पोरं कधी होणार? गुड न्यूज कधी?, नव विवाहितांना ‘या’ देशात का विचारला जातोय एकच प्रश्न?

दुसऱ्या महिलेनेही तिचा अनुभव व्यक्त केला आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये माझं लग्न झालं. त्यानंतर मला गर्भवती व्हा असं सांगणारा दोनदा फोन येऊन गेला.

पोरं कधी होणार? गुड न्यूज कधी?, नव विवाहितांना 'या' देशात का विचारला जातोय एकच प्रश्न?
पोरं कधी होणार? गुड न्यूज कधी?, नव विवाहितांना 'या' देशात का विचारला जातोय एकच प्रश्न?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 28, 2022 | 3:54 PM

बीजिंग: सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनला (china) सध्या एका प्रश्नाने चांगलंच ग्रासलं आहे. तो म्हणजे चीनची लोकसंख्या (population) दिवसे न् दिवस कमी होत आहे. त्यामुळे चीनची डोकेदुखी वाढली आहे. चीनला या प्रश्नाने किती घेरलं हे एका महिलेच्या पोस्टवरून दिसून येत आहे. मला स्थानिक प्रशासनाकडून फोन आला. तुम्ही गर्भवती (pregnant) कधी होणार आहात? असा प्रश्न त्यांनी मला केला, असं या महिलेने पोस्टमध्ये म्हटलं आहे. विशेष म्हणजे या महिलेच्या पोस्टवर तब्बल 10 हजार लोकांनी कमेंट केली आणि आपल्यालाही असाच फोन आल्याचं सांगितलं. या विषयाचा चांगलाच गवगवा झाल्यानंतर प्रशासनाने नंतर ही पोस्ट हटवली आहे.

एका महिलेने तिच्या सहकारी महिलेला आलेल्या फोनबद्दलची माहिती दिली आहे. प्रशासनातील एका महिला अधिकाऱ्याचा तिला फोन आला होता. नव विवाहित दाम्पत्याने एका वर्षात मुल जन्माला घालावं, असं सरकारचं म्हणणं आहे. त्यामुळे आम्हाला वारंवार फोन करून विचारावं लागतं. तसे सरकारचे आदेश आहेत, असं या महिलेने फोनवर म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

दुसऱ्या महिलेनेही तिचा अनुभव व्यक्त केला आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये माझं लग्न झालं. त्यानंतर मला गर्भवती व्हा असं सांगणारा दोनदा फोन येऊन गेला. तुमचं लग्न झालंय तर तुम्ही मुलांना जन्म देण्याचं प्लॅनिंग का करत नाही? मुलांना जन्माला घालण्यासाठी वेळ काढा, असं अधिकाऱ्याकडून सांगण्यात आल्याचं या महिलेने म्हटलं आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी कम्युनिस्ट पार्टीची बैठक झाली. त्यात चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी देशाचा बर्थ रेट वाढवण्याचं आवाहन केलं होतं. देशाची लोकसंख्या वाढवण्यासाठी एक धोरण आखण्यात येणार असल्याचं जिनपिंग यांनी सांगितलं. दरम्यान, देशाची लोकसंख्या घटत असल्याचं चीनने कबूल केलं आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.