बापरे! 50 फूल लांब अॅनाकोंडाने केली नदी पार, वाचा VIRAL व्हीडिओ मागचं सत्य
एका 50 फूट लांब अॅनाकोंडाने (50-Foot Anaconda) नदी पार केल्याचं दिसत आहे.
नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियावर अनेक व्हीडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. असाच एक ब्राझिलमधला व्हीडिओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये एका 50 फूट लांब अॅनाकोंडाने (50-Foot Anaconda) नदी पार केल्याचं दिसत आहे. पण याचा व्हीडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी हा खोटा असल्याचं म्हटलं आहे. कारण दोन वर्षांआधीसुद्धा हाच व्हीडिओ व्हायरल झाला होता. आता पुन्हा काही नेटकऱ्यांनी याला ट्विटरवर (Twitter) शेअर केला आहे. (viral video of anaconda 50 foot anaconda crossing river in brazil)
मिळालेल्या माहितीनुसार, ही ब्राझिलमधली झिंगू नदी असल्याचं सांगण्यात येत आहे. यामध्ये अॅनाकोंडा नदी पार करत असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. आज सकाळी एका लोकप्रिय ट्विटर अकाऊंटवर या व्हीडिओला पुन्हा पोस्ट करण्यात आलं आहे. आणि कॅप्शनमध्ये ‘ब्राझीलच्या झिंगू नदीत 50 फूटांपेक्षा मोठा अॅनाकोंडा दिसला’ असं लिहिण्यात आलं आहे.
An anaconda measuring more than 50 feet found in the Xingu River, Brazil pic.twitter.com/FGDvyO76sn
— The Dark Side Of Nature (@Darksidevid) October 30, 2020
मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर या व्हीडिओला तब्बल 7 लाखांहून अधिक वेळा पाहिलं गेलं आहे. या व्हीडिओ क्लिपमध्ये एक भला मोठा साप एका ‘नदी’ च्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे जाताना दिसत आहे. या अॅनाकोंडाची लांबी 50 फूटांपेक्षा जास्त असल्याचं सांगण्यात येत आहे. पण हे सत्य नाही आहे.
कारण फॅक्ट चेकिंग वेबसाइट दॅट्स नॉनसेंसनुसार, इंटरनेटवर दाखवला गेलेला हा व्हीडिओ एप्रिल 2018 च्या आधी सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. युट्यूबवर याला “जायंट एनाकोंडा क्रॉसिंग द रोड” असं शीर्षक देण्यात आलं आहे.
इतर बातम्या –
उदयनराजे आणि रामराजे यांच्यातला अबोला अखेर संपला, साताऱ्यात दोघांच्या मनसोक्त गप्पा
US Election 2020: ट्रम्प यांना मागे टाकत 8 अंकांनी बायडेन आघाडीवर – सर्वे
TOP 9 News | देशात काय घडतंय? टॉप 9 न्यूज | 31 October 2020https://t.co/xljezmCSAk#corona #NEWSUPDATE
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 31, 2020
(viral video of anaconda 50 foot anaconda crossing river in brazil)