Parag Agrawal | पक्के मुंबईकर ते ट्विटरच्या सीईओपदी, कोण आहेत पराग अग्रवाल? कसे पोहोचले सर्वोच्चपदी?

मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरचे (Twitter) सह-संस्थापक जॅक डॉर्सी (Jack Dorsey) यांनी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या जागी आता भारतीय वंशाचे पराग अग्रवाल (Parag Agrawal) ही जबाबदारी सांभाळणार आहेत. ट्विटरच्या सीईओपदी जॅक डॉर्सी यांनी पराग अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आलीये.

Parag Agrawal | पक्के मुंबईकर ते ट्विटरच्या सीईओपदी, कोण आहेत पराग अग्रवाल? कसे पोहोचले सर्वोच्चपदी?
Parag-Agarwal-Twitter-CEO-Jack-Dorsey
Follow us
| Updated on: Nov 30, 2021 | 7:08 AM

Who is Parag Agrawal Twitter New CEO : मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरचे (Twitter) सह-संस्थापक जॅक डॉर्सी (Jack Dorsey) यांनी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या जागी आता भारतीय वंशाचे पराग अग्रवाल (Parag Agrawal) ही जबाबदारी सांभाळणार आहेत. ट्विटरच्या सीईओपदी जॅक डॉर्सी यांनी पराग अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आलीये. तशी अधिकृत घोषणा करण्यात आली असून माजी सीईओ जॅक डोर्सी यांनी अग्रवाल यांच्यावर पूर्ण विश्वास असल्याचं म्हटलंय. विशेष म्हणजे अग्रवाल यांचं शिक्षण मुंबई आयआयटीमधून झालेलं आहे.

डॉर्सी यांनी परागचे कौतुक केले आहे. ट्विटरचे सीईओ म्हणून पराग यांच्यावर त्यांचा विश्वास असल्याचंही ते म्हणाले. गेल्या 10 वर्षात त्यांनी केलेले काम अभूतपूर्व आहे, असंही डॉर्सी म्हणाले.

कोण आहेत पराग अग्रवाल?

पराग अग्रवाल हे आतापर्यंत ट्विटरचे चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर (CTO) म्हणजेच मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून काम पाहात होते आणि संपूर्ण तांत्रिक जबाबदारी सांभाळत होते. पराग अग्रवाल यांनी ट्विटरमध्ये इंजिनिअर म्हणून करिअरची सुरुवात केली होती. आता ते सीईओ पदाची सूत्रे हाती घेणार आहेत, अशी माहिती डॉर्सी यांनी दिलीये.

आयआयटी बॉम्बेमधून अभियांत्रिकीचं शिक्षण

पराग अग्रवाल यांनी कॉम्प्युटर सायन्समध्ये डॉक्टरेट पदवी घेतली आहे. त्यांनी आयआयटी बॉम्बेमधून अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. तसेच, त्यांनी अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्समध्ये पीएचडीही केली आहे.

2011 मध्ये ट्विटरमध्ये एन्ट्री

पराग अग्रवाल यांनी 2011 मध्ये ट्विटरमध्ये एन्ट्री घेतली. तेव्हापासून ते फक्त ट्विटरमध्येच काम करत आहेत. 2017 मध्ये त्यांना कंपनीचे सीटीओ बनवण्यात आले होते. ते इंजीनियर एक्सपर्टीज आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये आणि अॅड नेटवर्कमध्ये तज्ञ मानले जातात. या दोन्ही गोष्टी कंपनीसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. रिपोर्ट अनुसार डॉर्सी यांनी त्यांचं काम खूप आवडतं. इतक्या मोठ्या पदावर पोहोचण्यासाठी त्यांच्यातील हे गुण फायद्याचे ठरले आहेत. जेव्हा ते कंपनीत रुजू झाले तेव्हा कर्मचाऱ्यांची संख्या 1000 पेक्षाही कमी होती. ट्विटरवर येण्यापूर्वी पराग यांनी मायक्रोसॉफ्ट आणि याहूमध्येही काम केले आहे.

11.41 कोटींच्या मालमत्तेचे मालक

पराग अग्रवाल हे Twitter च्या Bluesky चे नेतृत्व करत होते, ज्याचे उद्दिष्ट सोशल मीडियासाठी खुले आणि विकेंद्रित (Open and Decentralised Standard) मानक तयार करणे होते. CTO या नात्याने, पराग यांच्यावर ट्विटरच्या तंत्रज्ञान रणनीती आणि ग्राहक महसूल आणि विज्ञान संघांमध्ये मशीन लर्निंग आणि AI ची देखरेख या जबाबदाऱ्या होत्या. हिंदुस्तान टाईम्सने PeopleAI चा हवाला देत सांगितलं आहे की, पराग अग्रवाल यांची अंदाजे एकूण संपत्ती 1.52 मिलिअन डॉलर म्हणजेच 11 कोटी 41 लाख 91 हजार 596 रुपये असल्याचे सांगितले आहे.

पराग यांनी आभार व्यक्त केले

ट्विटरच्या सीईओपदी नियुक्ती झाल्यानंतर पराग अग्रवाल यांनी ट्विटरवर जॅक डॉर्सी यांचे आभार मानले आहेत. जॅक आणि मी चांगले मित्र आहोत. अजूनही आमच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे जॅकचे आभार मानतो. माझ्यावर विश्वास ठेवल्यामुळे मी खरच जॅक यांचे आभार मानतो असे पराग यांनी म्हटले आहे.

डॉर्सी बोर्डावर कायम राहतील

जॅक डॉर्सी यांनी सीईओ पदाचा राजीनामा दिला आहे, परंतु ते कंपनीचे बोर्ड सदस्य राहतील. आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक पत्र शेअर करत त्यांनी पद सोडल्याबद्दल दु:खही व्यक्त केले आहे. मात्र, पत्रात त्यांनी लिहिले आहे की, मी खूप आनंदी असून हा माझा स्वत:चा निर्णय आहे.

संबंधित बातम्या :

Parag Agarwal | ट्विटरच्या सीईओपदी भारतीय वंशाचे पराग अग्रवाल, जॅक डोरसी यांचा राजीनामा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.