच्या न्यू जर्सी इथे त्याच्या घरी आणली आणि तळघरात ठेवली.

खरंतर, जुन्या वस्तूंचा संग्रह करण्याची अनेकांना आवड असते. सध्या सोशल मीडियावर अनेक जुन्या आणि मौलव्यान वस्तूंची विक्री वाढली आहे. त्यामुळे अशा जुन्या वस्तूंनाही मागणी आहे.

इतक्या वर्ष या टॉयलेट सीटला सार्जंट यांनी आपल्या घरातच ठेवलं होतं. पण आता त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी ही टॉयलेट सीट विकून पैसे कमविण्याचा निर्णय घेतला आहे. या सीटला चीसापिक सिटीमध्ये होणाऱ्या लिलावामध्ये सादर करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लिलावामध्ये हे टॉयलेट सीट सगळ्यात महाग उत्पादन असल्याचं सांगण्यात येत आहे. या टॉयलेट सीटवर 10 ते 15 हजार स्टर्लिंग पाउंडची किंमत ठेवण्यात आली आहे. (viral news adolf hitler toilet seat auctioned with winning bid of 15 lakhs)

संबंधित बातम्या – 

दुसऱ्या महिलेचा फोटो पाहत होता पती, पत्नीने थेट केला चाकून हल्ला; नंतर समोर आलं सत्य

नवऱ्याच्या एका स्वप्नामुळे महिला रातोरात झाली करोडपती, 340 कोटींचा लागला बंपर जॅकपॉट

चॉकलेट खा आणि दिवसाला 27 हजार रुपये कमवा

मगरीशी बोलत पाठीवर फिरवत होता हात, नंतर असं काही झालं की VIDEO पाहून तुम्ही थक्क व्हाल

(viral news adolf hitler toilet seat auctioned with winning bid of 15 lakhs)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.